Nashik News : मंत्री, नेत्यांनो, नाशिक शहर, जिल्ह्यात एकही कार्यक्रम करू नका, अन्यथा... सकल मराठा समाज बांधवांचे आवाहन
Nashik News : अनेक युवकांनी टोकाचे पाऊल उचलले तरी सरकारचे डोळे उघडत नाही, हे दुर्दैव आहे.

नाशिक : नाशिक शहरात, जिल्ह्यात गाव खेड्यावर मराठा समाज अत्यंत संतप्त असून आरक्षण देण्यात सरकार कसूर करीत असल्याने मराठा युवक आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहे. अनेक युवकांनी टोकाचे पाऊल उचलले तरी सरकारचे डोळे उघडत नाही, हे दुर्दैव आहे. त्यामुळे गाव शहरात मंत्री, पुढाऱ्यांना गावबंदी असतांना आमदार खासदार मंत्र्यांनी नाशिक शहर व गावात कुठलाही कार्यक्रम घेऊ नये, काही विपरीत घडल्यास राज्य सरकार जबाबदार असेल, असा इशारा नाशिक जिल्हा सकल मराठा समाज बांधवांकडून देण्यात आला आहे.
सकल मराठा समाजाचे नाशिकच्या शिवतीर्थावर गेल्या 45 दिवसापासून सुरू असलेले साखळी उपोषणकर्त्यावतीने आज उपोषण स्थळी पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत आज मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटीच्या आंदोलनात जाहीर केल्याप्रमाणे मराठा साखळी उपोषण आता आमरण उपोषण करावे, या आवाहनाला प्रतिसाद देऊन नाशिकचे उपोषणकर्ते आता आमरण उपोषणात बसले आहेत. तसेच मनोज जरांगे पाटील यांची खालावलेल्या प्रकृतीस पूर्णपणे राज्य व केंद्र सरकार जबाबदार आहेत. नाशिक शहरात, जिल्ह्यात गाव खेड्यावर मराठा समाज अत्यंत संतप्त असून आरक्षण देण्यात सरकार कसूर करत आहे. त्यामुळे गाव शहरात मंत्री, पुढाऱ्यांना गावबंदी असतांना आमदार खासदार मंत्र्यांनी नाशिक शहर व गावात कुठलाही कार्यक्रम घेऊ नये, काही विपरीत घडल्यास राज्य सरकार जबाबदार असेल, असे सांगण्यात आले आहे.
मराठा आरक्षणासाठी एकीकडे मनोज जरांगे जीवाचं रान करत असून दुसरीकडे युवक आत्महत्या करत आहे. तरीदेखील सरकारला जाग येत नाही. मराठा समाजातील युवकाच्या आत्महत्या उघडया डोळ्याने बघणाऱ्या असंवेदनशील सरकारचा धिक्कार आहे. मराठा समाजाला 40 वर्षे आरक्षणा पासून वंचित ठेवणाऱ्या सरकारने मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा अन्न पाणी सोडायला लावणे हे दुर्दैवी आहे. मनोज जरांगे आमचा मराठ्यांचा श्वास आहे. त्यांच्या प्रकृतीची जबाबदारी सरकारची आहे. मराठा तरुणांनी लढाई जारी ठेवा, आत्महत्या करू नका असे आवाहन देखील यावेळी उपोषण कर्त्यांकडून करण्यात आले. दुसरीकडे गुणरत्न सदावर्ते हे मराठ्यांच्या ओल्या जखमेवर मीठ चोळत आहेत. त्यांना वेळीच आवर घालावा, तसेच कुठल्याही नेत्याने मराठ्यांच्या गाव बंदीला आव्हान देऊ नये, जे होईल त्यास सरकार जबाबदार असेल असा इशारा देण्यात आला आहे.
नाशिकमध्ये उद्या मशाल रॅलीचे आयोजन
नाशिकच्या जिल्हा न्यायालयासमोर शिवतीर्थावर अखंडितपणे 45 दिवसापासून सुरू असलेल साखळी उपोषणाचे रूपांतर आमरण उपोषणात झाले आहे. उपोषणकर्ते नाना बच्छाव आमरण उपोषणास सकाळी बसले आहे. दरम्यान यावेळी सकल मराठा समाजावतीने पुन्हा आवाहन केले की शहरात ग्रामीण भागात कुठल्याही आमदार, खासदार, नेत्याने, मंत्र्याने कार्यक्रम घेऊ नये. आमच्या जखमेवर मीठ चोळून आमचा अंत बघू नये, यासंदर्भात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्या स्वीय सहायकास मराठा बांधवानी यावेळी आपल्या भावना,उद्विग्नय भावना सांगितल्या. यापुढं नाशिक शहर जिल्ह्यात कार्यक्रम होणार नाही ही काळजी घ्या असेही सांगितले. तसेच 30 ऑक्टोबर रोजी नाशिकच्या शिवस्मारक उपोषण स्थळापासून मराठा आरक्षणासाठी मशाल रॅली काढण्यात येणार आहे,या रैलीत मोठ्या संख्येने मराठा बंधू,भगिनी, तरुण, विद्यार्थी यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आले आहे.
इतर महत्वाची बातमी :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
