Crime News: सातवीत शिकणाऱ्या अल्पवयीन पुतणीवर चुलत्यानेच केला अत्याचार, न्यायालयाने सुनावली 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
Nanded News: न्यायालयाने आरोपी चुलत्याला 20 वर्ष सक्तमजुरी आणि 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
Nanded News: शिक्षणासाठी आजीजवळ राहण्यासाठी आलेल्या एका सातवीतील चिमुकलीवर नात्याने चुलता लागणाऱ्या एका आरोपीने अत्याचार केल्याची घटना नांदेड जिल्ह्यात (Nanded District) समोर आली होती. तर या प्रकरणात पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचाराच्या (Child sexual Abuse) कलमाखाली गुन्हा (FIR) नोंदविण्यात आला होता. दरम्यान आता यावर न्यायालयाने अंतिम निकाल (Court Final Judgment) दिला असून, न्या. आर. एम. पांडे यांनी आरोपी चुलत्याला 20 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.
याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित मुलीची आई पुण्यात राहत होते. त्यामुळे मुलगी ही आजीजवळ राहून शिक्षण घेते. दरम्यान 29 जानेवारी 2010 रोजी पीडित मुलीची तब्येत ठीक नसल्याने ती घरीच होती. सायंकाळी चार वाजेच्या सुमारास मुलीची आजी ही दळण आणण्यासाठी गिरणीवर गेली होती. तर मुलगी अंगणात झाडलोट करीत होती. त्याचवेळी नात्याने चुलता लागत असलेला आरोपी त्या ठिकाणी आला. त्याने पीडित मुलीला जबरदस्ती करून नेले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. आजी परत येईपर्यंत येथून तो पळून गेला.
मात्र घडलेला प्रकार कोणालाही सांगितल्यास आरोपी आपल्याला मारहाण करेल या भीतीने पीडीत मुलीने ही बाब अगोदर कुणाला सांगितली नव्हती. मात्र नंतर मावस बहीण आणि आईला याबाबत माहिती दिली. त्यानंतर अन्य एका चुलत्याला सोबत घेऊन पीडितेने लिंबगाव पोलिस ठाणे गाठले. या प्रकरणात पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी चुलत्याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पोनि. बोरसे यांनी केला. तर सपोनि चंद्रकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार राम बोईनवाड, संगीता जाधव यांनी आरोपीला शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर न्यायालयाने आरोपी चुलत्याला 20 वर्ष सक्तमजुरी आणि 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
पोलिसांकडून आरोपीला शिक्षा होण्यासाठी प्रयत्न
शिक्षणासाठी आजीजवळ राहण्यासाठी आलेल्या एका सातवीतील चिमुकलीवर नात्याने चुलता लागणाऱ्या एका आरोपीने अत्याचार केल्याची घटना समोर आल्यावर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला. तसेच आरोपीला बेड्या ठोकल्या. तसेच आरोपीला शिक्षा होण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. त्यासाठी सुरवातीपासून पोलिसांनी सर्व पुराव्यांची जुळवाजुळवी केली. वैद्यकीय अहवाल मिळवत न्यायालयात सादर केले. तसेच पीडीत मुलीची साक्ष महत्वाची ठरली. त्यामुळे अखेर नराधम आरोपीला शिक्षा लागली.
इतर महत्वाच्या बातम्या:
Nanded News: बाफना गोळीबार घटनेतील फिर्यादी महिलाच बनली आरोपी, दोघांना फसविण्यासाठी रचला कट