Nagpur : शोध पथकाची कारवाई, गुरुवारी 45 हजार रुपयांचा दंड
सार्वजनिक रस्ता, फुटपाथवर बांधकामाचे साहित्य साठविल्याचा फटका गेल्या दोन महिन्यांत 1600च्या वर लोकांना बसला आहे. या लोकांकडून मनपा पथकाने कारवाई करून 37 लाखांपेक्षा जास्त महसूल गोळा केला आहे.
नागपूर: स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी 06 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 45 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या मार्गदर्शनात गांधीबाग आणि लकडगंज झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात कारवाई करण्यात आली. गांधीबाग झोन अंतर्गत बजेरिया येथील क्रीष्णा किराणा स्टोअर्स या दुकानांविरूध्द प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसुल केला. लकडगंज झोन अंतर्गत भरतवाडा येथील राजेन्द्र मेन्स वेअर या दुकानाविरूध्द प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसुल केला.
त्याचप्रमाणे धरमपेठ झोन अंतर्गत राजकमल कॉम्प्लेक्स, पंचशिल नगर येथील AEON IAS Academy यांच्याविरुध्द परवानगीशिवाय मेट्रोच्या पिल्लरवर फलक/होर्डिंग्ज लावल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसुल केला. धंतोली झोन अंतर्गत प्रभू नगर, न्यु मनीष नगर येथील Arya Heritage -IV यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरवून ठेवल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसुल केला. गांधीबाग झोन अंतर्गत सी.ए.रोड गांधीबाग येथील India Sun Hotel यांच्याविरुध्द रस्त्याच्या कडेला असलेला कालवा अडविल्यामुळे आणि हॉटेलमधील कचरा रस्त्यालगत पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसुल केला. तसेच आशिनगर झोन अंतर्गत वैशाली नगर येथील Success Study Point यांच्याविरुध्द परवानगीशिवाय इलेक्ट्रीक खांबावर फलक/होर्डिंग्ज लावल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसुल केला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
1600 लोकांकडून 37 लाखांचा दंड वसूल
सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळ्या जागेवर बांधकामाचे साहित्य साठविल्याचा फटका गेल्या दोन महिन्यांत 1600च्या वर लोकांना बसला आहे. या लोकांकडून मनपाच्या उपद्रव शोध पथकाने दंडात्मक कारवाई करून 37 लाख रुपयांचा महसूल गोळा केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या