Nanded News: नांदेडमध्ये टेक्सकाँम टेक्सटाईल उद्योग सुरू करण्याची मागणी; भाजप आमदाराच्या अडचणी वाढण्याची शक्यता
Nanded News : नांदेडच्या सिडको औद्योगिक वसाहतीतील भूखंडावरुन नायगावचे भाजप आमदार राजेश पवार अडचणीत येण्याची शक्यता आहे.
Nanded News : नांदेड : नांदेडच्या (Nanded) सिडको औद्योगिक वसाहतीतील (CIDCO INDUSTRIAL ESTATE PLOT) भूखंडावर उद्योग सुरु केला नसल्यानं हा भूखंड महामंडळाला परत करावा, अशी नोटीस टेक्सटाईल कॉर्पोरेशन ऑफ मराठवाडा लि. या कंपनीला बजावण्यात आली आहे. त्यामुळे महामंडळाच्या या कारवाईमुळे नायगावचे भाजप आमदार राजेश पवार अडचणीत येण्याची शक्यता आहे. याबाबत ठाकरे गटाचे शहरप्रमुख गजानन तमलुरे यांनी महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली.
नांदेडच्या सिडको औद्योगिक वसाहतीतील भूखंडावर उद्योग सुरु केला नसल्यानं हे भूखंड महामंडळाला परत करावेत, अशी नोटीस टेक्सटाईल काँर्पोरेशन आँफ मराठवाडा लि. या कंपनीला बजावण्यात आली आहे. महामंडळाच्या या कारवाईमुळे नायगावचे भाजप आमदार राजेश पवार अडचणीत येण्याची शक्यता आहे.
प्रकरण नेमकं काय?
नांदेडला उस्मानशाही मिल आणि टेक्सकाँम टेक्सटाईल हे दोन मोठे वस्त्रोद्योग होते. हजारो लोकांना या उद्योगात रोजगार मिळाला होता. दुर्देवानं हे दोन्ही उद्योग बंद पडले. यापैकी टेक्सकाँम टेक्सटाईल हा उद्योग भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचे विश्वासू संभाजी पवार यांनी कंपनी स्थापन करुन विकत घेतला. टेक्सटाईल काँर्पोरेशन आँफ मराठवाडा लि. या कंपनीला हा उद्योग देताना औद्योगिक विकास महामंडळानं उद्योग सुरु करण्याची अट घातली. परंतु कंपनीनं आजपर्यंत त्या ठिकाणी उद्योग सुरू केला नाही. या उलट या उद्योगाचे गोदाम सिमेंट आणि खते, वियाणे ठेवण्यासाठी भाडे तत्वावर दिले. याबाबत नायगावचे शिवसेना (उबाठा गटा) शहरप्रमुख गजानन तमलुरे यांनी महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिका-याकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीची चौकशी झाल्यावर महामंडळाने 1 जानेवारी 2010 ते 1 नोव्हेंबर 2014 या कालवधीसाठी टेक्सटाईल काँर्पोरेशन आँफ मराठवाडा कंपनीला 19 लाख 88 हजार 137 रुपये दंड ठोठावला. त्यानंतर 2 नोव्हेंबर 2014 ते 30 नोव्हेंबर 2018 आणि 1 डिसेंबर 2016 ते 31 मार्च 2022 या कालावधीसाठी 23 लाख 23 हजार रुपये दंड ठोठावला. कंपनीने दोन्ही दंडाची रक्कम महामंडळाकडे जमा केली. तथापि या भूखंडावर अद्यापही उद्योग मात्र सुरु झालेला नाही.
टेक्सटाईल काँर्पोरेशन आँफ मराठवाडा लि. या कंपनीकडे सिडको एमआयडीसीतील बी. 7 ते बी 12 हे भूखंड आहेत. हा भूखंड जवळपास 30-40 एकरचा असून त्यावर अनेक उद्योग उभे राहू शकतात. त्यामुळे हा भूखंड सरकारने ताब्यात घेऊन तो लघु उद्योजकांना द्यावा अशी मागणी होत आहे. औद्योगिक विकास महामंडळानेही कंपनीला या भूखंडावर तातडीने उद्योग सुरु करण्याबाबत नोटीस बजावली आहे. या कंपनीची जबाबदारी सध्या भाजपाचे आमदार राजेश पवार यांच्याकडे असून ते बाहेरगावी असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.