एक्स्प्लोर

Nashik News : त्र्यंबक राजाचं दर्शन झालं सोप्प, त्र्यंबकेश्वर मंदिरात आजपासून व्हीआयपी दर्शन बंद; ट्रस्टचा निर्णय 

Nashik news : आजपासून 15 सप्टेंबरपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन VIP Darshan) बंद करण्यात आले आहे.

त्र्यंबकेश्वर : अधिक मासानिमित्त (Adhik Mas) त्र्यंबकेश्वरला महादेवाच्या दर्शनासाठी रोजच भाविकांची गर्दी होत असून त्यातच व्हीआयपी दर्शनामुळे सामान्य भाविकांना याचा फटका बसत असल्याचे निदर्शनास येत होते. याच पार्श्वभूमीवर त्र्यंबक देवस्थान (Trimbakeshwer Mandir) ट्रस्टने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आजपासून 15 सप्टेंबरपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन VIP Darshan) बंद करण्यात आले आहे. मात्र, केंद्र आणि राज्यस्तरावरील राजशिष्टाचार म्हणून येणाऱ्या व्हीआयपी पाहुण्यांना दर्शन दिले जाणार आहे.

नाशिक (Nashik) जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आद्य ज्योतिर्लिंग असल्याने देश-विदेशातून लाखो भाविक येत असतात. त्यामुळे त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) हे नेहमी गजबजल्याचे दिसून येते. त्यातच यंदा अधिक मास आल्याने मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. पाऊस सुरू असतानाही भाविकांची रीघ सुरूच असल्याचे चित्र आहे. त्यातच काही दिवसांपासून व्हीआयपी दर्शनामुळे अनेकदा रांगेत उभे असलेल्या भाविकांना दर्शनासाठी बराच वेळ ताटकळत उभे राहावे लागत असल्याचे चित्र होते. तसेच सार्वजनिक सुट्ट्या आणि आगामी काळात निज श्रावणानिमित्त होणारी गर्दी लक्षात घेता आजपासून 15 सप्टेंबरपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आले आहे. 

दरम्यान या निर्णयाबाबत त्र्यंबकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षांनी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना व्हीआयपी दर्शन बंद करण्याबाबतचे पत्र दिले. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी अथवा तोंडी आदेशाने व्हीआयपी दर्शनाची सुविधा देण्यासाठी त्र्यंबकेश्वर तहसीलदार श्वेता संचेती आणि मुख्याधिकारी डॉ. श्रिया देवचके यांची नेमणूक करीत असल्याचे आणि त्यांच्यामार्फत येणाऱ्यांना व्हीआयपी दर्शन सुविधा उपलब्ध करून देण्याचे पत्र देवस्थानला दिले आहे. सर्वसामान्य भाविक हजारो रुपये खर्च करून, वेळ देऊन येथे येतो, चार ते पाच तास रांगेत उभा राहतो. मात्र, पाच सेंकदात गर्भगृहाच्या समोरून बाजूला केला जातो. त्यात 200 रुपये देऊन दोन तास रांगेत उभे राहणारेही असतात. तसेच त्र्यंबकेश्वर येथे दररोज 15 हजार भाविकांचे दर्शन होत असते, मात्र दुसरीकडे व्हीआयपी लोक दर्शनाला आल्यास सामान्य भाविकांची पंचाईत होते.

दर्शबारीत भाविकांना लाडू, बिस्किटे देणार... 

तसेच सध्या अधिक मास आणि लवकरच निज श्रावणाला देखील सुरवात होणार असल्याने दर्शनबारीतील भाविकांसाठी त्र्यम्बक देवस्थान प्रशासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दर्शनबारीत भाविकांना तासनतास उभे राहावे लागते, यात आबालवृद्धांसह लहान मुलेही उभी असतात. अशावेळी तहान लागणे, भूक लागणे अनेकदा भाविकांना त्रास सहन करावा लागतो. हा त्रास दूर करण्यासाठी मंदिर ट्रस्ट विश्वस्तांनी भाविकांसाठी दर्शनानंतर राजगिरा लाडू देण्यात येणार आहेत. तसेच रांगेत बिस्कीट पुडे, पाण्याची बाटली मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.

इतर संबंधित बातमी : 

