एक्स्प्लोर

Trimbakeshwer Mandir : त्र्यंबकेश्वर मंदिर प्रवेशाचा मुद्दा पावसाळी अधिवेशनात, डीसीएम देवेंद्र फडणवीसांचे महत्वपूर्ण वक्तव्य

Devendra Fadnavis : काही दिवसांपूर्वी नाशिकच्या (Nashik) त्र्यंबकेश्वर येथील मंदिर प्रवेश प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते.

Devendra Fadnavis : काही दिवसांपूर्वी नाशिकच्या (Nashik) त्र्यंबकेश्वर येथील मंदिर प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते. अनेक दिवस हा वाद सुरु होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर आता पावसाळी अधिवेशनात (Rainy Session) देखील फडणवीस यांनी या प्रकरणावर भाष्य केले आहे. एसआयटीकडून या प्रकरणात एका महिन्यात रिपोर्ट मागण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. 

गेल्या आठवडाभरापासून पावसाळी अधिवेशन असून आजपासून अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु झाला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वर मंदिर (Trimbakeshwer Mandir) प्रवेश प्रकरणांवर भाष्य केले. ते म्हणाले की, अशा प्रकारची परंपरा आहे का? हा वाद अजून सुरू आहे. कोणीतरी येतं आणि अशी घटना घडवत. मागील वर्षी 2022 मध्ये ही मिरवणूक ते थेट आतमध्ये घेऊन गेले. या ठिकाणी सेल्फी आणि फोटो काढण्यात आले. हा समोरून प्रकार आमच्या भावना दुखावण्याचा आहे. दोन्ही बाजूंची बैठक झाली. त्यामध्ये संबंधित समुदायाने माफी मागितली आहे. जे लोक त्या ठिकाणी होते, त्यांना नोटीस देण्यात आली.

आपल्याकडे धर्म आणि परंपरा यात अंतर आहे. जगन्नाथ रथ आजही एका मुस्लिम व्यक्तीसाठी थांबतो. आपल्याकडे अनेक प्रथा आहेत. ज्याला मनात गोविंद बाळगायचा आहे, त्यालाही कारवाईला सामोरे जावं लागेल का? असा सवाल करत पाटील यांनी राज्यातील ही परंपरा आहे. याच्या आड येणं हाच राजद्रोह असून यावर शासनाने खुलासा करावा, असे आवाहन पाटील यांनी फडणवीस यांच्या प्रश्नावर केले आहे. 

त्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोणताही धर्म श्रध्दा पाळण्यास शासन आडवं येणार नाही. एखाद्या ठिकाणी परंपरेच्या आड काही खोडसाळ पणा होत असेल तर आम्ही सहन करणार नाही. ठराविक समुदायाने केलेल्या कृत्यामुळे दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होते. ते योग्य नाही जिथे श्रध्दा सर्व समावेशक असते. तिथे शासन त्यांच्या पाठीशी आहे. या संपूर्ण प्रकरणात त्र्यंबकेश्वर मंदिराच्या ट्रस्टीने केलेल्या तक्रारीचे नोंद घेण सरकारच काम आहे. नागपूरमधील दर्गाच्या विकासासाठी मी पैसे दिले. पण एखादा म्हणत असेल, मशिदीसमोर जाऊन आम्हाला नाचायचं आहे, हे योग्य नाही. सर्वानी एकमेकांच्या धर्माचा आदर केला पाहिजे. 

एका महिन्यात रिपोर्ट मागण्यात येणार...

त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश प्रकरण झाले, त्यावेळी एफआयआर नोंदवून अत्यंत कडक कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते . तसेच या घटनेच्या चौकशीसाठी अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत एसआयटी स्थापन करण्यात आली होती. ही एसआयटी केवळ यावर्षीच्या घटनेची चौकशी करणार नाही, तर गेल्या वर्षीच्या घटनेचीही चौकशी करेल, असेही असांगण्यात आले होते. त्यावर आज पावसाळी अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वर प्रकरणाच्या मुद्द्यावर त्यांनी SIT कडून या प्रकरणात एका महिन्यात रिपोर्ट मागण्यात येणार असल्याचे सांगितले. 

नेमकं काय घडलं होते? 

त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग (Trimbakeshwer Jotirlinga) मंदिर हे सायंकाळी नऊ वाजता बंद करण्यात येते. उत्तर दरवाजाच्या ठिकाणी जमाव आलेला होता. यावेळी त्यांनी मंदिरात प्रवेश करण्याची मागणी केलेली होती. परंतु त्यांना प्रवेश हा नाकारण्यात आला. त्यामुळे एका बाजूने मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठीचा हट्ट आणि दुसरीकडनं सुरक्षा रक्षकांकडून त्यांना केला जाणारा मज्जाव, त्यामुळे हा तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर देवस्थानला माहिती मिळाल्यांनतर देवस्थानचे इतर व्यक्ती तिथे आलेले होते आणि त्यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. यावेळचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला. 

ईतर महत्वाच्या बातम्या : 

Nashik Trimbakeshwer : 'हे सगळं भीती वाटण्यासारखच, कशाला हवीय परंपरा', उरूस आयोजक सलीम सय्यद झाले भावूक 

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Bharati Pawar : आता नव्या उमेदीनं काम करता येईल, युवकांच्या प्रश्नांसाठी मोठा आग्रह असेल, राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड होताच भारती पवार यांची पहिली प्रतिक्रिया
आता नव्या उमेदीनं काम करता येईल, युवकांच्या प्रश्नांसाठी मोठा आग्रह असेल : भारती पवार
Sanjay Raut on Girish Mahajan: गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
Girish Mahajan: पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, नाशिककरांना दिला मोठा शब्द!
पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली, आता नाशिकचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
Nashik And Raigad Guardian Minister Name: रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला; अखेर 2 जणांची नावं जाहीर
रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला; अखेर 2 जणांची नावं जाहीर

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Embed widget