एक्स्प्लोर

Pahalgam Terror Attack मोठी बातमी : पाकव्याप्त काश्मीरमध्ये हमासची एन्ट्री; धडकी भरवणारा व्हिडीओ, नवं कनेक्शन उघड?

Pahalgam Terror Attack: हमास आणि पाकिस्तान समर्थित संघटनांचा संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे.

Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याचा (Pahalgam Terror Attack) तपास करणाऱ्या एनआयएच्या हाती महत्वाचे पुरावे लागले आहेत. दहशतवाद्यांनी त्यांची हत्यारं बेताब खोऱ्यात लपवली होती. तसेच पहलगाम हल्ला लश्कर ए तैयबा, आयएसआय आणि पाकिस्तानचा कट होता असंही तपासात समोर आलं आहे. याचदरम्यान पहलगाम हल्ल्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

हमास आणि पाकिस्तान समर्थित संघटनांचा संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे. हमासने पाकव्याप्त काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदसह एका रॅलीत भाग घेतला होता. पाकव्याप्त काश्मीरमधील रॅलीत हमास सामील झाला होता. तसेच पहलगाम हल्ल्यतील संशयितही पाकव्याप्त काश्मीरमधील रॅलीत सहभागी होता, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये हमासची एन्ट्री-

5 फेब्रुवारी 2025 रोजी हमासने पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदसह एका रॅलीत भाग घेतला होता. या रॅलीला 'काश्मीर सॉलिडॅरिटी अँड हमास ऑपरेशन अल-अक्सा फ्लड कॉन्फरन्स' असे नाव देण्यात आले. पहलगाम हल्ल्याच्या नियोजनात सहभागी असलेले दहशतवादी या कार्यक्रमाला उपस्थित होते, अशी माहिती देखील मिळत आहे. या कार्यक्रमात हमासचे प्रतिनिधी डॉ. खालेद अल-कदौमी यांनी शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. इतर अनेक पॅलेस्टिनी दहशतवाद्यांसह पाकिस्तान समर्थित जिहादी संघटनांनी त्यात भाग घेतला. यावेळी, व्यासपीठावरून भारताविरुद्ध धमक्या देण्यात आल्या. 

हमास ही पॅलेस्टिनी इस्लामी दहशतवादी संघटना-

हमास ही पॅलेस्टिनी इस्लामी दहशतवादी संघटना आहे, जी गाझा पट्टीवर पूर्णपणे राज्य करते. हमासने इस्रायलला नेस्तनाबूत करण्याची शपथ घेतलेली आहे. 2007मध्ये गाजामध्ये सत्ता हाती घेतल्यानंतर इस्रायलसोबत हमासने अनेकवेळा युद्ध केले. या युद्धांमध्ये हमासने इस्रायलवर हजारो रॉकेट डागले. इतर घातल हल्लेही केले. त्याला इस्रायलने तोडीस तोड देताना अनेकदा हवाई हल्ले केले. इजिप्तसोबत मिळून इस्रायलने सुरक्षेसाठी 2007मध्ये गाजा पट्टी ब्लॉक केली होती. हमासमध्ये वेगवेगळे विंग तयार झाले आहेत, त्यातील सर्वात धोकादायक मिलिट्री विंग आहे, ज्याला अनेक देशांनी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे. मोहम्मद दीब अल-मसरी यांचंही एक नाव हमासच्या लष्करी कमांडरच्या यादीत टॉपला आहे, ज्याला अबू खालिद या नावानेही ओळखलं जातं. अबू खालिद हा हमासची लष्करी संघटना आयजे अल-दिन अल-कासम ब्रिगेडचा प्रमुख आहे. इस्रायली या खतरनाक कमांडरला मॅन ऑफ डेथ म्हणतात.

