एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
महाराष्ट्र सरकार डोकं ठिकाणावर आहे का? सीएए समर्थन मोर्चात फडणवीसांचा हल्लाबोल
मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावर सीएएच्या समर्थनात आज मोर्चा काढण्यात आला. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या कायद्याला विरोध करणाऱ्या काँग्रेससह देशातील विरोधी पक्ष आणि शिवसेनेवर देखील हल्लाबोल केला.
मुंबई : आज जे सावरकरांचा अपमान करतात. जाळपोळ करतात त्यांना जुलूस काढायला हे सरकार परवानगी देतं. मात्र जो कायदा आम्ही तयार केला. त्या कायद्याच्या समर्थनात शांतपणे जाणार आहोत त्याला परवानगी मिळत नाही. या सरकारच डोकं ठिकाणावर आहे का?, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. ऑगस्ट क्रांती मैदानावर सीएएच्या समर्थनात काढलेल्या मोर्चात फडणवीस बोलत होते.
यावेळी फडणवीस म्हणाले की, तुम्ही आम्हाला मोर्चा नेण्यापासून रोखू शकता. पण सीएएला समर्थ न करण्यापासून रोखू शकत नाही. हा देश हिंदूंचा एकमेव देश आहे. काँग्रेस, कम्युनिस्ट नेते म्हणतात हा देश तुमचा नाही. तीन कोटी बांगलादेशी या देशात शिरले. निर्वासित हिंदू, जैन, बौद्धांना प्रतारीत केलं गेलं. ते आपल्याकडे आले, त्यांना नागरिकत्व दिले तर त्यांना का अंगार लागला, असे ते म्हणाले.
CAA च्या माध्यमातून आमच्या प्रताडीत बंधूंना जागा द्यायची आहे. यामुळे कुणाची नागरिकता हिरावली जाणार नाही. काही लोक खुर्चीसाठी देशात अराजकता पसरवत आहेत. ह्यांना वाटत मोदी राज्य संपणार आहे. हे लोक देशात आग लावत आहेत, असे ते म्हणाले.
आसाममध्ये NRC कायदा कुणी आणला. यासाठी राजीव गांधी यांनी समझौता केला. त्यानंतर सुप्रीम कोर्टामे सांगितलं तेव्हा एनआरसी लागू झाला, असंही त्यांनी सांगितलं. ह्या देशात कोणी बांगलादेशी घुसणार असेल तर त्याला या देशात ठेवलं पाहिजे का?, असा सवाल यावेळी त्यांनी केला.
कालपर्यंत शिवसेना पण हेच बोलत होती. हे घुसखोर बांगलादेशी बाहेर काढा, हे बॉम्बस्फोट करतात. पण सत्तेने, खुर्चीने त्यांच्या तोंडाला कुलूप लागलं, असं फडणवीस म्हणाले. सत्ता येईल जाईल पण हा देश राहिला पाहिजे. देशाच्या सुरक्षेसाठी आम्ही सत्तेला लाथ मारून निघून जाऊ पण देश वाचवू, असे ते म्हणाले.
काही जण सावरकरांचा अपमान पण सहन करतात. सावकार कबर खोदण्याची औकात कुठे आहे. हिंदूंची कबर कुणी खोदू शकत नाही, असं ते म्हणाले. ज्यांनी आमच्यावर आक्रमण केले आम्ही त्यांना सोडलं नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची लेकरं आहोत, असंही ते म्हणाले. आग लावून, भारतात अस्थिरता पसरवण्याचा प्रयत्न ते करतील तर समर्थनाथही खूप लोक उतरतील. इतके की मुंगी पण जाऊ शकणार नाही. आता लढाई सुरू झाली आहे, असंही ते म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement