Agnipath : नाशिकमध्ये अग्निपथ योजनेविरोधात विद्यार्थी संघटना रस्त्यावर, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Nashik News : नाशिकमध्ये एआयएसएफ, एआयवायएफ या विद्यार्थी संघटनांनी अग्निपथ योजनेविरोधात जोरदार आंदोलन केले.
![Agnipath : नाशिकमध्ये अग्निपथ योजनेविरोधात विद्यार्थी संघटना रस्त्यावर, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन Nashik News Agnipath Student Union on the road against Agneepath scheme in Nashik statement to District Collector Agnipath : नाशिकमध्ये अग्निपथ योजनेविरोधात विद्यार्थी संघटना रस्त्यावर, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/22/d35c0605dbc0b13f9bfba87a052e65ec_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नाशिक : केंद्र सरकारने लष्करभरतीसाठी नवीन अग्निपथ योजनेची मोठी घोषणा केली आहे. मात्र, या योजनेविरोधात राज्यभर आंदोलने सुरू आहेत. यात विद्यार्थी संघटना देखील रस्त्यावर उतरल्या आहेत. नाशिकमध्ये देखील विद्यार्थी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.
केंद्र सरकारने भारतीय सैन्यदल भरती प्रक्रियेत नव्याने लागू केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेविरोधात देशभर युवकांमध्ये असंतोषाचे वातारण आहे. केंद्र सरकारने लष्करभरतीची तयारी करणाऱ्या तरुणांचा अपेक्षाभंग केला असून केवळ चार वर्षांसाठी लष्करभरतीसाठी नवीन अग्निपथ योजना आणली आहे.
या अग्निपथ योजनेची संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी नुकतीच घोषणा केली आहे. मात्र, या योजनेला देशभरातून प्रचंड विरोध होत आहे. या आंदोलनाचे पडसाद बुधवारी नाशिक शहरात पाहायला मिळाले. एआयएसएफ, एआयवायएफ या विद्यार्थी संघटनांनी अग्निपथ योजनेविरोधात जोरदार आंदोलन केले.
अनेक ठिकाणी या असंतोषाचे हिंसेत रूपांतर होऊन परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत आहे. सैन्यदलात चार वर्षांचे कंत्राट लागू करून आपण भारतीय सार्वभौमत्वासोबत समझोता करत आहोत, प्रस्तावित अग्निपथ योजना ही देशविरोधी असून आधीच बेरोजगारीच्या बोजाखाली दबलेल्या तरुणांना निराशेच्या गर्तेत ढळणार आहे, या अनुषंगाने आंदोलन करत आंदोलन कर्त्यांनी सांगितले.
विद्यार्थी संघटनेच्या मागण्या
सैन्य दलातील पदांचे कंत्राटीकरण करणारी अग्निपथ ही योजना मागे घ्यावी, तसेच जुनी भरती प्रक्रिया पूर्ववत करावी. सैन्य दलात 1.25 लाख व अर्ध सैनिक तसेच निमलष्करी दलात 75 हजार अशी एकुण 2 लाख रिक्त पदे पुर्ण वेळ त्वरित भरावीत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)