एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
नागपुरात सकल मराठा समाजाचा नितीन गडकरींना पाठिंबा
आज नागपूरच्या सकल मराठा समाजाच्या वतीने प्रेस क्लबला पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यात समाजाचे अनेक पदाधिकारी आणि सामान्य नागरिक सहभागी झाले होते.
![नागपुरात सकल मराठा समाजाचा नितीन गडकरींना पाठिंबा Sakal Maratha Samaj supports BJP candidate Nitin Gadkari in Nagpur नागपुरात सकल मराठा समाजाचा नितीन गडकरींना पाठिंबा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/03/16121215/Nitin-Gadkari.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नागपूर : लोकसभा निवडणुकीसाठी सकल मराठा समाजाने नागपुरातील भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांना पाठिंबा जाहीर केला आहे. नागपूर शहराचा, क्षेत्राचा विकास करण्याची क्षमता, गेली पाच वर्ष केलेली कामं आणि सर्वांना सहज उपलब्ध नेतृत्व, या सर्व कारणांनी सकल मराठा समाजाने नितीन गडकरी यांच्यासाठी मतदान करण्याचा निर्णय घेतल्याचे सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी आज सांगितलं.
आज नागपूरच्या सकल मराठा समाजाच्या वतीने प्रेस क्लबला पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यात समाजाचे अनेक पदाधिकारी आणि सामान्य नागरिक सहभागी झाले होते. नितीन गडकरी यांच्यामार्फत समाजाचे प्रलंबित प्रश्न सोडवणं शक्य होईल, असा विचार करुन समाजाचं मत जाणून घेऊन, त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचं सकल मराठा समाजाचे पदाधिकारी प्रशांत मोहिते आणि नरेंद्र मोहिते यांनी सांगितलं.
दरम्यान, काँग्रेसचे नागपुरातील उमेदवार नाना पटोले हे कुणबी समाजाचे आहेत. त्यामुळे कुणबी समाजाचं मतदान काँग्रेसला मिळेल अशी काँग्रेसची अपेक्षा असली तरी, कुणबी समाजाने अद्याप कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा जाहीर केलेला नाही. मात्र आता सकल मराठा समाजाने पत्रक जारी करुन नितीन गडकरींना पाठिंबा दिल्याचं जाहीर केलं.
![नागपुरात सकल मराठा समाजाचा नितीन गडकरींना पाठिंबा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/04/09174844/sakal-maratha-samaj.jpg)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
बीड
क्रीडा
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)