Nagpur: 12 जून रोजी मुंबई- नागपूर विशेष रेल्वे तर, काजीपेट-नागपूर दरम्यान आरआरबी परीक्षा विशेष रेल्वेची व्यवस्था
मुंबई ते नागपूरसाठी 12 जून रोजी विशेष रेल्वेची व्यवस्था. तसेच विशेष काजीपेट-नागपूर-काजीपेट दरम्यान विशेष रेल्वेची व्यवस्था. दोन्ही रेल्वेची बुकिंग रेल्वे स्थानकावरुन किंवा ऑनलाईन करता येईल.
नागपूरः नियमित रेल्वे गाड्यांमधील प्रवाशांची मागणी बघता आणि गर्दीवर नियंत्रणासाठी मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल आणि नागपूर दरम्यान 12 जून रोजी विशेष रेल्वे चालविण्याची घोषणा केली आहे.
ट्रेन क्रमांक 01061 ही 12 जून 2022 रोजी मध्ये रात्री 12.20 वाजता मुंबईतून निघेल आणि दुसऱ्या दिवशी 12 जून रोजी दुपारी 15.32 वाजता नागपूरला दाखल होईल. ही विशेष रेल्वे दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मुर्तीजापूर, बडनेरा, धामणगाव, वर्धा या थांब्यांवर थांबेल. यात एक एसी टू टिअर, एक एसी थ्री टिअर, 12 जनरल सेकंड क्लास, 2 लगेज बोगी असणार आहे.
काजीपेट-नागपूर दरम्यान आरआरबी परीक्षा विशेष ट्रेन
गाडी क्रमांक 07448 काजीपेट येथून 10 जून रोजी दुपारी 14.20 वाजता निघाली आणि 11 जून 2022 रोजी नागपूर येथे सकाळी 10.30 वाजता पोहोचेल. तसेच 07449 12 जून रोजी नागपूर येथून 22.30 वाजता निघेल आणि 13 जून रोजी सायंकाळी 19.00 वाजता काजीपेट येथे पोहोचेल. ही गाडी पेद्दापल्ली, करीमनगर, लिंगमपेट जगित्याल, कोरटला, मेटपल्ली, आर्मूर, निजामाबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, बासमत, हिंगोली, वाशिम, अकोला, बडनेरा येथे थांबेल. रेल्वेची संरचनेत 8 सेकंड क्लास सीटिंग, एक सेकंड क्लास चेअर कार आणि 2 जनरल सेकंड क्लास राहील. स्पेशल रेल्वे 07449 साठी 5 सेकंड क्लास सीटिंग कोच करिता बुकिंग आजपासून (10 जून) सुरु झाली असून रेल्वे स्थानक आणि www.irctc.co.in संकेतस्थळावर बुकिंग करता येईल. उर्वरित एक द्वितीय श्रेणी चेअर कार, 3 द्वितीय श्रेणी सीटिंग आणि 2 द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन या कोचचा समावेश आहे.
इतर महत्वाच्या बातम्या