एक्स्प्लोर
Advertisement
शिवसेनेच्या भीतीने राणेंना राज्यसभेची ऑफर : रामदास आठवले
शिवसेना राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची भीती असल्यानेच भाजपने नारायण राणे यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान न देता राज्यसभेची ऑफर दिल्याचं वक्तव केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं.
नाशिक : शिवसेना राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची भीती असल्यानेच भाजपने नारायण राणे यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान न देता राज्यसभेची ऑफर दिल्याचं वक्तव केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं. नाशिकमध्ये ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
‘नारायण राणे हे मंत्रीपदाचे दावेदार असल्याने राज्यात नाही तर केंद्रात त्यांना मंत्री करावे. त्याबाबत मी मुख्यमंत्र्यांशीही बोलणार’ अशी मागणीही आठवले यांनी केली.
दरम्यान, आगामी निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप यांनी एकत्र लढावं असा पुनरुच्चारही आठवलेंनी केला.
VIDEO :
नारायण राणेंना भाजपची ऑफर अमान्य?
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांना भाजपने राज्यसभेची उमेदवारी देऊ केली असली, तरी स्वत: राणे त्याबाबत इच्छुक नसल्याचं सांगण्यात येत आहे. सूत्रांनी याबाबतची माहिती दिली.
इतकंच नाही तर राणेंचे सुपुत्र आमदार नितेश राणे यांनीही तसं ट्विट करुन, राणेंनी महाराष्ट्रातच थांबावं, दिल्लीत जाऊ नये असं म्हटलं आहे.
त्यामुळे भाजप नारायण राणेंचं पुनर्वसन कुठे आणि कसं करणार याबाबतची चर्चा आता रंगू लागली आहे.
नितेश राणे यांचं ट्विट
दरम्यान, नारायण राणेंना भाजपने दिलेल्या ऑफरनंतर नितेश राणे यांनी ट्विट केलं.
“महाराष्ट्राच्या राजकारणात राणेसाहेबांची गरज आहे. अजून बराच काळ ते महाराष्ट्रातच रहावेत अशी आमच्यासारख्या हितचिंतकांची इच्छा आहे. आम्ही त्यांना विधानसभेत पाहू इच्छितो, राज्यसभेत नाही. आशा आहे ते समजून घेतील”, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. मला भाजपकडून राज्यसभेची ऑफर: नारायण राणे मला मंत्रिपद देण्याबाबत विलंब का होतोय, याबाबतची माहिती मुख्यमंत्र्यांना विचारा. मला त्याबाबत माहिती नाही. भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याशी दिल्लीत चर्चा झाली. मला भाजपकडून राज्यसभेची ऑफर आहे, अशी माहिती महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी दिली. ते एबीपी माझाशी बोलत होते. संबंधित बातम्या : नारायण राणेंना भाजपची ऑफर अमान्य? मला भाजपकडून राज्यसभेची ऑफर: नारायण राणे नारायण राणे भाजपची खासदारकीची ऑफर मान्य करतील? दिल्लीत राणे-फडणवीस एकत्र, मंत्रिपदावर निर्णयाची शक्यता दिल्लीत अमित शाह, मुख्यमंत्री आणि राणेंची बैठक, मंत्रिपदावर खलबतं?Wellwishers like us want Rane Saheb to be in state politics for longer time..Maharashtra needs him more..We want to see him in The Vidhan sabha n not the Rajya sabha..hope he considers!Fingers Crossed!! #RaneforMaharashtra
— nitesh rane (@NiteshNRane) March 3, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement