एक्स्प्लोर

Shravan 2023 : श्रावण महिन्यात उपवास करताना 'या' पदार्थांचं सेवन करा; रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहील

Shravan 2023 : डायबेटिसची समस्या असलेल्या लोकांनी श्रावणात आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींकडे अत्यंत काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे.

Shravan 2023 : श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. श्रावण महिना म्हटला की अनेकजण उपवास करतात. अशातच मधुमेहाच्या प्री-डायबेटिस किंवा डायबेटिसची समस्या असलेल्या लोकांना आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींकडे अत्यंत काळजीपूर्वक लक्ष ठेवावे लागते. अनेकदा मधुमेहाच्या रूग्णांनी कोणत्या अन्नपदार्थांची निवड करावी याबाबत लोकांचा संभ्रम असतो. या ठिकाणी मधुमेहाच्या रूग्णांसाठी अशाच काही पदार्थांची नावं जाणून घेणार आहोत.   

ताज्या फळांचं सेवन करा 

फळांचं सेवन हे नेहमी आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं. श्रावण महिन्यात मधुमेहाच्या रूग्णांनी जर योग्य पद्धतीने ताज्या फळांचं सेवन केलं तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. कारण फळांमध्ये ग्लायसेमिक सूचकांक कमी असतो. तुम्ही श्रावणात नाशपती, संत्री, ब्लूबेरीज, सफरचंद, चेरी, पीच, प्लम्स, द्राक्ष, अव्हाकाडो, पेरू इत्यादी फळांची निवड करू शकता. कारण त्यात अत्यावश्यक पोषक घटक, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्सचं प्रमाण फार जास्त असतं. या फळांच्या सेवनाने तुम्हाला झटपट ऊर्जा देखील मिळते आणि लवकर भूकही लागत नाही. 

प्रवासासाठी ड्रायफ्रूट्सचं सेवन करू शकता 

फळांच्या व्यतिरिक्त तुम्ही ड्रायफ्रूट्सचे देखील सेवन करू शकता. यामध्ये इन्सुलिनचे प्रमाण जास्त असते. तसेच, यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत होते. तुम्ही तुमच्या आहारात बदाम, अक्रोड, काजू, पिस्ता किंवा शेंगदाण्याचा वापर करू शकता. यामध्ये मोनोसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड्, प्रथिने आणि फायबर भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी राखण्यास मदत होते. या व्यतिरिक्त तुम्ही चिआ सीड्सचे देखील सेवन करू शकता. कारण हे रक्तातील साखरेचे प्रमाण सुधारण्यासाठी तसेच वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. ड्रायफ्रूट्समध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असतेच, पण त्याचबरोबर या पदार्थांमध्ये प्रथिनंही असतात. 

रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करणाऱ्या भाज्या

रताळी, बटाटे, बीन्स, गाजर, काकडी, मूळा यांसारख्या भाज्या आणि मसूरसारख्या डाळी संपूर्ण श्रावणभर मधुमेहाचे रूग्ण खाऊ शकतात. या भाज्यांच्या सेवनाने रक्ताच्या पातळीत अचानक वाढ होण्याची शक्यता कमी असते. 

या चविष्ट पदार्थ आणि पेयांमुळे रक्तातील साखरेची पातळी सांभाळणे तुम्हाला अगदी सहज शक्य होईल. मधुमेहग्रस्त व्यक्तींनी हायपरग्लायसेमिया किंवा हायपोग्लायसेमिया अर्थात साखरेच्या पातळीत अचानक खूप वाढ किंवा घट होणे यांच्याकडे लक्ष ठेवले पाहिजे आणि त्यावर तत्काळ उपाय केले पाहिजेत. तसेच, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यासाठी आहाराची योग्य शिस्त असणं देखील गरजेचं आहे. काही मधुमेही संपूर्ण श्रावणभर उपवास करतात. अशावेळी आहाराचे नियोजन केल्यास या काळात आपले आरोग्य सांभाळण्यास मदत होऊ शकेल.

