एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

माथी भडकावणाऱ्यांपासून दूर राहा; सरसंघचालक मोहन भागवत यांचा सल्ला

कोरोना व्हायरसच्या संकटामुळे देशात कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या एकांतवासात राहणे, हीच देशसेवा आहे. सोबतचं माथी भडकावणाऱ्यांपासून दूर राहण्याचा सल्ला सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिला.

मुंबई : कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे देश सध्या संकटात सापडला आहे. या काळात आपल्या सर्वांना एकांतात राहून देशसेवा करायची आहे. सरकार आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा, कोणत्याही अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नका. सध्या सकंटाचा काळ आहे, त्यामुळे माथी भडकावणाऱ्यांपासून दूर राहा. आपापल्या समाजाला दिशा देण्याचं काम प्रत्येकाने नागरिक म्हणून करावे, असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिला. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ते नागपुरात बोलत होते.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात पुन्हा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. सध्या एकूण 40 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र, परिस्थिती नियंत्रणात न आल्यास लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. लॉकडाऊन असल्याने सर्व आर्थिक व्यवहार ठप्प पडले आहेत. काही लोक नियमांचे पालन करताना दिसत नाही. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी निवेदन सादर केले. यावेळी एकांतात बसणे हीच राष्ट्रसेवा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सरकार आणि प्रशासनाचे सूचनांचे पालन करुन त्यांना सहकार्य करणे आवश्यक आहे. लॉकडाऊन उठवल्यानंतर समाजाने उतावळे होऊ नये, असंही त्यांनी सांगितले.

..तर, केंद्रातील अर्थव्यवस्थेला राज्ये योगदान देऊ शकणार नाहीत; शरद पवार यांचे पंतप्रधानांना पत्र

माथी भडकावणाऱ्यांपासून दूरू राहा भय क्रोधापासून दूर राहणे, आवश्यक असल्याचे भागवत यांनी सांगितले. कारण, घाबरल्याने शत्रूचे मनोबल वाढते. तर, क्रोधाने तुमचे स्वास्थ बिघडेल. त्यामुळे माथी भडकावणाऱ्यांपासून दूर राहण्याचा सल्ला भागवत यांनी दिला आहे. प्रत्येक समाजाच्या समजूतदार लोकांनी पुढे येऊन आपापल्या समाजाला दिशा देण्याचं करायला हवं. या काळात कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम करुन गर्दी करू नये. संघाचे सर्व कार्यक्रम रद्द केले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. या संकटाकाळात जे सेवा करत आहेत. त्यांनी ही सेवा निस्वार्थ भावाने करायला हवी. उपकाराच्या भावनेने कधी सेवाभाव होत नाही.

Uddhav Thackeray | मला जीव वाचवायचेत, राजकारण करायचं नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पालघर घटना दुर्दैवी पालघरमध्ये दोन सांधूंची हत्या झाली ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे भागवत म्हणाले. अशा घटनांमध्ये पोलिसांची भूमिका काय असावी हे महत्वाचं आहे. येत्या 28 एप्रिलला या साधूंना श्रद्धाजली देण्यात येणार आहे. विश्व हिंदू परिषदेने या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले. भारताने जगभरात औषधांचा पुरवठा केला; ही आपल्या देशाची संस्कृती आहे. आपल्या व्यवहारात, प्रेम, भावना, सेवा असायला हवी. ज्यांना मदतीची गरज आहे, त्यांच्यापर्यंत मदत पोहचवा. जे कोरोनाविरोधात लढत आहे, त्यांना साथ द्या. या काळात स्वयंशिस्त खूप महत्वाची आहे. जोपर्यंत काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत संयम ठेवण्यासही त्यांनी सांगितले.

Police Drone Watch | लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी 50हून अधिक ड्रोन पोलिसांच्या मदतीला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil on Balasaheb Thorat : भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
Ajit Pawar: कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NCP Ajit Pawar : गुलाबी जॅकेट ते गुलाबी गाडी ; अजित पवारांची थीम यशस्वीMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  24 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 24 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil on Balasaheb Thorat : भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
Ajit Pawar: कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Koregaon Assembly Elections 2024 : महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Embed widget