एक्स्प्लोर

VIDEO Narhari Zirwal : मी त्याचा बाप, तो माझा बाप नाही, गोकुळ माझ्या शब्दाबाहेर नाही; मुलाच्या भूमिकेवर नरहरी झिरवाळ काय म्हणाले?

Narhari Zirwal Dindori Politics : गोकुळ झिरवाळांनी नरहरी झिरवाळांच्या विरोधात निवडणूक लढवण्यास तयार असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यावर नरहरी झिरवाळांनी प्रतिक्रिया दिली.

नाशिक : गोकुळ हा माझा मुलगा आहे, तो माझा बाप नाही तर मी त्याचा बाप आहे, त्यामुळे तो माझ्या शब्दाबाहेर नाही असं मोठं वक्तव्य राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी केलं. गोकुळची चिंता कुणीही करू नये, तो अजून आज्ञाधारक आहे असंही ते म्हणाले. नरहरी झिरवाळांचा मुलगा गोकुळ झिरवाळ (Gokul Zirwal) यांनी शरद पवार गटातून वडिलांच्या विरोधात निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावर नरहरी झिरवाळ यांनी प्रतिक्रिया दिली. 

माझी छाती फाडाल तर त्यामध्ये शरद पवारच दिसतील, पवारांनी जर संधी दिली तर मी वडिलांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवणार असं वक्तव्य गोकुळ झिरवाळ यांनी केलं होतं. त्यावर बोलताना नरहरी झिरवाळ म्हणाले की, गोकुळ फक्त त्या ठिकाणी सत्कार करायला गेला होता आणि त्याची उमेदवारी जाहीर केली. त्याची मी समज घातलीय. अजून तो आज्ञाधारक आहे, मी सुद्धा आज्ञाधारक. गोकुळची चिंता तुम्ही करू नका. माझ्या शब्दाबाहेर जाणार नाही. 

शरद पवारांच्या स्टेजवर गेल्यानंतर गोकुळने कुठेच वावगा शब्द काढला नाही, त्याने चांगलं बोललं त्याचा अभिमान असल्याचं नरहरी झिरवाळ म्हणाले. 

बापच डोकेबाज आहे, पोरगा त्याच्या पुढचा

गोकुळ झिरवाळांनी निवडणुकीसंदर्भात घेतलेल्या भूमिकेवर नरहरी झिरवाळ म्हणाले की, त्याचा बापच डोकेबाज आहे, माझा पोरगा जरासा होईना वरचढ असेलच की. म्हणजे सांगायचं इकडे आणि जायचं तिकडे अशातले आम्ही आहोत. 

आपण नेहमी अजित पवारांसोबतच

काही झालं तरी आपण शेवटपर्यंत अजित पवारांसोबत राहणार असल्याचं नरहरी झिरवाळ म्हणाले. ते म्हणाले की, मी  तिसऱ्यांदा निवडून आलोय. पहिल्यापासून मी तिथेच आहे, यापुढेही तिथेच राहणार. मी शेवटपर्यंत अजितदादांसोबतच राहणार आणि त्यांच्यासोबतच निवडणूक लढवणार. 

