एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

Sunil Kedar : आधी गुन्हा दाखल केला, आता गाडीही जप्त केली; सुनील केदारांच्या अडचणी थांबता थांबेना

Sunil Kedar : खुद्द सुनील केदार यांची फोर्ड गाडी सुद्धा पोलिसांनी जप्त करून धंतोली पोलीस स्टेशनमध्ये उभी केली आहे.

नागपूर : जामीन मिळाल्यानंतर नागपुरात (Nagpur) केलेल्या शक्तीप्रदर्शन संदर्भात सुनील केदार (Sunil Kedar) यांच्या अडचणी थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. विनापरवानगी रॅली काढली, वाहतुकीस अडथळा केला, सेंट्रल जेलजवळ सुरक्षेच्या अनुषंगाने असलेल्या नियमांचा उल्लंघन केल्याप्रकरणी नागपूर पोलिसांनी सुनील केदार आणि त्यांच्या 100 समर्थकांविरोधात गुन्हा नोंदवला होता. याच प्रकरणी आता पोलिसांनी विनापरवानगी काढलेल्या रॅलीमध्ये वापरण्यात आलेल्या चारचाकी वाहनांची जप्ती सुरू केली आहे. खुद्द सुनील केदार यांची फोर्ड गाडी सुद्धा पोलिसांनी जप्त करून धंतोली पोलीस स्टेशनमध्ये उभी केली आहे. केदार यांच्या गाडीसह इतर 13 अशा एकूण 14 चारचाकी वाहनं  आतापर्यंत पोलिसांनी जप्त केल्या आहेत. 

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या गुंतवणूक घोटाळ्याप्रकरणी कारागृहात असलेल्या सुनील केदार यांना काही दिवसांपूर्वी जामीन मिळाला होता. त्यानंतर केदार जेलमधून बाहेर येणार असल्याने त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी केली. विशेष म्हणजे कारागृहाच्या परिसरात कोणतेही गर्दी किंवा रॅली काढू नयेत अशा सूचना पोलिसांनी आदल्या दिवशीच दिल्या होत्या. मात्र, त्यानंतर देखील केदार यांच्या समर्थकांनी शक्तिप्रदर्शन करत भव्य रॅली काढली. त्यामुळे पोलिसांनी या सर्व प्रकरणात सुनील केदार आणि त्यांच्या 100 समर्थकांविरोधात गुन्हा दाखल केला होता. विशेष म्हणजे रॅलीत वापरण्यात आलेल्या चारचाकी गाड्यांचा देखील उल्लेख एफआयआरमध्ये उल्लेख करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांकडून आता चारचाकी वाहनं जप्त करण्यात येत आहे. यात सुनील केदार यांची चारचाकी देखील जप्त करण्यात आली आहे. 

 पोलिसांच्या एफआयआरमध्ये गंभीर गोष्टींचा उल्लेख...

विनापरवानगी काढण्यात आलेल्या रॅली प्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात पोलिसांनी  एफआयआरमध्ये गंभीर गोष्टींचा उल्लेख केला आहे. ज्यात, नागपूर सेंट्रल कारागृहात अनेक जहाल नक्षलवादी आणि काही दहशतवादी शिक्षा भोगत आहेत. असे असतानाही सुनील केदार यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर कारागृहाच्या परिसरात गर्दी केली होती. या परिसरात कुठल्याही प्रकारे गर्दी करू नयेत अशा सूचना पोलिसांनी एक दिवस आधीच केदार यांच्या समर्थकांना दिल्या होत्या. असे असतांना सुद्धा गर्दीकरून घोषणाबाजी करण्यात आली. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कारागृह परिसर संवेदनशील असून, त्या ठिकाणी असे कृत्य करण्यात येऊ नये असे सांगूनही केदार यांच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी गर्दी करत घोषणाबाजी केल्याचा एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहेत. तसेच, केदार जेलमधून बाहेर येताच कारच्या सनरूफमधून बाहेर निघून कार्यकर्त्यांना जेल समोरच अभिवादन करत होते. त्या ठिकाणीच कार्यकर्त्यांनी त्यांची कार थांबून त्यांना हार घातले. असा सर्व तपशील पोलिसांनी एफआयआरमध्ये नोंदवला आहे. त्यामुळे केदार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

सुनील केदारांच्या अडचणीत वाढ होणार?; रॅली काढून केलेलं शक्तिप्रदर्शन भोवण्याची शक्यता

