एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Palghar News : दापचरी दुग्ध प्रकल्पातील 150 कुटुंबांना दिलेल्या नोटिशीला सरकारची स्थगिती; एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट

Palghar Dapchari Dairy Project : दापचरी दु्ग्ध प्रकल्पातील 150 हून अधिक कुटुंबांना जागा आणि युनिट सोडण्यासाठी बजावण्यात आलेल्या नोटिशीला सरकारने स्थगिती दिली आहे.

दापचरी, पालघर :  दापचरी दु्ग्ध प्रकल्पातील 150 हून अधिक कुटुंबांना जागा आणि युनिट सोडण्यासाठी बजावण्यात आलेल्या नोटिशीला सरकारने स्थगिती दिली आहे. दुग्ध प्रकल्पातील कुटुंबांना नोटीस बजावण्यात आल्याने त्यांच्यावर बेघर होण्याची वेळ आली होती. एबीपी माझाने ही बातमी लावून धरली होती.  ह्याच बातमीची दखल घेत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या नोटीशीला स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत. 

मुंबई आणि ठाणे सारख्या शहरांना मुबलक दुग्ध पुरवठा व्हावा म्हणून तत्कालीन ठाणे जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील दापचरी या भागातील जवळपास सहा हजार हेक्टर जमीन संपादित करण्यात आली.  या ठिकाणी दुग्ध प्रकल्प उभारण्यात आला. हा प्रकल्प सुस्थितीत चालावा म्हणून त्यावेळेस जाहिरात काढून राज्यातील शेतकऱ्यांना येथे येऊन दुग्ध व्यवसाय करण्याचा आवाहन करण्यात आले होते. सरकारच्या या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यातील विविध भागातील नागरिकांनी या ठिकाणी स्थलांतर केले. काही कुटुंबांनी आपली वडिलोपार्जित जमीन-घर विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी या दुग्ध प्रकल्पात स्थलांतरित झाले.

1970 च्या दशकात पालघरच्या डहाणूतील दापचरी येथे हजारो हेक्टर जमीन राज्याच्या दुग्धविकास प्रकल्पाने ताब्यात घेतली. ज्या जमिनीवर दुग्ध प्रकल्प उभारण्यात आला, त्या ठिकाणी मुंबई, ठाणे या महानगरांसह महाराष्ट्रात येथील दूध नेण्यासाठी या ठिकाणी 200 पेक्षा अधिक शेतकऱ्यांना प्रत्येकी एक हेक्टर जमीन देण्यात आली. यात काही संकरीत गायी ही देण्यात आल्या. मात्र, सरकारी अनास्थेमुळे पुढे हाच प्रकल्प डबघाईला गेला.  

दापचरी येथील दुग्ध प्रकल्प प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे डबघाईला गेला आणि तेव्हापासून येथे आलेले शेतकरी अडचणीत सापडले आहेत. मागील 50 वर्षांपासून हे कुटुंब महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येऊन या ठिकाणी वास्तव्यास आहेत. अचानक हे घर आणि युनिट खाली करण्याच्या नोटीस आल्याने आता पुढच आयुष्य जगायचं कुठे असा प्रश्न येथील कुटुंबांसमोर उभा राहिला होता. 

नोटीस बजावण्यात आलेल्या दापचरी दुग्ध प्रकल्पातील कुटुंबांच्या शिष्टमंडळाने आज महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची भेटली. त्यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी नोटिशीला स्थगिती देण्याचे आदेश देत असल्याचे सांगितले. 

मुंबई, ठाणे या महानगरांमधील दूध प्रश्न सुटावा तसेच अनेक बेरोजगार कुटुंबांना रोजगार मिळावा म्हणून या दुग्ध प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. मात्र सध्या हा प्रकल्प डबघाईला आला असून या प्रकल्पाकडे सरकार आणि या प्रकल्पाचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे हजारो हेक्टर असलेली जमीन आता भविष्यात कोणत्या प्रकल्पासाठी उपयोगात येणार आहे, असा प्रश्नही स्थानिकांना पडला आहे. 

इतर संबंधित बातमी :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Naresh Arora on Ajit Pawar win :अजितदादा एकदम साधा माणूस, कुठे सौम्य, कुठं कडक असावं ते त्यांना कळलंDhananjay Mahadik on Satej Patil | पुतण्याला निवडून आणता आलं नाही आणि मुख्यमंत्री बनायले निघालेNarayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Koregaon Assembly Elections 2024 : महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Maharashtra Vidhan Sabha Election results 2024: ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Embed widget