हाणामारी मिटवायला गेलेल्या पोलिसांना संशय आला अन् मुले पळवणारी टोळी गजाआड, दोन चिमुकल्यांची सुटका
Children Kidnapping Gang Arrested : कल्याणमधील दोन चिमुकल्यांचं अपहरण झाल्याची तक्रार या आधीच पोलिस ठाण्यात नोंद झालेली होती. पालघर पोलिसांच्या सतर्कतेमुळे दोन चिमुकल्यांची सुटका झाली.
ठाणे : कल्याण येथून दोन चिमुकल्या मुलांचं अपहरण करून गुजरातच्या दिशेने जात असलेल्या चार आरोपींना कासा पोलिसांनी जेरबंद केल आहे. या आरोपींमध्ये दोन पुरुष आणि दोन महिला आहेत. सत्यम मिश्रा (वय 7) आणि सुरज मिश्रा (वय 9) अशी या दोन चिमुकल्यांची नाव असून ते कल्याण येथील रहिवासी असल्याचं समोर आलं .
वाद मिटवायला गेले आणि गुन्हा उघडकीस आला
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटी नाका परिसरात एका ठिकाणी हाणामारी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर तातडीने पोलिसांनी धाव घेत हा वाद मिटवला. मात्र या गाडीमध्ये दोन चिमुकली मुलं असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. काही वेळाने या दोन चिमुकल्या मुलांना विश्वासात घेऊन कासा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अविनाश मांदळे यांनी चौकशी केली. त्यावेळी आपल्याला रेल्वे स्थानकावरून या चारही जणांनी उचलून आणण्याचा प्रकार या चिमुकल्यांनी पोलिसांसमोर मांडला.
मुलांच्या अपहरणाचा गुन्हा आधीच दाखल
दरम्यान, चौकशीनंतर कल्याणच्या महात्मा फुले नगर पोलिस ठाण्यात या दोन चिमुकल्यांच्या अपहरणाचा गुन्हा दाखल असल्याचं उघड झालं. त्यानंतर चारही आरोपींना अटक करून कल्याणच्या फुलेनगर पोलीस ठाण्यात रवानगी करण्यात आली. पालघर पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे ही दोन्ही चिमुकले सुखरूप त्यांच्या कुटुंबीयांकडे परतली. या कामगिरीमुळे पालघर पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होतोय.
ही बातमी वाचा: