एक्स्प्लोर

मुंबईतील रिलस्टार अन्वीचा धबधब्याजवळ तोल जाऊन मृत्यू; रायगडमधील पिकनिक जीवावर बेतली

पावसाळा सुरू झाला की सर्वत्र निसर्गातील पर्यटन स्थळं खुली होतात, आणि हीच पर्यटन स्थळं प्रत्येकाला आपल्याकडे खेचण्याची भुरळ घालतात

रायगड : पावसाळा सुरू झाल्यानंतर विविध निसर्गरम्य ठिकाणी पर्यटकांची (tourism) वर्दळ पाहायला मिळते. आषाढ आणि श्रावण महिन्यात निसर्गरम्य पर्यटन बहरलं जातं. त्यातूनच, फॅमिली पिकनीक आणि मित्र-मैत्रिणींसह फिरायला जाऊन निसर्ग सौंदर्यांचा आनंद घेतला जातो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियावर (Social media) फोटो टाकणे किंवा रिल्स बनवणे, यासाठी अनेक तरुण तरुणी आपला जीव धोक्यात घालून धबधब्याच्या (Waterfall) ठिकाणी वावरतात. पाण्याच्या प्रवाहाशी खेळताना आपल्या जीवाचा खेळ या तरुणाईकडून होतो. काही दिवसांपूर्वी पुण्यातील भुशी डॅमवर अशीच दुर्घटन घडली होती. आता, रायगड (Raigad) जिल्ह्याच्या माणगाव कुंभे येथील जलविद्युत प्रकल्प परिसरात फिरायला गेलेल्या तरुणीला आपला जीव गमवावा लागला.  

पावसाळा सुरू झाला की सर्वत्र निसर्गातील पर्यटन स्थळं खुली होतात, आणि हीच पर्यटन स्थळं प्रत्येकाला आपल्याकडे खेचण्याची भुरळ घालतात. मात्र, याच स्थळांना भेटी देण्यासाठी काही अतिउत्साही तरुण तरुणी आपल्या जीवाची परवा न करता तेथील परीस्थितीचा अंदाज सुध्दा लक्षात न घेता स्वतःचा जीव धोक्यात घालतात.असाच प्रकार माणगाव तालुक्यातील कुंभे जलविद्युत प्रकल्प असलेल्या धबधबा परीसरात मंगळवारी घडला. व्यवसायाने चार्टर्ड अकाऊंटंट असलेली आणि सोशल मीडियावर सोशल मीडिया इन्फ्लुएंसर म्हणून प्रसिद्ध असलेल्या अन्वीला आपला जीव गमवाला लागला आहे. सोशल मीडियातून तिने रील स्टार म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली होती. मुंबईच्या माटुंगावरुन ही तरुणी आपल्या 6 मित्रांसोबत पावसाळी सहलीसाठी या भागात फिरण्यासाठी आली, मात्र दुर्दैवाने तिची ही सहल शेवटची ठरली.

अन्वी कामदार असं या मुलीचं नाव असून सेल्फीच्या नादात तिचा धबधब्याजवळ अपघात झाला, त्यातच ती स्वतःचा जीव गमावून बसली. पावसाळी पर्यटनाचा  रायगडमध्ये आतापर्यंतचा हा दहावा बळी आहे. अन्वी संजय कामदार (वय 27) असं या मृत तरुणीचं नावं असून ती  मुंबईतील माटुंगा येथील रहिवासी होती. माटुंगा येथून पाच ते सहा जण पावसाळी पर्यटनासाठी रायगडमध्ये आले होते. अन्वी ही माणगाव परीसरात असणाऱ्या कुंभे जलविद्युत परीसरातील एका टेकडीवर रिल बनवत होती, मोबाईलमध्ये रिल शूट करत असताना तिचा तेथून अचानक तोल गेला आणि ती 200 ते 250 फूट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेनंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्वीच्या अकाली निधनाने तिच्या मित्रपरिवारात शोककळा पसरली असून तिच्या अपघाती मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

हेही वाचा

Video: लाडक्या बहि‍णींना पहिला हफ्ता कधी अन् किती?; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली फायनल तारीख

