Teachers Constituency Elections : गोंधळलेल्या अवस्थेत शिवसेनेच्या गंगाधर नाकाडेंची माघार; महाविकास आघाडीतील एकमेव उमेदवाराची माघार
अखेरच्या क्षणी अर्ज मागे घेण्याच्या धडपडीत नाकाडेंनी अनेक सिग्नलही तोडले. धावत धावतच ते विभागीय आयुक्त कार्यालयात गेले. आधी चुकीच्या कक्षात होते, मग बाहेर येऊन योग्य कक्षात त्यांनी अर्ज मागे घेतला.
![Teachers Constituency Elections : गोंधळलेल्या अवस्थेत शिवसेनेच्या गंगाधर नाकाडेंची माघार; महाविकास आघाडीतील एकमेव उमेदवाराची माघार Shiv Senas Gangadhar Nakade withdrawal nomination of Teachers Constituency Elections Teachers Constituency Elections : गोंधळलेल्या अवस्थेत शिवसेनेच्या गंगाधर नाकाडेंची माघार; महाविकास आघाडीतील एकमेव उमेदवाराची माघार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/16/181518a23f83a2cd66bf7418cf94c4fb1673866125027440_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Teachers Constituency Elections News : नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीकडून (MVA) शिवसेनेच्या शिक्षक सेनेचे गंगाधर नाकाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल गेला होता. पण काही वेगवान घडामोडींनंतर त्यांना माघार घ्यावी लागली. आत्ताच थोड्या वेळापूर्वी मातोश्रीवरुन कॉल आल्यानंतर त्यांनी शेवटच्या क्षणी हा निर्णय घेतला. अखेरच्या क्षणी अर्ज मागे घेण्याच्या धडपडीत त्यांनी अनेक सिग्नलही तोडले. त्यानंतर अगदी धावत धावतच ते विभागीय आयुक्त कार्यालयात गेले. गोंधळलेल्या अवस्थेत नाकाडे यांना कुठल्या कक्षात जाऊन अर्ज मागे घ्यायचं आहे. हे ही सापडत नव्हते. ते तसेच धावत धावत चुकीच्या कक्षात शिरले. मग बाहेर येऊन योग्य कक्षात जाऊन त्यांनी आपला अर्ज मागे घेतला.
गंगाधर नाकाडे यांनी वर्षभरापासून तयारी केली होती. पण आता शेवटच्या क्षणी त्यांनी माघार घेतली आहे. गेल्या पाच वर्षांपासून शिक्षक सेनेचा मी विभागीय अध्यक्ष आहे. शिवसेनेच्या शिक्षक सेनेचे राज्याध्यक्ष अभ्यंकर यांचा मला कॉल आला होता. त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला सांगितला. त्यामुळे आता पक्षश्रेष्ठी सांगतील, त्या उमेदवाराचे काम आम्ही आता करु. या घडामोडींमुळे आमचा हिरमोड नक्कीच झाला आहे, असे नाकाडे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर सांगितले.
पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाचं सन्मान
गेल्या पाच वर्षांत आम्ही शिक्षकांसाठी भरपूर काम केले. कार्यकर्त्यांनी प्रचंड परिश्रम घेतले होते. संघटना चांगल्या पद्धतीने बांधली होती. ही जागा लढलो असतो, तर सर्वाधिक जास्त मतांनी ही जागा निवडून आली असती. पण पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतात, तो योग्य असतो. महाविकास आघाडीचा उमेदवार असो किंवा अन्य कुणीही, जे पक्षश्रेष्ठी सांगतील, त्या उमेदवाराचे काम करणार असल्याचे गंगाधर नाकाडे यांनी सांगितले.
नागपुरात 22 शिक्षकांची आमदारकीची परीक्षा
राज्यात पाच ठिकाणी, कोकण, औरंगाबाद, नागपूर येथे शिक्षक आणि नाशिक, अमरावती येथे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका होत आहेत. यांपैकी नाशिक पदवीधर आणि नागपूर शिक्षक हे दोनच मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत राहिले आहे. नाशिक सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्यामुळे आणि शिवसेनेचा पाठिंबा लाभलेल्या शुभांगी पाटील नॉट रिचेबल असल्याने, तर नागपूर गंगाधर नाकाडे यांची माघार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सतीश इटकेलवार हे नॉट रिचेबल असल्यामुळे. आता नागपुरात रिंगणात 22 उमेदवार असणार आहेत. नागपूर शिक्षक मतदारसंघात आज पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. यामध्ये नीलकंठ उईके, अतुल रुईकर, मुकेश पुडके, मृत्युंजय सिंग आणि गंगाधर नाकाडे यांचा समावेश आहे. एकूण 27 उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. पैकी पाच उमेदवारांनी माघार घेतली त्यामुळे 22 उमेदवार या निवडणुकीत नशीब अजमावणार आहेत.
शेवटच्या क्षणी गोंधळ...
महाराष्ट्र शिक्षक सेनेचे उमेदवार गंगाधर नाकाडे हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अगदी अखेरच्या क्षणी सात मिनिटांपूर्वी विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचले. अखेरच्या क्षणी अर्ज मागे घेण्याच्या धडपडीत त्यांनी अनेक सिग्नल ही तोडले. त्यानंतर अगदी धावत धावतच ते विभागीय आयुक्त कार्यालयात गेले. गोंधळलेल्या अवस्थेत नाकाडे यांना कुठल्या कक्षात जाऊन अर्ज मागे घ्यायचं आहे. हे ही सापडत नव्हते. ते तसेच धावत धावत चुकीच्या कक्षात शिरले. मग बाहेर येऊन योग्य कक्षात जाऊन त्यांनी आपला अर्ज मागे घेतला. दरम्यान, अर्ज मागे घेतल्यानंतर जेव्हा एबीपी माझाने त्यांना सिग्नल तोडण्याची आठवण करुन दिली. तेव्हा पक्षाचा आदेश होता म्हणून कायदा तोडून इथे पोहोचल्याचे मत व्यक्त केले.
ही बातमी देखील वाचा...
'नॉट रीचेबल' उमेदवार इटकेलवार यांचे राष्ट्रवादीतून तात्काळ निलंबन
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)