या संदर्भात अबॉट न्यूट्रिशनच्या मेडिकल अँड सायन्टिफिक अफेअर्स विभागाचे प्रमुख डॉ. इरफान शेख म्हणतात की, श्रावणात तुम्ही काही निवडक पदार्थांची निवड करू शकता.  जर तुम्ही वरील पदार्थांचं सेवन केलं तर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहील. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Smriti Mandhana: वर्ल्डकप सुरु असतानाच स्मृती मानधनाने इतिहास रचला, असा विक्रम करणारी पहिलीच फलंदाज
वर्ल्डकप सुरु असतानाच स्मृती मानधनाने इतिहास रचला, असा विक्रम करणारी पहिलीच फलंदाज
Jalgaon : जळगावात वाळूमाफियांची मुजोरी, कारवाई करणाऱ्या तलाठ्यावर जीवघेणा हल्ला, ट्रॅक्टरखाली फेकण्याचा प्रयत्न
जळगावात वाळूमाफियांची मुजोरी, कारवाई करणाऱ्या तलाठ्यावर जीवघेणा हल्ला, ट्रॅक्टरखाली फेकण्याचा प्रयत्न
दिल्लीत पत्रकार परिषदेला महिला पत्रकारांची एन्ट्री बॅन करणाऱ्या तालिबानी परराष्ट्र मंत्र्यांना अखेर उपरती; महिला पत्रकारांना अखेर बोलावलं
दिल्लीत पत्रकार परिषदेला महिला पत्रकारांची एन्ट्री बॅन करणाऱ्या तालिबानी परराष्ट्र मंत्र्यांना अखेर उपरती; महिला पत्रकारांना अखेर बोलावलं
P Chidambaram: सुवर्ण मंदिरातील ऑपरेशन ब्लू स्टार चुकीचे पाऊल, चुकीची किंमत इंदिरा गांधींनी जीवाने चुकवली; पी. चिदंबरम यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा चर्चा रंगली
सुवर्ण मंदिरातील ऑपरेशन ब्लू स्टार चुकीचे पाऊल, चुकीची किंमत इंदिरा गांधींनी जीवाने चुकवली; पी. चिदंबरम यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा चर्चा रंगली
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Politics: 'रामदास कदम सत्तेसाठी लाचार, स्वतःच्या भावाचाही झाला नाही', जाधवांचा घणाघात
Blue Star Row: 'ऑपरेशन ब्ल्यू स्टार मोठी चूक होती', P Chidambaram यांच्या वक्तव्याने काँग्रेसमध्येच वादळ?
Sangram Jagtap यांचं वक्तव्य पक्षाच्या भूमिकेशी विसंगत, म्हणून नोटीस पाठवली - Ajit Pawar
Kolhapur Fake Currency : बनावट नोटांचा कारखाना, पोलीस हवालदारच निघाला मास्टरमाइंड Special Report
Thackeray Reunion : ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी वाढल्या, 'मातोश्री'वर सहकुटुंब स्नेहभोजन, युतीवर चर्चा?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Smriti Mandhana: वर्ल्डकप सुरु असतानाच स्मृती मानधनाने इतिहास रचला, असा विक्रम करणारी पहिलीच फलंदाज
वर्ल्डकप सुरु असतानाच स्मृती मानधनाने इतिहास रचला, असा विक्रम करणारी पहिलीच फलंदाज
Jalgaon : जळगावात वाळूमाफियांची मुजोरी, कारवाई करणाऱ्या तलाठ्यावर जीवघेणा हल्ला, ट्रॅक्टरखाली फेकण्याचा प्रयत्न
जळगावात वाळूमाफियांची मुजोरी, कारवाई करणाऱ्या तलाठ्यावर जीवघेणा हल्ला, ट्रॅक्टरखाली फेकण्याचा प्रयत्न
दिल्लीत पत्रकार परिषदेला महिला पत्रकारांची एन्ट्री बॅन करणाऱ्या तालिबानी परराष्ट्र मंत्र्यांना अखेर उपरती; महिला पत्रकारांना अखेर बोलावलं
दिल्लीत पत्रकार परिषदेला महिला पत्रकारांची एन्ट्री बॅन करणाऱ्या तालिबानी परराष्ट्र मंत्र्यांना अखेर उपरती; महिला पत्रकारांना अखेर बोलावलं
P Chidambaram: सुवर्ण मंदिरातील ऑपरेशन ब्लू स्टार चुकीचे पाऊल, चुकीची किंमत इंदिरा गांधींनी जीवाने चुकवली; पी. चिदंबरम यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा चर्चा रंगली
सुवर्ण मंदिरातील ऑपरेशन ब्लू स्टार चुकीचे पाऊल, चुकीची किंमत इंदिरा गांधींनी जीवाने चुकवली; पी. चिदंबरम यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा चर्चा रंगली
Mumbai Nashik Highway Accident: मुंबई-नाशिक महामार्गावर कंटेनर उलटला; चार किमीपर्यंत वाहनांच्या रांगा, नागरिक त्रस्त
मुंबई-नाशिक महामार्गावर कंटेनर उलटला; चार किमीपर्यंत वाहनांच्या रांगा, नागरिक त्रस्त
Ghulam Mohammad Mir BJP: राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपची यादी जाहीर; 'या' मुस्लिम उमेदवाराला संधी दिल्याने भूवया उंचावल्या!
राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपची यादी जाहीर; 'या' मुस्लिम उमेदवाराला संधी दिल्याने भूवया उंचावल्या!
Auto Rickshaw Accident video: सर्वांची फिल्डिंग सेट झाली! एकाच वेळी तीन रिक्षांची टक्कर, बाजूचा दुचाकीवाला विचारतो,
Video: सर्वांची फिल्डिंग सेट झाली! एकाच वेळी तीन रिक्षांची टक्कर, बाजूचा दुचाकीवाला विचारतो, "पण मी काय केलं, माझा काय दोष?"
'संभाजीनगरचे 'शशी थरूर' म्हणून ओळखले जाणाऱ्या खासदार साहेबांनी..', संदीपान भुमरेंना संसदरत्न पुरस्कारावरून अंबादास दानवेंच्या पोस्टची भलतीच चर्चा!
'संभाजीनगरचे 'शशी थरूर' म्हणून ओळखले जाणाऱ्या खासदार साहेबांनी..', संदीपान भुमरेंना संसदरत्न पुरस्कारावरून अंबादास दानवेंच्या पोस्टची भलतीच चर्चा!
Embed widget