एक्स्प्लोर
पोलीस कॉन्स्टेबलचा 15 वर्षीय गतीमंद मुलीवर बलात्कार
नाशिक: मुंबई पोलिसात कार्यरत असणाऱ्या कॉन्स्टेबलनं 15 वर्षीय गतीमंद मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नाशकातल्या दिंडोरीमध्ये घडली. गोरख शेखरे असं या आरोपी पोलिसाचं नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.
मुंबईतल्या भायखळा पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल असलेला गोरख हा दिंडोरी तालुक्यातील मोहाडी गावी सुट्टीवर आला होता. सोमवारी रात्री घराबाहेर भांडी घासत असताना गोरखनं पीडितेला उचलून नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला.
मुलगी बेपत्ता झाल्याचं लक्षात आल्यावर गावकऱ्यांनी शोधाशोध सुरु केली. त्यावेळी आरोपी गोरख मुलीसोबत आढळून आला. यानंतर ग्रामस्थांनी गोरखला पकडून दिंडोरी पोलिसांच्या हवाली केलं. आरोपी गोरखवर पॉस्को अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून. ७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, यापूर्वीही मुंबईत दारु पिऊन गैरवर्तन केल्यामुळं गोरखवर पोलीस खात्यातर्फे कारवाई करण्यात आली होती. अशी माहिती समजते आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement