Nitish Kumar : नितीश कुमार बिहारचे 37 वे मुख्यमंत्री, सातव्यांदा घेतली शपथ
बिहारच्या नवीन सरकारमध्ये उत्तर प्रदेशच्या धर्तीवर भाजपचे दोन उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री पदासाठी कटिहारचे चौथ्यांदा आमदार तारकिशोर प्रसाद आणि बेतियातील आमदार रेणू देवी हे मुख्य दावेदार आहेत.
पाटना : नितीशकुमार यांनी आज बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची सातव्यांदा शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि सुशील मोदी यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. विरोधी पक्षातील महागठबंधनने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता.
नितीशकुमार यांच्यासमवेत दोन उपमुख्यमंत्री
बिहारच्या नवीन सरकारमध्ये उत्तर प्रदेशच्या धर्तीवर भाजपचे दोन उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री पदासाठी कटिहारचे चौथ्यांदा आमदार तारकिशोर प्रसाद आणि बेतियातील आमदार रेणू देवी हे मुख्य दावेदार आहेत. तारकीशोर प्रसाद यांना भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते आणि रेणू देवी यांची उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे. नितीशकुमार यांच्याशिवाय एनडीएतील चार घटक पक्ष भाजप, जेडीयू, हम पार्टी आणि व्हीआयपी नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.
मंत्रिमंडळात जेडीयूचे नेते
विजय चौधरी विजेंद्र यादव अशोक चौधरी मेवालाल चौधरी शीला मंडल
नितीश मंत्रिमंडळात सामील होणारे भाजप नेते
तारकिशोर प्रसाद- उपमुख्यमंत्री रेणू देवी- उपमुख्यमंत्री मंगल पांडे रामप्रीत पासवान नंद किशोर यादव- सभापती जीवेश कुमार मिश्रा
इरत नेते
संतोष मांझी मुकेश सहनी
नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात यावेळी उपमुख्यमंत्रीपदावरून सुशील कुमार मोदी यांचं नाव वगळण्यात आलं आहे. तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी हे बिहारचे उपमुख्यमंत्री असतील. त्याचबरोबर बिहार विधानसभेचे सभापतीही भाजपचे असतील. नंद किशोर यादव हे सभापती होतील हे निश्चित आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- बिहारच्या मुख्यमंत्री पदाची धुरा नितीश कुमारांकडेच; एनडीएच्या विधीमंडळ नेतेपदी निवड
- बिहार निवडणुकांच्या निकालानंतर नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदासंबंधी केलं मोठं वक्तव्य ; म्हणाले..
- बिहारच्या 37 व्या मुख्यमंत्र्याच्या रुपात सातव्यांदा शपथ घेणार नितीश कुमार, जाणून घ्या त्यांच्या या आधीच्या शपथांविषयी