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gujarat Rain, Rivaba Jadeja Video : गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार, रवींद्र जडेजाच्या आमदार पत्नीची कमरेपेक्षा जास्त पाण्यात उतरत बचावकार्याची पाहणी
Video : गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार, रवींद्र जडेजाच्या आमदार पत्नीची कमरेएवढ्या पाण्यात उतरत बचावकार्याची पाहणी
Champai Soren : अशोक चव्हाणांनंतर आणखी एक माजी मुख्यमंत्री भाजपच्या गळाला; आजच मोठा निर्णय घेण्याची शक्यता
अशोक चव्हाणांनंतर आणखी एक माजी मुख्यमंत्री भाजपच्या गळाला; आजच मोठा निर्णय घेण्याची शक्यता
Nagpur News: घडलेली घटना कमीपणा आणणारी, राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
घडलेली घटना कमीपणा आणणारी, राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Nitin Gadkari : कारचा खर्च अर्ध्यावर येणार! नितीन गडकरींनी सांगितला सुपर फॉर्म्युला
कारचा खर्च अर्ध्यावर येणार! नितीन गडकरींनी सांगितला सुपर फॉर्म्युला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhatrapati Shivaji Maharaj First Statue Pune : शिवरायांचा जगातला पहिला पुतळा, आजही दिमाखात उभाNarayan Rane Viral Video : नारायण राणेंची एकेकाला घरात घुसून मारून टाकण्याची भाषाABP Majha Headlines : 05 PM  : 28 August 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis PC : शिवरायांच्या पुतळ्यावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने, फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gujarat Rain, Rivaba Jadeja Video : गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार, रवींद्र जडेजाच्या आमदार पत्नीची कमरेपेक्षा जास्त पाण्यात उतरत बचावकार्याची पाहणी
Video : गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार, रवींद्र जडेजाच्या आमदार पत्नीची कमरेएवढ्या पाण्यात उतरत बचावकार्याची पाहणी
Champai Soren : अशोक चव्हाणांनंतर आणखी एक माजी मुख्यमंत्री भाजपच्या गळाला; आजच मोठा निर्णय घेण्याची शक्यता
अशोक चव्हाणांनंतर आणखी एक माजी मुख्यमंत्री भाजपच्या गळाला; आजच मोठा निर्णय घेण्याची शक्यता
Nagpur News: घडलेली घटना कमीपणा आणणारी, राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
घडलेली घटना कमीपणा आणणारी, राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Nitin Gadkari : कारचा खर्च अर्ध्यावर येणार! नितीन गडकरींनी सांगितला सुपर फॉर्म्युला
कारचा खर्च अर्ध्यावर येणार! नितीन गडकरींनी सांगितला सुपर फॉर्म्युला
पत्नीची माफी मागितली, पासवर्ड आणि बँक डीटेल्स सांगितले; नंतर 15 मजल्यावरून इंजिनिअरने उडी मारून जीव दिला
पत्नीची माफी मागितली, पासवर्ड आणि बँक डीटेल्स सांगितले; नंतर 15 मजल्यावरून इंजिनिअरने उडी मारून जीव दिला
Video: जरांगे पाटलांचा जीवघेणा प्रवास, वाहत्या नदीतून घातली कार; सहकाऱ्यांचा जीव भांड्यात
Video: जरांगे पाटलांचा जीवघेणा प्रवास, वाहत्या नदीतून घातली कार; सहकाऱ्यांचा जीव भांड्यात
Chirag Kumar Paswan : एनडीएमध्ये चर्चा होती नितीश कुमार अन् चंद्राबाबंचूी, पण खरी डोकेदुखी पीएम मोदींच्या हनुमानाने वाढवली आहे का?
एनडीएमध्ये चर्चा होती नितीश कुमार अन् चंद्राबाबंचूी, पण खरी डोकेदुखी पीएम मोदींच्या हनुमानाने वाढवली आहे का?
वकील त्यांच्या क्लाएंटकडून टक्केवारीच्या रुपात फी मागणी करू शकत नाही: मुंबई उच्च न्यायालय
वकील त्यांच्या क्लाएंटकडून टक्केवारीच्या रुपात फी मागणी करू शकत नाही: मुंबई उच्च न्यायालय
Embed widget