एक्स्प्लोर

Nagpur City Water Supply : शहरातील चार झोनमध्ये पुढील 48 तास पाणीपुरवठा प्रभावित

फक्त लहान स्लॉटमध्ये आंशिक पम्पिंग होते. याचा विपरित परिणाम, आशीनगर झोन, सतरंजीपुरा झोन, नेहरूनगर झोन आणि लकडगंज झोनमधील भागात राहणाऱ्या ग्राहकांच्या पाणीपुरवठ्यावर झाला आहे.

नागपूर : मध्यप्रदेशातील मुसळधार पावसामुळे उत्तर आणि पूर्व नागपुरातील पिण्याच्या पाणी पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. नागपूर शहरातील आशीनगर, सतरंजीपुरा, नेहरूनगर आणि लकडगंज या चार झोनमधील पाणीपुरवठा यामुळे प्रभावित झाला असून पुढील 48 तास याचा फटका बसणार आहे.  

मध्यप्रदेशातील मुसळधार पावसामुळे 15 ऑगस्टपासून नवेगाव-खैरी धरणाचे सर्व 16 दरवाजे 1.5 मीटरने उघडण्यात आले आहेत. तोतलाडोह धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने नवेगाव खैरीचे दरवाजे किमान पुढील 48 तास उघडे राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे कन्हान नदीच्या खालच्या भागात पूरसदृश स्थिती निर्माण झाली असून नदीच्या पाण्याची पातळीही 276 मीटरपर्यंत गेली आहे. 

45 टक्के पाणीपुरवठा प्रभावीत

मनपा-ओसीडब्ल्यू कन्हान जलशुद्धीकरण केंद्राच्या इनटेक विहीर रोझपीसचे चोकेज, कोरड्या विहिरी पुराच्या पाण्यात बुडाल्या आहेत. जॅकवेलमध्ये पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने स्कूबा डायव्हर्ससाठी गाळ साफ करण्यासाठी नदीच्या पाण्यात 10 मीटर खोल जाण्याचे अत्यंत मोठे आव्हान समोर आले आहे. यामुळे, कन्हान येथून पंपिंग 16 ऑगस्ट, 2022 रोजी पहाटे बंद करण्यात आले. त्यानंतर, फक्त लहान स्लॉटमध्ये आंशिक पम्पिंग होते. याचा विपरित परिणाम, आशीनगर झोन, सतरंजीपुरा झोन, नेहरूनगर झोन आणि लकडगंज झोनमधील (45% नागपूर) भागात राहणाऱ्या ग्राहकांच्या पाणीपुरवठ्यावर झाला आहे. ज्यांना कन्हान WTP फीडरवरून पाणीपुरवठा होतो. मुख्य फेड ESRच्या जल संसाधन विभाग (WRD)च्या सुचनेनुसार, कन्हान नदीतील पाण्याची पातळी 16 ऑगस्ट 2022 रोजी रात्री उशीरापर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे.

Nagpur Municipal Corporation : सोशल मीडियावर मनपाची फक्त चमकोगिरी, नागरिकांच्या तक्रारी न सोडवताच 'क्लोज'

21 ऑगस्टपर्यंत पावसाची विश्रांती!

मंगळवारी दिवसभरात किरकोळ पाऊस झाला. मात्र उद्यापासून 21 ऑगस्टपर्यंत नागपुरात पावसाची नसल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे काही अंशी नागपुरकरांना दिलासा मिळाला आहे. मात्र 21 पासून पुन्हा वरुणराजाचे आगमन होणार असल्याचा अंदाज सध्या हवामान खात्याने वर्तविला आहे.

Climate Change : ग्लोबल वॉर्मिंग, प्लास्टिक बंदीसाठी सर्वांनी एकत्र यावे, स्वातंत्र्यदिनी मनपा आयुक्तांचे आवाहन

कामांना द्यावी गती

शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. पाऊस झाला की या मार्गांवर डबके साचतात. मात्र पावसाळ्यात रस्त्यांची दुरुस्ती शक्य नसल्याचे मनपाकडून सांगण्यात येते. त्यामुळे पुढील पाच दिवसांत मनपा शहरातील किती रस्त्यांची दुरुस्ती करुन नागरिकांना दिलासा देणार असल्याची आशा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. शहरात मनपासह सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एनएचएआयचेही अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024: महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकालाची शक्यता, राज्यातील या 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकाल? राज्यातील 'या' 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Horoscope Today 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget