एक्स्प्लोर

Nagpur Corona : जिल्ह्यात 95 नवे कोरोना बाधित; 7 रुग्णालयात भरती

नागपूर जिल्ह्यात गुरुवारी 95 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली. तसेच 7 बाधितांना रुग्णालयात भरती करण्यात आले. आगामी काळात रुग्णसंख्येचा स्फोट होण्याची शक्यता असल्याचा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

नागपूरः गेल्या काही दिवसांपासून घसरणाऱ्या कोरोनाच्या ग्राफने गुरुवारी भरारी घेतली आहे. आज नागपूर जिल्ह्यात दिवसभरात 95 नवे बाधितांची नोंद झाली. यापैकी 7 बाधितांवर रुग्णालयात उपचार सुरु असून 343 बाधित गृहविलगीकरणात आहेत. जिल्ह्यातील एकूण बाधित संख्या 350 वर पोहोचली आहे.

जिल्ह्यात 350 पॉझिटिव्ह
 
गुरुवारी प्राप्त दैनिक अहवालानुसार शहरात 51 तर ग्रामीणमध्ये 44 नवीन अशा एकूण 95 नवीन कोरोना पॉझिटिव्ह बाधितांची नोंद झाली. तर गुरुवारी एकूण 41 बाधितांनी कोरोनावर मात केली. यात शहरातील 24 तर ग्रामीणमधील 17 बाधितांचा समावेश आहे. तर शहरात सध्या एकूण 350 बाधित सक्रिय आहेत.

7 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णालयात

एकूण 350 अॅक्टिव्ह बाधितांपैकी 7 बाधितांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. यात शासकीय वैद्यकीय रुग्णालय, सेव्हन स्टार हॉस्पिटल, किंग्सवे हॉस्पिटलमध्ये प्रत्येकी एक तर मेडीट्रिना रुग्णालयात 3 आणि रेल्वे हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाला भरती करण्यात आले आहे. तर उर्वरित 343 बाधित गृहविलगीकरणात आहेत.

शुक्रवारी मनपा आरोग्य केन्द्रांमध्ये केवळ कोव्हॅक्सीन

नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील लसीकरण केंद्रांवर आता दिवसनिहाय वेगवेगळी लस देण्यात येत आहे. त्यामुळे शुक्रवारी 24 जून रोजी मनपाच्या सर्व लसीकरण केंद्रांवर केवळ कोव्हॅक्सीन लस उपलब्ध राहणार आहे. लस सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत देण्यात येणार आहे. लसीकरणसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येईल. तसेच लस घेण्यासाठी जाताना सोबत नोंदणी केलेला मोबाईल आणि ओळखपत्र बाळगावे, असे आवाहन मनपाच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आलेले आहे. 

ज्येष्ठांसाठी बुस्टर डोस उपलब्ध

मनपा केन्द्रात 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना तथा आरोग्य सेवकांना बुस्टर डोज दिल्या जाईल. तसेच 18 ते 59 वर्ष वयोगटातील नागरिकांना खाजगी रुग्णालयात बुस्टर डोज शासकीय दराप्रमाणे दिल्या जाईल.

वाचा

Nagpur : राजकीय अस्थिरता, मेडिकलमधील रोबोटिक सर्जरी युनिटसाठी निधी; चार आठवड्यांचा वाढीव अवधी

Nagpur Crime : सिगारेटच्या वादातून सेवानिवृत्त जवानाचा गोळीबार, गुन्हा दाखल

महत्त्वाच्या बातम्या

Gadchiroli Accident News: आई-वडील शेतातील कामात व्यस्त; आंघोळीसाठी नदीवर गेले अन्...; पाण्याचा अंदाज न आल्याने ३ चिमुकल्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
आई-वडील शेतातील कामात व्यस्त; आंघोळीसाठी नदीवर गेले अन्...; पाण्याचा अंदाज न आल्याने ३ चिमुकल्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Jalgaon Rain: पाच तास झाडावर जीव मुठीत धरून बसले; नाग झाडावर चढताच फांद्या तोडून खाली फेकले; जळगावात पुरात अडकलेल्या नागरिकाने सांगितला थरारक अनुभव
पाच तास झाडावर जीव मुठीत धरून बसले; नाग झाडावर चढताच फांद्या तोडून खाली फेकले; जळगावात पुरात अडकलेल्या नागरिकाने सांगितला थरारक अनुभव
Maharashtra Live blog updates: आंघोळीसाठी गेलेले 3 विद्यार्थी बुडाले; गडचिरोलीतील हृदय पिळवटून टाकणारी घटना
Maharashtra Live blog updates: आंघोळीसाठी गेलेले 3 विद्यार्थी बुडाले; गडचिरोलीतील हृदय पिळवटून टाकणारी घटना

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Crime News: लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
jantar mantar viral girl : इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
Embed widget