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Police: पुण्यातील सर्व टेकड्यांवर आता बसवणार
पुण्यातील सर्व टेकड्यांवर आता बसवणार "सर्च लाईट"; बोपदेव घाटातील घटनेनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडवर
हेच का अच्छे दिन? छत्रपती संभाजीराजे मुंबईत धडकले, सरकारविरोधात आंदोलनाचं शस्त्र, नेमकं कारण काय?
हेच का अच्छे दिन? छत्रपती संभाजीराजे मुंबईत धडकले, सरकारविरोधात आंदोलनाचं शस्त्र, नेमकं कारण काय?
Sharad Pawar: माढ्यात शिंदे कुटुंबाकडे तुतारी सोपवून शरद पवार 'या' तीन मतदारसंघातील राजकारण कसं साधणार?
माढ्यात शिंदे कुटुंबाकडे तुतारी सोपवून शरद पवार 'या' तीन मतदारसंघातील राजकारण कसं साधणार?
Rahul Gandhi In Kolhapur : शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात लढाई ते आरक्षण मर्यादेची भिंत तोडणारच! राहुल गांधींनी रणशिंग फुंकले!
शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात लढाई ते आरक्षण मर्यादेची भिंत तोडणारच! राहुल गांधींनी रणशिंग फुंकले!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hiraman Khoskar Meet Sharad Pawar : काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी, खोसकरांची शरद पवारांसोबत चर्चाABP Majha Marathi News Headlines TOP Headlines 11 AM 06 October 2024Nitin Gadkari Sangli : मुंबई-पुणे-बंगळूर महामार्ग बांधणार, पाच ठिकाणी उतरणार विमानRamRaje Nimbalkar Join NCP | तुतारी हाती घ्यायची का? असं विचारताच कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Police: पुण्यातील सर्व टेकड्यांवर आता बसवणार
पुण्यातील सर्व टेकड्यांवर आता बसवणार "सर्च लाईट"; बोपदेव घाटातील घटनेनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडवर
हेच का अच्छे दिन? छत्रपती संभाजीराजे मुंबईत धडकले, सरकारविरोधात आंदोलनाचं शस्त्र, नेमकं कारण काय?
हेच का अच्छे दिन? छत्रपती संभाजीराजे मुंबईत धडकले, सरकारविरोधात आंदोलनाचं शस्त्र, नेमकं कारण काय?
Sharad Pawar: माढ्यात शिंदे कुटुंबाकडे तुतारी सोपवून शरद पवार 'या' तीन मतदारसंघातील राजकारण कसं साधणार?
माढ्यात शिंदे कुटुंबाकडे तुतारी सोपवून शरद पवार 'या' तीन मतदारसंघातील राजकारण कसं साधणार?
Rahul Gandhi In Kolhapur : शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात लढाई ते आरक्षण मर्यादेची भिंत तोडणारच! राहुल गांधींनी रणशिंग फुंकले!
शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात लढाई ते आरक्षण मर्यादेची भिंत तोडणारच! राहुल गांधींनी रणशिंग फुंकले!
Tomato Price : टोमॅटोची 'लाली' वाढली, बळीराजाला दिलासा, 1 किलो टोमॅटो घेण्यासाठी द्यावे लागतात 'एवढे' पैसे 
टोमॅटोची 'लाली' वाढली, बळीराजाला दिलासा, 1 किलो टोमॅटो घेण्यासाठी द्यावे लागतात 'एवढे' पैसे 
Mangal Gochar 2024 : दिवाळीपूर्वीच मंगळाची चाल बदलणार; 3 राशींचं नशीब हिऱ्यासारखं चमकणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
दिवाळीपूर्वीच मंगळाची चाल बदलणार; 3 राशींचं नशीब हिऱ्यासारखं चमकणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
मोठी बातमी! क्रॉस व्होटिंगचा ठपका असलेले काँग्रेस आमदार अचानक शरद पवारांच्या भेटीला, नेमकं काय आहे कारण?
मोठी बातमी! क्रॉस व्होटिंगचा ठपका असलेले काँग्रेस आमदार अचानक शरद पवारांच्या भेटीला, नेमकं काय आहे कारण?
Ahmednagar News : मंदिराच्या परिसरात दारु आणि मांसविक्रीच्या दुकानांवर बंदी घाला, वारकऱ्यांच्या मागणीवर विखे पाटील म्हणाले...
मंदिराच्या परिसरात दारु आणि मांसविक्रीच्या दुकानांवर बंदी घाला, वारकऱ्यांच्या मागणीवर विखे पाटील म्हणाले...
Embed widget