एक्स्प्लोर

सुनील केदारांच्या अडचणीत वाढ होणार?; रॅली काढून केलेलं शक्तिप्रदर्शन भोवण्याची शक्यता

Sunil Kedar : विनापरवानगी रॅली काढून वाहतुकीत अडथळा आणल्याप्रकरणी सुनील केदार आणि त्यांच्या समर्थकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

Nagpur Crime News : पोलिसांची परवानगी नसतानाही जामीन मिळाल्यानंतर कारागृहातून बाहेर येताच काढण्यात आलेल्या रॅली प्रकरणी सुनील केदारांच्या (Sunil Kedar) अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, पोलिसांनी या सर्व प्रकरणात वाहतुकीत अडथळा आणल्याप्रकरणी सुनील केदार आणि त्यांच्या समर्थकांवर बुधवारी रात्री धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी एफआयआरमध्ये गंभीर गोष्टींचा देखील नोंद केली आहे. विशेष म्हणजे काही अटी आणि शर्तीवर केदार यांना जामीन मिळाला होता, त्यामुळे कार्यकर्त्यांनी केलेल्या शक्तिप्रदर्शनामुळे केदार यांच्या अडचणी वाढू शकतात असे बोलले जात आहे. आता पोलिसांकडून कोणती कारवाई केली जाते हे पाहणं महत्वाचे आहे. 

150 कोटी रुपयांच्या नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या गुंतवणूक घोटाळ्याप्रकरणी 22 डिसेंबर रोजी नागपूरच्या न्यायालयाने सुनील केदार आणि इतर पाच आरोपींना शिक्षा सुनावली होती. सुनील केदार यांना पाच वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर 28 डिसेंबर पासून ते तुरुंगात होते. परंतु, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्यांना जामीन मंजूर केल्यानंतर काल दुपारी त्यांची कारागृहातून सुटका झाली. तेव्हा कारागृहपासून नागपूरचे संविधान चौकापर्यंत सुनील केदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत रॅली काढली होती. विशेष म्हणजे पोलिसांनी यासाठी कोणतेही परवानगी दिलेली नव्हती. त्यामुळे विनापरवानगी रॅली काढून वाहतुकीत अडथळा आणल्याप्रकरणी सुनील केदार आणि त्यांच्या समर्थकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

जेल परिसर संवेदनशील असतानाही गर्दी...

नागपूर सेंट्रल जेलमध्ये अनेक जहाल नक्षलवादी आणि काही दहशतवादी कैदेत आहे. असे असतानाही सुनील केदार यांची काल जेलमधून सुटका होताना त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर जेलच्या समोरील परिसरात गर्दी केली होती. एक दिवस आधीच सुनील केदार यांच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी गर्दी करण्यात येऊ नये अशी सूचना पोलिसांनी दिली होती. तरी देखील गर्दीकरून घोषणाबाजी करण्यात आली. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जेल परिसर संवेदनशील असून, त्या ठिकाणी असे कृत्य करण्यात येऊ नये असे सांगूनही केदारांच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी गर्दी करत घोषणाबाजी केली असे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहेत. केदार जेलमधून बाहेर येताच कारच्या सनरूफमधून बाहेर निघून कार्यकर्त्यांना जेल समोरच अभिवादन करत होते. त्या ठिकाणीच कार्यकर्त्यांनी त्यांची कार थांबून त्यांना हार घातले. असा सर्व तपशील पोलिसांनी एफआयआरमध्ये नोंदवला आहे. 

वाहनांच्या नंबरची एफआयआरमध्ये उल्लेख...

एवढेच नाही तर कालच्या रॅलीमध्ये सहभागी असलेल्या 20 पेक्षा जास्त चारचाकी वाहनांचे नंबरही पोलिसांनी एफआयआरमध्ये नमूद केले आहे. 'एबीपी माझा'ला मिळालेल्या माहितीनुसार या गाड्यांचा तपशील पोलीस शोधत असून, पोलिसांना शंका आहे की या सर्व गाड्या विविध बेकायदेशीर कृत्यांमध्ये लागलेल्या माफीयांशी संबंधित असू शकते. त्यामुळे पोलिसांच्या तापसानंतर सुनील केदार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Sunil Kedar : काँग्रेस नेते सुनील केदार यांना मोठा दिलासा, हायकोर्टाकडून जामीन मंजूर

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Accident: मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
Devendra Fadnavis Nagpur: देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
Crime News: पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
Nagpur Crime: नागपूरमध्ये मुलीसोबत नको ते केलं, पोलिसांना खोलीत उत्साहवर्धक गोळ्या, पट्टा अन् हातमोजे सापडले, पोलिसांसमोर आरोपीचा माज कायम
नागपूरमध्ये मुलीसोबत नको ते केलं, पोलिसांना खोलीत उत्साहवर्धक गोळ्या, पट्टा अन् हातमोजे सापडले, पोलिसांसमोर आरोपीचा माज कायम

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार, अमित शाहांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली; लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही, लाठीचार्ज, गोळीबाराचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा पलटवार
मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार, अमित शाहांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली; लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही, लाठीचार्ज, गोळीबाराचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा पलटवार
Nagpur Accident: मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
Sanjay Raut: संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
Cristiano Ronaldo: पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सात जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सात जणांचा मृत्यू
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
Devendra Fadnavis Nagpur: देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
Embed widget