एक्स्प्लोर
आवं कुठून? भाकर, पिटलं, ठेचा आलाय गावागावातून; मुंबईत आंदोलकांसाठी अन्नपाणी, कुणीही नाही उपाशी
मुंबईत उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक मराठा बांधव राज्यभरातून गेले आहेत.
Mumbai Maratha reservation food packets
1/12

मुंबईत उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक मराठा बांधव राज्यभरातून गेले आहेत. पाठिंबा देण्यासाठी गेलेल्या आंदोलकांना त्यांच्या जेवणाची सोय व्हावी यासाठी विविध जिल्ह्यातून आज सकाळीच मोठ्या प्रमाणात जेवण मुंबईत पोहोचलं.
2/12

पुणे, बीड, सोलापूर, लातूर, परभणी, संभाजीनगर जिल्ह्यातून गाड्या भरुन भाकरी आणि कोरड्यास आंदोलकांसाठी आणण्यात आलं होतं. तर, पाण्याच्या बाटल्यांचेही मोठ्या प्रमाणावर बॉक्स उतरल्याचं दिसून आलं.
3/12

मराठा बांधवांच्या पोटासाठी बारामतीकरही पुढे सरसावले. दहा हजार आंदोलकांना पुरेल एवढं जेवण उद्या बारामतीतून पाठवले जाणार आहे. बारामतीतील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मुंबईला शिदोरी पाठवण्यात आहे.
4/12

मोठ्या संख्येने बारामतीकरांनी मुंबईकडे शिदोरी पाठवण्याचा निर्धार केला आहे. याच्यामध्ये भाकरी, चटणी, ठेचा तसेच पाण्याच्या बाटल्या देखील देणार असल्याचं बारामतीकरांनी सांगितलं
5/12

मनोज जरांगे पाटील मुंबईकडे जात असताना बीडमधील सतीश देशमुख यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. कुटुंबाच्या दुःखापेक्षा समाजाचं दुःख मोठं असल्याने मी हे जेवणाचे साहित्य मुंबईला घेऊन जात असल्याचे सांगत जाधव हेही भाकऱ्या घेऊन मुंबईला पोहोचले.
6/12

मुंबईतील समाज बांधवांसाठी भाकरी,धपाटे यासह जेवणाचे साहित्य घेऊन आझाद मैदानाकडे ते रवाना झाले होते. घाटनांदुर,अंबाजोगाई,केज तालुक्यातुन हे साहित्य जमा केले.
7/12

मुंबईतील आंदोलन विस्कळीत करण्याचं सरकारचं षडयंत्र आहे.हे जेवण साहित्य जमा करण्यासाठी मुस्लीम,धनगर आणि इतर बांधवांचाही हातभार लागल्याचे ते म्हणाले.
8/12

मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी गेलेल्या आंदोलकांना मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याची मदत निलंगा तालुक्यातून रवाना करण्यात आली.
9/12

निलंगा तालुक्यातील महिला, शेतकरी आणि सर्वधर्मीय नागरिकांनी उत्स्फूर्तपणे पुढाकार घेत आंदोलकांसाठी भाकरी, चटणी, धपाटी, दसमी, लोणची, बिस्किटांचे पुडे, औषधे अशा विविध वस्तू तयार करून पाठविल्या.
10/12

मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी मनोज जरांगे यांचं मुंबईत उपोषण सुरू असून त्यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. मात्र आंदोलकांना अन्न पाण्याची सोय नसल्याचे समोर आल्यानंतर आता बीडकर पुढे धजावल्याचं दिसून आलं.
11/12

आंदोलकांना निदान दोन वेळचे जेवण मिळावे. यासाठी बीडकरांनी पुढाकार घेतला आहे. बीडच्या गांधनवाडी, पांढरवाडी, सकुंडवाडी, उंडेवाडी, कोतन, खलाटवाडी या गावांतून 30 ते 35 हजार भाकऱ्या, चटणी, ठेचा आणि लोणच्याची शिदोरी मुंबईला रवाना करण्यात आली आहे.
12/12

लातूरमधून तब्बल 20 हजार भाकरी आणि 200 किलो शेंगा चटणी मुंबईकडे रवाना करण्यात आली असून, या माध्यमातून लातूरकरांनी आंदोलकांना पाठिंबा दिला आहे.
Published at : 31 Aug 2025 07:48 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
हिंगोली
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
























