Coldplay Concert : कोल्ड प्ले कार्यक्रमामुळे मुंबई-पुणे हायवे अनेक तासांपासून जाम, रुग्णवाहिकांसह मंत्र्याची गाडीही अडकली
Coldplay Concert in Mumbai : कोल्ड प्ले कार्यक्रमामुळे मुंबई - पुणे हायवे गेल्या अनेक तासापासून वाहतूक कोंडी पाहायला मिळतेय.
Coldplay Concert in Mumbai : कोल्ड प्ले कार्यक्रमामुळे मुंबई - पुणे हायवे गेल्या अनेक तासापासून जाम झालाय. दोन्ही मार्गीकेवर प्रचंड वाहतूक कोंडी झालीये. तुर्भे ते खारघर असे 8 ते 10 किलो मीटर पर्यंत वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. वाहतूक कोंडीचा फटका राज्य सरकार मधील मंत्री महोदयांना बसलाय. पुणेला जाणाऱ्या मार्गीकेवर मंत्र्यांना वाहतूकीचा फटका बसला असून त्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. अनेक रुग्णवाहिका या वाहतूक कोडींत अडकल्या आहेत.
कोल्ड प्ले कार्यक्रमामुळे मुंबई - पुणे हायवे गेल्या अनेक तासापासून जाम
दोन्ही मार्गीकेवर प्रचंड वाहतूक कोंडी
तुर्भे ते खारघर असे 8 ते 10 किलो मीटर पर्यंत वाहतूक कोंडी
वाहतूक कोंडीचा फटका राज्य सरकार मधील मंत्री महोदयांना
पुणेला जाणाऱ्या मार्गीकेवर मंत्र्याना वाहतूक कोंडीचा फटका
अनेक अॅब्म्युलन्स वाहतूक कोणीच अडकल्या
नवी मुंबईतील डी.वाय पाटील स्टेडियमवर शो सुरु
जगप्रसिद्ध 'कोल्डप्ले' या म्युझिकल बँडच्या वर्ल्ड टूरचे भारतातील शो आजपासून सुरु झाले आहेत. नवी मुंबईतील डी.वाय पाटील स्टेडियमवर 18, 19 आणि 21 जानेवारी 2025 रोजी कोल्डप्लेचा कार्यक्रम असणार आहे. 'कोल्डप्ले' रॉकबँडचा हा ठरणार शेवटचा लाईव्ह शो होणार असल्याचे बोलले जात आहे. या वर्ल्ड टूअरनंतर कोल्डप्ले निवृत्त होणार अशी चर्चा रंगली होती.
कोल्डप्ले तिकिटांची चढ्या दराने विक्री
कोल्डप्ले च्या मुंबईतील शोसाठी लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मात्र, त्याच वेळी या शो च्या तिकीटांची चढ्या दराने विक्री करण्यात आल्याने संताप व्यक्त करण्यात येत होता. बुक माय शोच्या साईटवरुन तिकीट बूक होत नाहीत, तर दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर ब्लॅक मार्केटमध्ये लाखो रुपयांना ही तिकिट विकली जातात, असा आरोपही मनसेने केला होता.
खास मैत्रिणीमुळे ओळख; क्रिकेटमुळे जुळून आलं; रिंकू सिंह-प्रिया सरोज एकमेकांच्या संपर्कात कसे आले? https://t.co/hnyOjx09sC#RinkuSinghEngagement #priyasarojmp #cricket
— ABP माझा (@abpmajhatv) January 18, 2025
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत #Pakistan https://t.co/kOFP9vuyHD
— ABP माझा (@abpmajhatv) January 18, 2025
इतर महत्त्वाच्या बातम्या