एक्स्प्लोर

पैलवान सख्खे भाऊ एकाच महिन्यात विधानपरिषदेवर!

नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेचे किशोर दराडे दहा हजारांपेक्षा जास्त मतांनी विजयी झाले.

नाशिक: नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपसह काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना धोबीपछाड देत भगवा फडकावला. शिवसेनेचे किशोर दराडे दहा हजारांपेक्षा जास्त मतांनी विजयी झाले. किशोर दराडे यांना 24  हजार 369 मतं मिळाली. तर दुसऱ्या क्रमांकावरील काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत टीडीएफचे उमेदवार संदीप बेडसे यांना 13 हजार 830 मतांवर समाधान मानावं लागलं. तर भाजपचे अनिकेत पाटील तिसऱ्या स्थानावर फेकले गेले. एक महिन्यापूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत किशोर दराडे यांचे मोठे बंधू नरेंद्र दराडे विजयी झाले होते. आज एक महिन्याच्या अंतराने एकाच घरात दोन आमदार झाले असून, दोघेही वरीष्ठ सभागृहात म्हणजेच विधानपरिषदेत दिसणार आहेत. दोन भाऊ विधानपरिषदेच्या सभागृहात एकाच वेळी जाण्याची बहुदा पहिलीच वेळ आहे. याआधी दोघेही नाशिक जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात होते. दोघेही एकेकाळचे पैलवान असून, आता त्यांनी विधानपरिषदेचा राजकीय आखाडाही गाजविला. दोघांच्या  विजयाने शिवसेनेची विधीमंडळातील ताकद वाढली आहे. ‘पैलवान हुशार असतो, ऐनवेळी डाव टाकतो’ अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित आमदार किशोर दराडे यांनी ‘एबीपी माझा’ला दिली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली उत्तर महाराष्ट्रमधील सर्व मंत्री, आमदार, खासदार यांची बैठक घेऊन रणनीती आखली होती. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वतः नाशिकमध्ये येऊन आढावा घेतला होता. भाजपने निवडणूक प्रतिष्ठेची करूनही भाजपचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेल्यानं, भाजप विषयीचा रोष मतपत्रिकेतून दिसून येत आहे. तर दुसरीकडे पराभूत उमेदवार संदीप बेडसे यांनी हा ‘धनशक्ती’चा विजय असल्याची टीका केली. पैसे आणि पैठणी वाटल्याने समोरचा उमेदवार विजयी झाला. लोकशाहीचा हा पराभव आहे, असं संदीप बेडसे म्हणाले. चार निकाल कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपच्या निरंजन डावखरे यांनी विजय मिळवला. मुंबई पदवीधरमध्ये शिवसेनेच्या विलास पोतनीस यांनी बाजी मारली. तर मुंबई शिक्षक मतदारसंघात लोकभारतीचे कपिल पाटील यांनी विजयी हॅटट्रिक केली. तिकडे नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेनेच्या किशोर दराडेंनी मोठा विजय मिळवला. संबंधित बातम्या  विधानपरिषद निकाल: शिक्षक आणि पदवीधर निवडणूक संपूर्ण निकाल   कोकण पदवीधर: 23 तासांनी निकाल, निरंजन डावखरेंचा विजय!   मुंबई पदवीधरमध्ये शिवसेना, तर शिक्षक मतदारसंघात कपिल पाटील विजयी  
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024: महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकालाची शक्यता, राज्यातील या 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकाल? राज्यातील 'या' 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Embed widget