National Youth Festival : स्वामी विवेकानंद, त्र्यंबकेश्वर, रामकुंड अन्...; नाशकात साकारलेली हटके कलाकृती वेधतेय सर्वांचे लक्ष
Nashik News : 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन नाशिकमध्ये करण्यात आले आहे. दिल्लीच्या कलाकारांनी नाशिकमध्ये 7 कंटेनरवर हटके कलाकृती साकारली आहे. ही कलाकृती सर्वांचे लक्ष वेधते आहे.
National Youth Festival नाशिक : यंदा 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचा (National Youth Festival) बहुमान नाशिकला मिळाला आहे. त्यामुळे सर्व नाशिककरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या महोत्सवाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते होणार तपोवन (Tapovan) येथील मैदानावर होणार आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जय्यत तयारी केली जात आहे. युवा महोत्सवानिमित्ताने नाशिक शहराचे (Nashik City) सुशोभीकरण करण्यात आले आहे. ठिकठिकाणी साफसफाई, रंगरंगोटी तर करण्यात आलीच आहे. यासोबतच काहीशा हटके आणि सुंदर अशा कलाकृती या महोत्सवानिमित्ताने बघायला मिळत आहेत.
7 कंटेनरवर साकारली कलाकृती
तपोवनात जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदींची (prime Minister Narendra Modi) सभा होणार आहे. त्या मोदी मैदानावर (Modi Maidan) मुख्य मंडपाच्या जवळच चक्क 7 कंटेनरवर साकारण्यात आलेली एक कलाकृती इथे येणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत आहे. स्वामी विवेकानंदांच्या जयंती निमित्ताने हा कार्यक्रम होत असल्याने चार कंटेनरवर विवेकानंदांचे उभे असे चित्र रेखाटण्यात आले आहे.
दिल्लीच्या कलाकारांनी साकारली कलाकृती
तर इतर कंटेनरवर त्र्यंबकेश्वर मंदिर, रामकुंड परिसर, हनुमान अशी धार्मिक नगरीवर आधारित थीम साकारण्यात आली आहे. दिल्लीच्या कलाकारांनी अवघ्या 4 दिवसात दिवसरात्र मेहनत यासाठी घेतली आहे. कंटेनरवर कलाकृती आम्ही साकारली आहे. यासाठी वॉटर कलरचा वापर करण्यात आला आहे, अशी माहिती या कलाकारांनी दिली आहे.
स्वागत करण्यासाठी नाशिककर उत्सुक
राष्ट्रीय पातळीवरचा युवा महोत्सव नाशिकमध्ये पार पडत आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते शुक्रवारी महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. आठ हजारांहून अधिक युवक या महोत्सवात सहभागी होतील. या युवकांचे स्वागत करण्यासाठी नाशिककर उत्सुक आहेत. नाशिक - छत्रपती संभाजीनगर महामार्गावर एका बाजूने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो होईल, तर दुसऱ्या बाजूला सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.
नाशिकमध्ये पंतप्रधान मोदींचा रोड शो (PM Narendra Modi road show in Nashik)
नाशिकच्या तपोवन येथील मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये दाखल झाल्यावर हेलिपॅडपासून ते कार्यक्रमळापर्यंत ते असा रोड शो करणार आहेत. राज्यातील दीड ते दोन लाख युवक-युवती त्यात सहभागी होतील.
इतर महत्वाच्या बातम्या