नंदुरबार जिल्ह्यात हृदय पिळवून टाकणारी घटना, नाल्याच्या पाण्यात 6 महिन्यांचं बाळं गेलं वाहून, नेमकी घटना घडली कशी?
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा (Shahada) तहसील कार्यालयाजवळ असणाऱ्या नाल्याच्या पाण्यात पडून 6 महिन्याच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू (Death of a 6 month old baby) झाला आहे.
Nandurbar News : नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात हृदय पिळवून टाकणारी एक घटना घडलीय. जिल्ह्यातील शहादा (Shahada) तहसील कार्यालयाजवळ असणाऱ्या नाल्याच्या पाण्यात पडून 6 महिन्याच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू (Death of a 6 month old baby) झाला आहे. मुसळधार पावसात पत्नी आणि सहा महिन्याच्या बालकाला मोटरसायकलीने घरी घेऊन जात असताना हा दुर्देवी अपघात घडला आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील झालेल्या मुसळधार पावसामुळे शहादा तहसील कार्यालया नजीक असलेल्या भेंडवा नाल्याला पाणी आले आहे. या पाण्यात पडून एक 6 महिन्याचे बाळ वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडलीय. मुसळधार पावसात आपल्या पत्नी आणि सहा वर्षीय बालकाला मोटरसायकलीने घरी घेऊन जात असताना हा दुर्देवी अपघात घडला. फरशी पुलावरुन जात असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळं मनोज भिल यांचा मोटरसायकलवरील ताबा सुटल्याने पत्नी खाली पडली, त्यानंतर पत्नीच्या हातात असलेले 6 महिन्याचे बाळ नाल्यातील पाण्यात वाहून गेले. यानंतर दोघा पती-पत्नीने लहान बालकाला शोधण्याचे अनेक प्रयत्न केले. मात्र, हे सर्व प्रयत्न निष्कळ ठरले. दुसऱ्या दिवशी सकाळी नाल्यालगत असलेल्या एका काटेरी झुडपात बालकात मृत्यूदेह आढळला. आपल्या सहा महिन्याच्या मृत बालकाला हृदयाशी लावत त्या आईने आक्रोश केला होता.
राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस सुरु
सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. त्यामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचे देखील पाहायला मिळाले. दरम्यान, पुलावरुन पाणी वाहत असताना किंवा मुसळधार पावसाचा इशारा दिला असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं वेळोवेळी करण्यात येते. मात्र, या काळात काही भागात अशा अपघाताच्या घटना घडत आहेत. अशीच अपघाताची घटना नंदुरबार जिल्ह्यात घडली आहे. सहा महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा
दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर काही भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबईसह ठााणे पालघर जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या:
मुंबईतील रिलस्टार अन्वीचा धबधब्याजवळ तोल जाऊन मृत्यू; रायगडमधील पिकनिक जीवावर बेतली