Trimbakeshwer Mandir : त्र्यंबकेश्वर मंदिर प्रवेशाचा मुद्दा पावसाळी अधिवेशनात, डीसीएम देवेंद्र फडणवीसांचे महत्वपूर्ण वक्तव्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खाकी वर्दीत कर्तव्य पार पाडलं अन् आंदोलनासाठी आलेल्या हजारो शेतकऱ्यांची सुद्धा कोणाला कळूही न देता जेवणाची सोय; राजू शेट्टींनी सांगितला सुधाकर पठारेंचा हृदयस्पर्शी किस्सा
खाकी वर्दीत कर्तव्य पार पाडलं अन् आंदोलनासाठी आलेल्या हजारो शेतकऱ्यांची सुद्धा कोणाला कळूही न देता जेवणाची सोय; राजू शेट्टींनी सांगितला सुधाकर पठारेंचा हृदयस्पर्शी किस्सा
शक्तीपीठ महामार्ग, अजित पवारांच्या वक्तव्याविरोधात 'स्वाभिमानी'कडून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर काळी गुढी उभारत सरकारचा निषेध
शक्तीपीठ महामार्ग, अजित पवारांच्या वक्तव्याविरोधात 'स्वाभिमानी'कडून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर काळी गुढी उभारत सरकारचा निषेध
Nashik Crime : हॉर्न का वाजवतात? जाब विचारल्यानं गुंडांची सटकली, चौघांकडून ज्येष्ठ नागरिकावर जीवघेणा हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
हॉर्न का वाजवतात? जाब विचारल्यानं गुंडांची सटकली, चौघांकडून ज्येष्ठ नागरिकावर जीवघेणा हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
BEST Bus : ईदसाठी बेस्टच्या 128 जादा बसगाड्या, सुविधेचा लाभ घेण्याचं प्रशासनाचं आवाहन
ईदसाठी बेस्टच्या 128 जादा बसगाड्या, सुविधेचा लाभ घेण्याचं प्रशासनाचं आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PM Narendra Modi Nagpur Reshim Bagh :  पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरातील रेशीम बागेत, डॉ. हेडगेवार यांच्या स्मृतीला केलं अभिवादनPM Narendra Modi Nagpur :  मोदी नागपुरातील रेशीम बागेत, डॉ. हेडगेवार यांच्या स्मृतीला अभिवादनPM Narendra Modi Nagpur: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपुरात, संघ मुख्यालयात लावणार हजेरीABP Majha Marathi News Headlines 08AM TOP Headlines 08AM 30 March 2025

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खाकी वर्दीत कर्तव्य पार पाडलं अन् आंदोलनासाठी आलेल्या हजारो शेतकऱ्यांची सुद्धा कोणाला कळूही न देता जेवणाची सोय; राजू शेट्टींनी सांगितला सुधाकर पठारेंचा हृदयस्पर्शी किस्सा
खाकी वर्दीत कर्तव्य पार पाडलं अन् आंदोलनासाठी आलेल्या हजारो शेतकऱ्यांची सुद्धा कोणाला कळूही न देता जेवणाची सोय; राजू शेट्टींनी सांगितला सुधाकर पठारेंचा हृदयस्पर्शी किस्सा
शक्तीपीठ महामार्ग, अजित पवारांच्या वक्तव्याविरोधात 'स्वाभिमानी'कडून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर काळी गुढी उभारत सरकारचा निषेध
शक्तीपीठ महामार्ग, अजित पवारांच्या वक्तव्याविरोधात 'स्वाभिमानी'कडून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर काळी गुढी उभारत सरकारचा निषेध
Nashik Crime : हॉर्न का वाजवतात? जाब विचारल्यानं गुंडांची सटकली, चौघांकडून ज्येष्ठ नागरिकावर जीवघेणा हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
हॉर्न का वाजवतात? जाब विचारल्यानं गुंडांची सटकली, चौघांकडून ज्येष्ठ नागरिकावर जीवघेणा हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
BEST Bus : ईदसाठी बेस्टच्या 128 जादा बसगाड्या, सुविधेचा लाभ घेण्याचं प्रशासनाचं आवाहन
ईदसाठी बेस्टच्या 128 जादा बसगाड्या, सुविधेचा लाभ घेण्याचं प्रशासनाचं आवाहन
Tata Power : नवीन वर्षात टाटा पॉवरची मुंबईतील वीजदरात कपात, 'असे' असतील नवे वीजदर 
नवीन वर्षात टाटा पॉवरची मुंबईतील वीजदरात कपात, 'असे' असतील नवे वीजदर 
एप्रिलच्या सुरुवातीला अवकाळी पाऊस संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार: IMDचा अंदाज, कोणत्या जिल्ह्याला कधीपासून अलर्ट? वाचा सविस्तर
येत्या 3-4 दिवसात सोसाट्याचा वारा, अवकाळी पाऊस महाराष्ट्राला झोडपणार, IMDचा अंदाज, गुढीपाडव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात अलर्ट, वाचा सविस्तर
Amit Shah : 10, 20, 25 सोडून द्या, अजून कमीत कमी किती वर्ष सत्तेत राहणार? केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी थेट आकडा सांगितला!
10, 20, 25 सोडून द्या, अजून कमीत कमी किती वर्ष सत्तेत राहणार? केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी थेट आकडा सांगितला!
Video : भूकंपाने हाॅस्पिटलच्या नवजात बालक विभागात अक्षरश: तांडव, नर्स काॅटला धरून राहिली, पडली, धडपडली पण कडेवरच्या चिमुकल्याला शेवटपर्यंत सोडलं नाही!
Video : भूकंपाने हाॅस्पिटलच्या नवजात बालक विभागात अक्षरश: तांडव, नर्स काॅटला धरून राहिली, पडली, धडपडली पण कडेवरच्या चिमुकल्याला शेवटपर्यंत सोडलं नाही!
Embed widget