(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ISSF Shooting World Championships 2022 : पालघरच्या रुद्रांक्ष पाटीलची चमकदार कामगिरी, विश्व अजिंक्य स्पर्धेत सुवर्णपदकाचा वेध
Palghar : रुद्रांक्ष पाटीलने विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील दहा मीटर रायफल्स स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करत 2024 मध्ये फ्रान्समध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेचा पहिला कोटा मिळवला आहे.
World Championship : इजिप्तची राजधानी कैरो येथे झालेल्या जागतिक नेमबाजी (World Championship) स्पर्धेतील दहा मीटर रायफल्स स्पर्धेत भारताचा नेमबाज रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील (Rudrankksh Patil) वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं आहे. रुद्रांक्ष पाटीलने विश्वविक्रम करुन हे सुवर्णपदक (gold medal) मिळवलं असून 2024 मध्ये फ्रान्समध्ये (France) होणाऱ्या ऑलिम्पिक (Olympic) स्पर्धेचा पहिला कोटा मिळवला आहे. रुद्रांक्ष पाटील याच्या या कामगिरीमुळे त्याचं कौतुक केलं जात आहे. वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी त्याने ही कामगिरी केली आहे.
टोकियो (Tokyo) येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतील तीनही विजेत्या स्पर्धकांवर मात करत रुद्रांक्ष पाटीलने सुवर्णपदकाला गवसणी घातली हे विशेष म्हणता येईल. रुद्रांक्ष पाटील हा पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि वाशी येथील आरटीओ विभागात उपायुक्त असलेल्या हेमांगिनी पाटील या दाम्पत्यांचा मोठा मुलगा आहे.
रुद्रांक्ष पाटीलने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आपल्या अचूक कामगिरीच्या जोरावर स्वतःचे एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. त्याने आतापर्यंत राष्ट्रीय स्पर्धेत एकूण 20 सुवर्ण, 12 रौप्य आणि 07 रजत पदक मिळवलं आहे. रुद्रांक्ष पाटीलने खेलो इंडिया युथ स्पर्धा 2020 मध्ये सुवर्णपदक मिळवले असून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्याने 8 सुवर्ण, 3 रौप्य पदके मिळवत स्वतःला सिद्ध केले आहे.
रुद्रांक्ष पाटील (Rudrankksh Patil) सध्या सीनियर वर्ल्ड रँकिंगमध्ये सातव्या क्रमांकावर असून ज्युनियर वर्ल्ड रँकिंगमध्ये पहिल्या नंबरवर आहे. कैरो येथे रायफल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून त्याने 2024 च्या ऑलम्पिक स्पर्धेच्या पहिल्या कोट्यात स्थान मिळवले आहे. रुद्राक्ष पाटीलची दिवसेंदिवस सुरु असलेली प्रगती पाहता आगामी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये तो देशाला सुवर्णपदक मिळवून देण्यात कुठेही कमी पडणार नाही असा विश्वास त्याचे वडील बाळासाहेब पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केला आहे.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदक
दरम्यान नेमबाज रुद्रांक्ष पाटीलने 30 सप्टेंबर रोजी 36 व्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सुवर्णपदकाचा वेध घेतला होता. त्याने पुरुषांच्या दहा मीटर एअर रायफल गटामध्ये चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकावला आहे. आंतरराष्ट्रीय नेमबाज रुद्रांक्षने फायनलमध्ये अचूक नेम धरत 17 गुणांची कमाई केली. यासह किताबाचा मानकरी ठरला.
महत्त्वाची बातमी :