एक्स्प्लोर
नाशिकमध्ये 12 हजार झाडांचं बर्थडे सेलिब्रेशन
नाशिक : जागतिक पर्यावरण दिनाच औचित्य साधून नाशिकमध्ये 12 हजार झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. नाशिकची देवराई म्हणून उदयास आलेल्या सातपूर परिसरातील फाशीच्या डोंगरावर 2 वर्षापूर्वी आपल पर्यावरण संस्था आणि वनविभागाच्या माध्यमातून 15 हजार नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी 12 हजार वृक्षाची लागवड केली होती.
नाशिक शहराच्या इतिहासात प्रथमच एकाच दिवसात एवढ्या मोठ्या संख्येने रोपे नाशिककरांनी लावत विक्रम केला होता. ज्यामध्ये बेहडा, डांबिया, भोकर यांसारख्या शेकडो दुर्मिळ प्रजातींच्या वनस्पतींची लागवड करण्यात आली होती.
'झाड़े लावा, झाडे जगवा' या संकल्पनेनुसार विविध संकटांना तोंड देत ही झाडं जगवण्यात येऊन त्यांच संवर्धन करण्यात येत आहे आणि आज पर्यावरण दिनी या झाडांना 2 वर्ष पूर्ण झाल्याने त्यांचा वाढदिवस आज साजरा करण्यात आला.
झाडांभोवती रांगोळी काढण्यात आली होती. तसेच त्यांना फुगे देखील बांधण्यात आली होती. 2 वर्षापूर्वी आपण लावलेल्या झाडांची वाढ बघण्यासाठी नागरिकांनी सहकुटुंब आपली हजेरी लावली होती. तसेच झाडांना पाणी घालण्यासाठी प्रत्येकाच्या हातात पाण्याच्या टाकी दिसून येत होती.
पर्यावरणाच महत्व पटवून देण्यासाठी अनेक शाळेच्या विद्यार्थ्यांना देखील इथे आणून प्रशिक्षण दिले जात होते. केवळ वृक्षारोपणाचा ‘इव्हेंट’ न करता लावलेली झाडे जगवण्याची जिद्द प्रत्येकाच्या मनात निर्माण व्हावी, हाच आजच्या या कार्यक्रमामागे मुख्य उद्देश होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement