Pahalgam Terror Attack: अमेरिकेने पाकिस्तानच्या पंतप्रधानांना सुनावले खडेबोल; म्हणाले, आम्ही भारतासोबत, तुम्ही पहलगाम हल्ल्याचा निषेध करा!
Pahalgam Terror Attack: अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी या कठीण काळात भारताला उघडपणे पाठिंबा दिला आहे.

Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर (Pahalgam Terror Attack) अमेरिकेने कठोर भूमिका घेतली आहे. अमेरिकेकडून पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांना खडेबोल सुनावले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांची पाकच्या पंतप्रधानांशी चर्चा झाली. यावेळी पहलगाम हल्ल्याचा पाकिस्तानने निषेध करावा, असं अमेरिकेने पाकिस्तानला म्हटलं आहे. तसेच दोषींवर कारवाई करण्यासाठी पाकिस्तानने मदत करावी, असं अमेरिकेने पाकिस्तानला सांगितलं आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने जारी केलेल्या निवेदनानुसार, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी या कठीण काळात भारताला उघडपणे पाठिंबा दिला आहे. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत अमेरिका भारतासोबत उभा आहे, असंही मार्को रुबियो यांनी सांगितले. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पहलगाम हल्ल्यावरुन अमेरिकेशी चर्चा केली. यावेळी अमेरिकेने पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना खडेबोल सुनावले. पहलगाम हल्ल्याच्या चौकशीत पाकिस्तानने सहकार्य करावे, असं अमेरिकेकडून स्पष्ट सांगण्यात आले आहे. हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करणे आणि दोषींना शिक्षा करणे ही पाकिस्तानची जबाबदारी आहे, असंही अमेरिकेकडून सांगण्यात आले आहे. काल रात्री उशिरा अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. यांच्याशी चर्चा केली. जयशंकर आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याशी झालेल्या स्वतंत्र चर्चेत अमेरिकेचे दहशतवादाविरुद्धचे स्पष्ट धोरण स्पष्ट करण्यात आले.
Secretary Rubio talks to EAM Jaishankar, reaffirms US commitment against terrorism
— ANI Digital (@ani_digital) May 1, 2025
Read @ANI Story | https://t.co/uGHNa5omLI#Rubio #jaishankar #USA #TerroristAttack pic.twitter.com/uG37EHSQb2
घाबरलेल्या पाकिस्तानकडून सलग सातव्या दिवशी सीमेवर गोळीबार
घाबरलेल्या पाकिस्तानने सलग सातव्या दिवशी सीमेवर गोळीबार केला. पाकिस्तानी लष्कराने एलओसीवर कुपवाडा, ऊरी, अखनूर सेक्टरमध्ये गोळीबार केला. संपूर्ण रात्रभर पाकिस्तानी गोळीबार सुरू होता. त्याला भारतानेही तोडीस तोड उत्तर दिलं. भारताने पाकिस्तानच्या गोळीबाराला भडीमाराने उत्तर दिलं. भारतीय हल्ल्याच्या धमकीमुळे पाकिस्तानमध्ये घबराट निर्माण झाली आहे. पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनी पुन्हा एकदा भारताला अणूहल्ल्याची धमकी दिली. भारताच्या आक्रमकतेला आम्ही जोरदार प्रत्युत्तर देऊ, असं इशाक दार म्हणाले.





















