NCB Drugs Raid : समीर वानखेडे पोपट, त्याच्यावर कोणतीही कारवाई होणार नाहीः पटोले
NCB Drugs Raid : आर्यन खानवरील कारवाईबाबत कॉंग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली होती. मोदी सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करण्यात येत असल्याचे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
नागपूरः मुंबईतील क्रूझ पार्टीवर एनसीबीकडून (NCB Raid) करण्यात आलेल्या कारवाईवर प्रश्न चिन्ह उपस्थित झाला आहे. यात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला कोर्टाकडून क्लीन चिट मिळाली आहे. तर या प्रकरणाचा तपास करणारे एनसीबीचे तत्कालीन मुंबई प्रमुख समीर वानखेडे (sameer wankhede) यांच्याविरोधात चौकशी सुरु होणार असल्याची माहिती आहे. यावर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नागपूरात कॉंग्रेसच्या नवसंकल्प शिबीरानिमित्त आले असताना प्रसार माध्यमांशी बोलत होते.
मोदी सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणेचा सातत्याने दुरुपयोग होत आहे. हे आम्ही आधीपासूनच सांगत आहोत. आर्यन खान प्रकरणातही कॉंग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली होती. समीर वानखेडेवर कुठहीली कारवाई होणार नाही. कारण वानखेडे केंद्रीय तपास यंत्रणेतील एक पोपट होता. या पोपटावर कुठलीही कारवाई होणार नाही हे आपल्याला येत्या काळात दिसून येईल, असेही पटोले म्हणाले.
राज्यसभेवर प्रियांका गांधी यांच्या तिकीटाबाबत प्रश्न विचारले असता, 'महाराष्ट्रातून राज्यसभेवर प्रियांका गांधी यांना तिकीट मिळाली तर सर्व कॉंग्रेसजन स्वागत करणार' असेही ते म्हणाले.
मी हनुमान चालीसा वाचून घरातून निघतोः नाना पटोले
'हनुमान चालीसा हा आस्थेचा विषय आहे. मी मी हनुमान चालीसा वाचून घरातून निघतो. त्याची जाहीरात आम्ही केली नाही आणि करतही नाही. तसेच राणा दाम्पत्यावर काहीही बोलणार नाही. देशासमोर सध्या दुसरे महत्वाचे प्रश्न आहेत. गरीबी, महागाईमुळे नागरिकांचे जगणे कठीन झाले आहे. दुसरीकडे मोदी सरकारकडू देश विकण्याचे काम सुरु आहे.'
भाजपकडून दररोज 40 लाखांचे खर्च
नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी भाजपकडून सोशल मिडीयावर दररोज 40 लाख रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. मात्र कॉंग्रेस तसे करणार नाही. जनतेसमोर वस्तूस्थिती मांडण्यासाठी कॉंग्रेसने नागपूरात कॉंग्रेसचे नवसंकल्प शिबीराचे आय़ोजन केले आहे. यात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून 325 पदाधिकारी सहभागी झाले आहे. तसेच रविवारी आयोजित राष्ट्रीय अधिवेशनात मोठ्यासंख्येत पदाधिकारी येणार आहे. यात कार्यकर्त्यांना अनुभवी नेते, तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे.
वाचा
Aryan Khan Chronology : क्रूझ ड्रग्ज प्रकरण ते क्लीनचिट... अशी आहे आर्यन खान केसची क्रोनोलॉजी
Aryan Khan : आर्यन खान विरोधात पुरावे नाहीत, NCBकडून मिळाली Clean Chit
Aryan Khan : आर्यन खान सोशल मीडियावर बॅक; सुहानासाठी केली खास पोस्ट