Nagpur Covid Update: जिल्ह्यात आज 43 नवे कोरोना बाधित; अॅक्टिव्ह बाधितसंख्या 102वर
आज आढळलेल्या नवीन 43 बाधितांसह जिल्ह्यातील एकूण बाधितसंख्या 102वर पोहोचली आहे. मात्र सर्व बाधित गृह विलगीकरणात असून एकालाही रुग्णालयात जाण्याची गरज पडली नाही ही दिलासादायक बाब आहे.
नागपूरः देशभरात कोरोना बाधितसंख्येत वाढत असताना महाराष्ट्रात सर्वाधिक बाधित आढळून येत आहे. यासोबतच नागपूर शहरासह जिल्ह्यातही कोरोना बाधितांचा आलेख झपाट्याने वाढ आहे. जिल्ह्यात आज नव्या 43 बाधितांची भर पडली आहे. यासह जिल्ह्यातील एकूण अॅक्टिव्ह बाधितसंख्या 102 वर पोहोचली आहे.
शहरात 29 नवे कोरोना बाधित
नागपूर शहरातही आज 1827 चाचण्या झाल्या. नवीन 29 रुग्णांची भर यात पडली आहे. आजच्या नवीन रुग्णांसह नागपूर शहरातील अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या 67 वर पोहोचली आहे. यासह आज एकूण 2 रुग्ण बरे झाले आहे.
ग्रामीणमध्ये 11 नमुने कोरोना पॉझिटिव्ह
नागपूर ग्रामीणमध्ये 11 रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यासह जिल्ह्याबाहेरील 3 नमुनेही पॉझिटिव्ह आले आहे. शहर आणि ग्रामीण दोन्ही मिळून आज 43 नवे बाधितांची नोंद झाली आहे.
आज 5 कोरोनामुक्त
बाधितांच्या संख्येसह आज बरे होणाऱ्यांमध्ये शहरातून 2, ग्रामीणमधून एक तर जिल्ह्याबाहेरील 2 बाधित कोरोनामुक्त झाले आहे.
विशेष म्हणजे सर्व बाधित गृह विलगिकरणात
कोरोना बाधित संख्या वाढत असताना मात्र एकाही बाधिताला रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडली नसून जिल्ह्यातील सर्व 102 रुग्ण हे गृह विलगिकरणात असल्याची दिलासादायक बाब आहे.
शनिवारी मनपा केंद्रांमध्ये केवळ कोर्बेव्हॅक्स उपलब्ध
नागपूर : नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील लसीकरण केंद्रांवर आता दिवसनिहाय वेगवेगळी लस देण्यात येत आहे. त्यामुळे शनिवारी 11 जून, 2022 रोजी मनपाच्या सर्व लसीकरण केंद्रांवर केवळ कोर्बेव्हॅक्स लस उपलब्ध राहणार आहे. लस सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत देण्यात येणार आहे. लसीकरणसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येईल. तसेच लस घेण्यासाठी जाताना सोबत नोंदणी केलेला मोबाईल आणि ओळखपत्र बाळगावे, असे आवाहन मनपाच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आलेले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Nagpur Elections : 11 नगरपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग
Nagpur : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, तिच्या वडिलांनाही अश्लील शिवीगाळ