हमासने 300 पेक्षा जास्त निष्पाप नागरिक मारले, शेकडोंचं अपहरण-

- पॅलेस्टिनची जिहादी दहशतवादी संघटना
- इस्रायलविरोधात अनेक जिहादी अतिरेकी हल्ले, हिंसाचारात हमासचा समावेश
- गाझापट्टीत इस्रायल विरोधात सतत संघर्ष
- मुस्लिम ब्रदरहुडच्या इस्लामी विचारसरणीवर हमासची स्थापना
- 1987 साली पासून वेगळी चूल
- 2007 पासून गाझापट्टीवर हमासची सत्ता
- हमासमध्ये इराण, सीरिया आणि लेबनॉनमधील शिया इस्लामी गट हिजबुल्ला अतिरेक्यांचा समावेश
- हमासला शियापंथीय इराणचा पाठींबा
- जगभरातील अनेक देशातील मुस्लिमांचं हमासला समर्थन
- इस्रायल, अमेरिका, युरोपियन युनियन, कॅनडा, इजिप्त आणि जपान अशा काही देशांमध्ये हमास दहशतवादी संघटना म्हणून घोषित.
- 7 ऑक्टोबर 2023 ला हमासने इस्रायलवर सर्वात मोठा अतिरेकी हल्ला करत 300 पेक्षा जास्त निष्पाप नागरिक मारले, हजारो जखमी तर शेकडोंचं अपहरण केलं
- यानंतरच इस्रायलने युद्ध घोषित करुन गाझापट्टीचा विध्वंस केला
- पहलगाममधील अतिरेकी हल्ल्यावर हमासने 7 ऑक्टोबरला इस्रायलमध्ये केलेल्या हल्ल्याची छाप

संबंधित बातमी:

Pahalgam Terror Attack: अमेरिकेने पाकिस्तानच्या पंतप्रधानांना सुनावले खडेबोल; म्हणाले, आम्ही भारतासोबत, तुम्ही पहलगाम हल्ल्याचा निषेध करा!

Pahalgam Terror Attack: नि. मेजर जनरलचं मोठं भाकीत, मोदी पाकिस्तानचे दोन तुकडे पाडणार, सर्जिकल स्ट्राईकपेक्षा भयंकर हल्ल्याची तयारी!

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pranit More Comeback After Controversy: 370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
Bhandara Crime News: भंडारा हादरलं! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार; संतप्त नागरिकांकडून नराधमाला चोप, शहरात आज कडकडीत बंद
भंडारा हादरलं! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार; संतप्त नागरिकांकडून नराधमाला चोप, शहरात आज कडकडीत बंद
Maharashtra Live blog updates: सोलापूर जिल्हा परिषदेतील सभागृहाचे नाव बदलाला राष्ट्रवादी शरद पवार गट आणि संभाजी ब्रिगेडचा विरोध
Maharashtra Live blog updates: सोलापूर जिल्हा परिषदेतील सभागृहाचे नाव बदलाला राष्ट्रवादी शरद पवार गट आणि संभाजी ब्रिगेडचा विरोध
Mumbai Railway: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Crime: वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; ऑनलाइन कंपनीतील कामगिरीच्या स्पर्धेतून जीवघेणा हल्ला, दोघांना अटक
वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! चांगला इन्सेंटिव्ह मिळवतो म्हणून सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; दोघांना अटक, नागपूर हादरलं
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
Maharashtra Live blog updates: सोलापूर जिल्हा परिषदेतील सभागृहाचे नाव बदलाला राष्ट्रवादी शरद पवार गट आणि संभाजी ब्रिगेडचा विरोध
Maharashtra Live blog updates: सोलापूर जिल्हा परिषदेतील सभागृहाचे नाव बदलाला राष्ट्रवादी शरद पवार गट आणि संभाजी ब्रिगेडचा विरोध
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Eknath Shinde and PM Modi: सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
Nikita Rawal Angry On Ranbir Kapoor: 'गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?'; 'रामायण'मध्ये रणबीर कपूरच्या कास्टिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा आक्षेप, चालवतेय बायकॉट ट्रेंड
'गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?'; 'रामायण'मध्ये रणबीर कपूरच्या कास्टिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा आक्षेप, चालवतेय बायकॉट ट्रेंड
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Manoj Jarange Patil and Pravin darekar: फडणवीसांवर टीका करताच प्रवीण दरेकरांनी मनोज जरांगेंची अक्कलच काढली, म्हणाले, 'नाक्यावर आंदोलन करणं आणि...'
फडणवीसांवर टीका करताच प्रवीण दरेकरांनी मनोज जरांगेंची अक्कलच काढली, म्हणाले, 'नाक्यावर आंदोलन करणं आणि...'
Embed widget