एक्स्प्लोर
काही चोर नेते शिवाजी महाराजांना पुढं करत विदर्भाची लूट करतात, श्रीहरी अणे यांचा आरोप
आमचं महाराष्ट्राशी वैर नाही तर आमचं त्या चोर पक्षांशी आणि नेत्यांशी वैर आहे ज्यांनी विदर्भाची लूट चालवली आहे. काही नेते शिवाजी महाराजांना पुढं करत मागं लपतात. शिवाजी महाराजांना काढून घेतलं तर या नेत्यांचा खरा मुखवटा दिसेल, अशी टीकाही त्यांनी सेनेच्या नेत्यांवर अप्रत्येक्षपणे केली.

नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज ही पश्चिम महाराष्ट्राची खाजगी मक्तेदारी नाही, तर ते आमचेही राजे आहेत. मात्र, काही चोर नेते शिवाजी महाराजांना पुढं करत विदर्भाची लूट करत आहेत, असा आरोप ज्येष्ठ विदर्भवादी नेते अॅड. श्रीहरी अणे यांनी शिवसेनेचं नाव न घेत अप्रत्येक्षपणे केला आहे.
नागपुरात आयोजित संकल्प विदर्भ निर्मिती सभेत ते बोलत होते. आगामी निवडणुकीसाठी सर्व विदर्भवादी संघटना एकत्र आल्या असून विदर्भ निर्माण महासंघाची निर्मिती करण्यात आली आहे. या महासंघाच्या वतीनं या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अणे म्हणाले की, आम्हाला 'जय भवानी जय शिवाजी' किंवा 'जय महाराष्ट्र' म्हणण्यात कुठलीही लाज वाटत नाही. मात्र, आम्ही तितक्याच ताकदीनं 'जय विदर्भ' देखील म्हणतो, असे अणे म्हणाले.
आमचं महाराष्ट्राशी वैर नाही तर आमचं त्या चोर पक्षांशी आणि नेत्यांशी वैर आहे ज्यांनी विदर्भाची लूट चालवली आहे. काही नेते शिवाजी महाराजांना पुढं करत मागं लपतात. शिवाजी महाराजांना काढून घेतलं तर या नेत्यांचा खरा मुखवटा दिसेल, अशी टीकाही त्यांनी सेनेच्या नेत्यांवर अप्रत्येक्षपणे केली.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शेत-शिवार
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement