एक्स्प्लोर

Nashik News : नाशिकच्या मान्यता नसलेल्या अठरा शाळांना कायमस्वरूपी कुलूप, गटशिक्षणाधिकाऱ्यांनी बजावली नोटीस 

Nashik News : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील अनधिकृत शाळांबाबत (School) शिक्षण विभागाने महत्वाचा निर्णय घेतला असून जवळपास अठरा शाळांना टाळे ठोकण्यात आले आहे.

Nashik News : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील अनधिकृत शाळांबाबत (School) शिक्षण विभागाने महत्वाचा निर्णय घेतला असून जवळपास अठरा शाळांना टाळे ठोकण्यात आले आहे. त्यामुळे संबधित शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये याबाबतची नोटीसही गट गटशिक्षणाधिकाऱ्यांनी बजावली आहे. त्यामुळे संबंधित शाळांचे धाबे दणाणले आहेत. 

नाशिक शहरासह जिल्ह्यात अनेक शासकीय तसेच खाजगी शाळा (Private School) आहेत. त्याचबरोबर अलीकडच्या  वर्षात जिल्ह्यात प्ले ग्रुप, नर्सरीच्या शाळांना ऊत आला आहे. अनेकजण आपल्या पाल्याला तीन वर्षाचा कि प्रवेश केला जातो. याच माध्यमातून जिल्ह्यात अनेक प्ले ग्रुप, आणि इतर  खाजगी शाळा मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्या आहेत. अनेक शाळा शिक्षण विभागाची परवानगी नसताना सर्रास सुरु असल्याचे दिसते. याच पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने परवानगी नसलेल्या शाळांवर कारवाई कऱण्यात आली आहे. 

दरम्यान नाशिक शिक्षण विभागाची (Nashik Education Department) मान्यता नसतानाही विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या जिल्ह्यातील 18 शाळा कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे. विद्यार्थी व पालकांना शाळांमध्ये प्रवेश घेण्याचाही प्रतिबंध करण्याची नोटीस गट शिक्षणाधिकाऱ्यांनी बजावली आहे. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षण विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे, मात्र शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाकडे सादर करून मान्यता मिळवण्यापूर्वीच वर्ग भरवले जातात. 

जिल्ह्यातील अनेक तालुक्यात अशा नियमबाह्य शाळा सुरू करून विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या संस्था उदयास आल्या आहेत. संबंधित शाळा विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळत असल्याचा प्रकार शिक्षण विभागाच्या निदर्शनास आल्यानंतर या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषद गटशिक्षणाधिकाऱ्यां मार्फत शाळांना नोटीस बबजावण्यात आली आहे. बागलाण, त्र्यंबकेश्वर मधील प्रत्येकी तीन, दिंडोरी, इगतपुरी, नांदगाव मधील प्रत्येकी एक, निफाड, नाशिक तालुक्यातील प्रत्येकी दोन शाळांचा समावेश आहे. कळवण तालुक्यातील तीन शाळा बंद केल्या जाणार आहेत. त्यापैकी एक शाळा बंद झाली असून दोन शाळांची प्रक्रिया प्रस्तावित आहे. 

जिल्ह्यातील शाळांना टाळे 
अभिनव बालविकास मंदिर, नैताने, अभिनव बालवक विकास मंदिर, औंदाणे, शामलाताई बिडकर इंग्लिश मीडियम स्कूल, मुल्हेर बागलाण, बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल दिंडोरी, आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल अभोना, इंग्लिश मीडियम स्कूल ओतुर, तुळजाभवानी प्राथमिक विद्यालय अभोना, तालुका कळवण, बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल मनमाड ता. नांदगाव, शंकर एज्युकेशन सोसायटी संचलित डॉ. सुभाष गुजर प्राथमिक हिंदी मीडियम स्कूल देवळाली कॅम्प, प्राथमिक विद्यामंदिर शिंदे नाशिक, न्यू गुरुकुल स्कूल चितेगाव, न्यू गुरुकुल स्कूल खेरवाडी, ता निफाड, रेनबो किड्स मापरवाडी रोड सिन्नर, व्ही बी एस इंग्लिश मीडियम स्कूल माळेगाव ता सिन्नर, नूतन आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल ता इगतपुरी, ब्लूमिंग बर्डे इंग्लिश माध्यमिक स्कूल मल्हार हिल, स्वामी सोयरेश्वरानंद गुरूकूल त्र्यंबकेश्वर आदी शाळांचा समावेश आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 

व्हिडीओ

BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय
Election Commission PC :पाडू यंत्र हे 2004 पासून हे यंत्र आम्ही नवीन आणलेलं नाही, आयोगाचं स्पष्टीकरण
Geeta Gawali Mumbai : अरुण गवळीची लेक निवडणुकीच्या रिंगणात, गीता गवळींनी व्यक्त केला विजयाचा विश्वास
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
Kolhapur Municipal Corporation Election: राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
BMC Election : बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
Embed widget