Nana Patole on Kalyan Firing : सत्तेची मस्ती महाराष्ट्र उतरविल्याशिवाय राहणार नाही; भाजप आमदार गोळीबार प्रकरणी नाना पटोलेंची प्रतिक्रिया
Nana Patole on Kalyan Firing : उल्हासनगरमध्ये भाजप आमदार (BJP MLA) गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांच्याकडून शुक्रवारी (दि.3) गोळीबार करण्यात आला आलाय. हिललाईन पोलीस स्टेशनमध्येच (Police Station) आणि वरिष्ठ पोलीस निरिक्षकांच्या कॅबिनमध्येच हा गोळीबार करण्यात आला होता.
Nana Patole on Kalyan Firing : उल्हासनगरमध्ये भाजप आमदार (BJP MLA) गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांच्याकडून शुक्रवारी (दि.3) गोळीबार करण्यात आला आलाय. हिललाईन पोलीस स्टेशनमध्येच (Police Station) आणि वरिष्ठ पोलीस निरिक्षकांच्या कॅबिनमध्येच हा गोळीबार करण्यात आला होता. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केलाय. गोळीबारप्रकरणी गणपत गायकवाडसह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. हा सर्व प्रकार जमिनीच्या वादातून घडल्याची माहिती आहे. दरम्यान, काँग्रेस नेते नाना पटोल यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
'सत्तेची मस्ती महाराष्ट्र उतरविल्याशिवाय राहणार नाही'
नाना पटोले म्हणाले, "बेकायदेशीर मार्गाने स्थापन झालेलं शिंदे - फडणवीस यांचे सरकार राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अपयशी ठरल्याचे वारंवार सिद्ध झालंय. आता भाजपाचे आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शहर अध्यक्षावर पोलीस ठाण्यातच गोळीबार करतात ही गंभीर घटना आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी काही दिवस सत्तेत राहणं म्हणजे महाराष्ट्रासमोरील संकट आहे. हे वरील घटनेवरुन सिद्ध होतय. मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षावर गोळीबार होतं असेल तर सामान्य नागरिकांची काय अवस्था असेल महाराष्ट्रात ? भाजपाच्या आमदारांची पोलिस ठाण्यात गोळीबार करण्यापर्यंत मजल जात असेल तर यामागील सत्तेची मस्ती महाराष्ट्र उतरवल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी व्यक्त ट्वीटरवर व्यक्त केली आहे.
महेश गायकवाड यांच्यावर उपचार सुरु
शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी महेश गायकवाड यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. दरम्यान, कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केलीये. भाजपच्या गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या होत्या. सध्या महेश गायकवाड यांची प्रकृती स्थिर आहे. त्या गोळ्या काढण्यामध्ये डॉक्टरांना यश आले आहे.
View this post on Instagram
इतर महत्वाच्या बातम्या
भाजपा आमदाराचा शिंदे गटाच्या महेश गायकवाडांवर गोळीबार, गणपत गायकवाडसह तीन जण अटकेत