नाशिक जिल्ह्यात यंदा पावसानं 'पटर्न' बदलला! दुष्काळी भागात अतिवृष्टी तर सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या ठिकाणी ओढ
नाशिक जिल्ह्यात यंदा पावसानं 'पटर्न' बदलल्याचे पाहायला मिळत आहे. कायम दुष्काळी भाग समजल्या जाणाऱ्या भागात अतिवृष्टी झालीय तर सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या ठिकाणी मात्र पावसाने ओढ दिली आहे.
![नाशिक जिल्ह्यात यंदा पावसानं 'पटर्न' बदलला! दुष्काळी भागात अतिवृष्टी तर सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या ठिकाणी ओढ Rains change pattern in Nashik district this year Rain in dry parts of Nashik district नाशिक जिल्ह्यात यंदा पावसानं 'पटर्न' बदलला! दुष्काळी भागात अतिवृष्टी तर सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या ठिकाणी ओढ](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/09/24224340/farm-maharashtra.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नाशिक : जिल्ह्यातील पावसाचा पॅटर्न यंदाच्या वर्षी बदलला आहे. दरवर्षी पावसाची पावसाची ओढ असणाऱ्या मनमाड, चांदवड भागात अतिवृष्टी झालीय तर पावसाचा प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ईगतपुरी त्र्यंबकेशवर तालुक्यात पावसाचे प्रमाण तुलनेने कमी आहे. महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निसर्गाने उधळण केलेला नाशिक जिल्ह्यातील ईगतपुरी त्र्यंबकेश्वर या दोन तालुक्यात दरवर्षी सर्वाधिक आपाऊस पडतो. मात्र, यंदा इथला मॉन्सून पॅटर्न बदलला आहे.
या ठिकाणी मागील वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत कमी पर्जन्यमान झालंय. तर वारंवार टंचाईचे भाव म्हणून ओळखले जाणारे सिन्नर, चांदवड देवळा, मालेगाव या तालुक्यता धो धो पाऊस झालाय. त्यामुळे ज्या भागात ऐन पावसाळ्यात टँकरची सोय करावी लागते तिथे यंदा ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. म्हणूनच प्रशासनाने पंचनामे सुरू केले असून क्रॉप पॅटर्न बदलण्याचं शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.
नाशिकमधील शेतकऱ्याचे 4 एकर कोथिंबीरीतून 12 लाखांचे विक्रमी उत्पन्न
ईगतपुरी तालुक्यात मागील वर्षी 5 हजार 205 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती तर यंदा केवळ 3725 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात 3 हजार 819 मिलीमीटर मागील वर्षी होता. यंदा 1 हजार 364 मिलीमीटर झालाय. पेठ तालुक्यात 3 हजार 252 मिलीमीटर मागील वर्षी तर यंदा केवळ 1 हजार 536 मिलीमीटर नोंद झालीय.तर दुसरीकडे नंदगव तालुक्यात मागील वर्षी 525 मिलीमीटर पावसाची नोंद होती यंदा 806 आहे. मालेगाव मध्ये 571 मागील वर्षी तर यंदा 825 मिलीमीटर पाऊस पडला आहे. गेल्या काही दिवसांपासून हवामानात होणारे बदल ही प्रमुख कारणं यामागे असल्याच अभ्यासक सांगतात. वाऱ्यांची दिशा, वेग बदलला आहे. समुद्राचे तपमान बदलले. जमिनीकडून समुद्राकडे येणारे आणि समुद्राकडून जमिनीकडे येणाऱ्या वाऱ्यांचे वेळ बदलली आहे. अशा अनेक कारणांचा एकत्रित परिणाम आता जाणवू लागला आहे.
सध्या सर्वत्र होणारी ढगफुटी हाही हवामान बदलांचा परिणाम असल्याच तज्ञ मानतात. त्यामुळे येत्या काळात हवामान बदलाचे परिणाम प्रकर्षाने जाणवण्याची शक्यता असल्यानं याबाबत प्रशासनाने सतर्क राहण्याची गरज आहे.
Loss of farmers | स्पेशल रिपोर्ट | पावसानं सोन्यासारख्या पिकांची माती केली!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)