स्थानिक उमेदवाराचा फायदा लोकसभेला झाला आणि त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराचा पराभव झाला असं नरहरी झिरवाळ म्हणाले. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election 2024: व्हॅनमध्ये तब्बल 6500 किलो चांदीच्या विटा, पोलिसांच्याही भुवया उंचावल्या; पाहा फोटो
Election 2024: व्हॅनमध्ये तब्बल 6500 किलो चांदीच्या विटा, पोलिसांच्याही भुवया उंचावल्या; पाहा फोटो
Amit Shah : ओबीसी आणि दलितांचे आरक्षण कमी करून मुस्लिमांना देण्याचा मविआचा घाट; अमित शाहांचा गंभीर आरोप
ओबीसी आणि दलितांचे आरक्षण कमी करून मुस्लिमांना देण्याचा मविआचा घाट; अमित शाहांचा गंभीर आरोप
Dhananjay Mahadik : लाडक्या बहिणींना जाहीर धमकी, खासदार धनंजय महाडिकांच्या अडचणी वाढल्या! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
लाडक्या बहिणींना जाहीर धमकी, खासदार धनंजय महाडिकांच्या अडचणी वाढल्या! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
श्रीरामपूर विधानसभेत नवा ट्विस्ट, विखे पाटलांचा शिंदेंच्या उमेदवाराला थेट इशारा, आता मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
श्रीरामपूर विधानसभेत नवा ट्विस्ट, विखे पाटलांचा शिंदेंच्या उमेदवाराला थेट इशारा, आता मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narendra Modi on Rahul Gandhi : राहुल गांधींना बाळासाहेब ठाकरेंच्या विचारधारेचं कौतुक करुन दाखवावंManoj Jarange Full PC:  मविआ , महायुती ,अपक्ष कोणालाही माझा पाठिंबा नाहीOm Raje Nibalkar -Sharad Pawar :  सरकार बदलल्याशिवाय मी म्हातारा होणार नाही - शरद पवारAmit Shah : सरकार स्थापनेसाठी उद्धव ठाकरेंची मदत घेण्याचा प्रश्नच नाही,अमित शाहांचं स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election 2024: व्हॅनमध्ये तब्बल 6500 किलो चांदीच्या विटा, पोलिसांच्याही भुवया उंचावल्या; पाहा फोटो
Election 2024: व्हॅनमध्ये तब्बल 6500 किलो चांदीच्या विटा, पोलिसांच्याही भुवया उंचावल्या; पाहा फोटो
Amit Shah : ओबीसी आणि दलितांचे आरक्षण कमी करून मुस्लिमांना देण्याचा मविआचा घाट; अमित शाहांचा गंभीर आरोप
ओबीसी आणि दलितांचे आरक्षण कमी करून मुस्लिमांना देण्याचा मविआचा घाट; अमित शाहांचा गंभीर आरोप
Dhananjay Mahadik : लाडक्या बहिणींना जाहीर धमकी, खासदार धनंजय महाडिकांच्या अडचणी वाढल्या! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
लाडक्या बहिणींना जाहीर धमकी, खासदार धनंजय महाडिकांच्या अडचणी वाढल्या! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
श्रीरामपूर विधानसभेत नवा ट्विस्ट, विखे पाटलांचा शिंदेंच्या उमेदवाराला थेट इशारा, आता मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
श्रीरामपूर विधानसभेत नवा ट्विस्ट, विखे पाटलांचा शिंदेंच्या उमेदवाराला थेट इशारा, आता मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
मुंबईत मनसेचा शिवसेना शिंदेंच्या उमेदवारास पाठिंबा, कर्जतसह 3 मतदारसंघात घेतली भूमिका
मुंबईत मनसेचा शिवसेना शिंदेंच्या उमेदवारास पाठिंबा, कर्जतसह 3 मतदारसंघात घेतली भूमिका
Maha Vikas Aghadi Manifesto : लाडकी बहिणवरून टीका झाली, आता योजनांवर पैसा कोठून आणणार? मल्लिकार्जुन खरगेंच्या उत्तराने राऊत अन् सुप्रिया सुळेंची सुद्धा कळी खुलली!
लाडकी बहिणवरून टीका झाली, आता योजनांवर पैसा कोठून आणणार? खरगेंच्या उत्तराने राऊत अन् सुप्रिया सुळेंची सुद्धा कळी खुलली!
मोदीसाहेब कर्जमाफी करणार नाहीत, ते भाषण करण्यात हुशार, पण निर्णय घेण्यात नाहीत, शरद पवारांचा टोला  
मोदीसाहेब कर्जमाफी करणार नाहीत, ते भाषण करण्यात हुशार, पण निर्णय घेण्यात नाहीत, शरद पवारांचा टोला  
MVA Election Manifesto 2024: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसने डाव टाकला, जातनिहाय जनगणनेला सुरुवात, 80 हजार कर्मचारी कामाला लावले
विधानसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसने डाव टाकला, जातनिहाय जनगणनेला सुरुवात, 80 हजार कर्मचारी कामाला लावले
Embed widget