Nashik News : मै तो पाँच साल पहले मर चुका हूँ! PUBG च्या व्यसनाने तरुणाचा बळी, भावनिक चिठ्ठी लिहित विहिरीत उडी मारली, नाशिकमधील घटना
Nashik News : नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यातील देवळाणे येथील 18 वर्षांच्या तरुणाने विहिरीत उडी मारत आपली जीवनयात्रा संपवली आहे.

Nashik News : नाशिक जिल्ह्याच्या येवला (Yeola) तालुक्यातील देवळाणे येथील अवघ्या 18 वर्षांच्या यशराज बोर्डे या तरुणाने विहिरीत उडी मारत आपली जीवनयात्रा संपवली आहे. यशराजला पब्जी (PUBG) या मोबाइल गेमचे गंभीर व्यसन लागले होते आणि त्यामुळेच त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. (Nashik News)
विशेष म्हणजे, यशराजने जीवनयात्रा संपवण्यापूर्वी एक भावनिक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्या चिठ्ठीत त्याने आपल्या मानसिक अवस्थेबद्दल लिहिलं असून, त्यातून तो खूपच निराश आणि तणावात असल्याचं दिसून येतं. दरम्यान या घटनेची माहिती येवला तालुका पोलिसांना समजताच त्यांनी तातडीने मृतदेह पाण्याच्या बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालय येवला या ठिकाणी शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
या घटनेची येवला तालुका पोलिसात (Yeola Police Station) अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे येवल्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. घरात एकुलता एक असलेल्या यशराजने चार दिवसांपूर्वीच धानोरेतील महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. वडिलांचे दुचाकीचे गॅरेज होते. यशराजचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढल्यानंतर आई-वडिलांनी एकच हंबरडा फोडल्याचे पाहायला मिळाले.
सुसाइड नोटमधील मजकूर
मैने जो किया वो पहली बार नहीं है। मैने बहोत बार ये कोशिस की है लेकिन आज तक कामयाब नहीं हुआ | लेकिन आज ऐसा लगता है मै आज कामयाब हो जाऊंगा | मै तो पाँच साल पहले मर चुका हूँ | बस मेरा शरीर जिंदा है। मेरे दिमाग ने बस पॉसिबिलिटी अँड इलुजन बनाये की मुझे सब कुछ मिलेगा जो चाहिए | लेकिन पाच साल बाद पता चला की मेरे दिमाग सिर्फ मेरी बॉडी जिंदा रखना चाहता है | सारी चीजे एक इलूजन थी और फेक थी | कभी कुछ ऐसा नही हुआ वैसा सोचा था | मेरा दिमाग बस मेरी बॉडी जिंदा..., असे यशराज बोर्डे याने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या























