एक्स्प्लोर

Maharashtra RTO Rules | एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वाहन आणताना नोंदणी करणं गरजेचं; जाणून घ्या RTO चे नियम!

Maharashtra RTO Rules : जेव्हा आपण लांब कालावधीसाठी एका परिवहन कार्यलयाच्या हद्दीतून दुसऱ्या परिवहन कार्यालयाच्या हद्दीत जातो किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात राहायला जातो. तेव्हा आपल्या वाहनाला तिथे नोंदणीकृत करून घेणे आपली जबाबदारी ठरते.

नागपूर : प्रत्येकाला आपल्या दुचाकी किंवा चारचाकी वाहनाची परिवहन विभागाकडे (आरटीओ) नोंदणी करावी लागते. नोंदणी केल्यानंतर परिवहन विभाग प्रत्येक वाहनाला एक विशिष्ट वाहन क्रमांक बहाल करतो. त्या विशिष्ट्य वाहन क्रमांकाने आपण आवश्यक परवाने घेऊन देशात कुठे ही फिरायला जाऊ शकतो. मात्र, जेव्हा आपण स्थलांतरण/बदली किंवा इतर कारणाने आपलं वाहन नोंदणीकृत असलेल्या परिवहन कार्यालयाच्या हद्दीतून ( उदाहरण MH 31) दुसऱ्या परिवहन कार्यालयाच्या हद्दीत जातो. तेव्हा मात्र आपल्याला काही प्रशासकीय सोपस्कार करावे लागतात. ते सोपस्कार काय असतात हे आपण जाणून घेऊ या...

जेव्हा आपण लांब कालावधीसाठी एका परिवहन कार्यलयाच्या हद्दीतून दुसऱ्या परिवहन कार्यालयाच्या हद्दीत जातो किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात राहायला जातो. तेव्हा आपल्या वाहनाला तिथे नोंदणीकृत करून घेणे आपली जबाबदारी ठरते. मोटार वाहन निरीक्षक आनंद मोहोड यांनी एबीपी माझाला दिलेल्या माहितीनुसार, "सर्वात आधी आपल्याला ज्या आरटीओ कार्यालयाच्या हद्दीत आपले वाहन नोंदणीकृत आहे. तिथून एक "एनओसी" घ्यावी लागते. ती "एनओसी" ज्या परिवहन कार्यालयाच्या हद्दीत आपल्याला जायचे आहे. त्या कार्यालयात जाऊन द्यावी लागते. त्यानंतर जर नव्या परिवहन कार्यालयाच्या हद्दीतले आपले वास्तव्य एक वर्षापर्यंतचे असेल तर वाहन मालक म्हणून आपल्याला "फॉर्मल ट्रान्स्फर" म्हणजेच "एफटी डिक्लेरेशन" करावे लागते. त्यासाठी त्या वाहनासाठीचे रोड टॅक्स आणि इतर शुल्क भरावे लागते. ते केल्यानंतर आपण आपल्या मूळ वाहन नोंदणी क्रमांकावरच त्या नव्या ठिकाणी वाहन चालवू शकतो.

मात्र, जर दुसऱ्या परिवहन कार्यालयाच्या हद्दीतले आपले वास्तव्य एका वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी असणार असेल तर फॉर्मल ट्रान्स्फरच्या प्रक्रियेऐवजी आपल्या "रिएसाईन्डमेन्ट ऑफ मायग्रेटेड व्हेईकल" म्हणजेच "आरएमए डिक्लेरेशन" करावे लागते. या प्रक्रियेत ही आपल्याला आपल्या वाहनासाठीचे रोड टॅक्स आणि इतर शुल्क भरावे लागतात. "आरएमए डिक्लेरेशन"च्या बाबतीत रोड टॅक्स व इतर शुल्क भरल्यानंतर आपल्याला वाहनाला त्या नव्या परिवहन कार्यालयाच्या हद्दीतले नवे वाहन नोंदणी क्रमांक मिळते. जोपर्यंत आपण त्या नव्या ठिकाणी असतो, तोवर आपल्याला ते नवे वाहन नोंदणी क्रमांक उपलब्ध असतात. मात्र, विशिष्ट कालावधी नंतर आपण जेव्हा आपल्या मूळ ठिकाणी परततो, तेव्हा आपल्याला आपले जुने वाहन नोंदणी क्रमांक मिळते. या स्थितीत आपण नव्या परिवहन कार्यालयाच्या हद्दीत भरलेले रोड टॅक्स आपल्याला रिफंड भरल्यानंतर 10 टक्के कपात करून परत मिळू शकते.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Maharashtra RTO Rules: परराज्यात घेतलेलं वाहन महाराष्ट्रात आणायचंय? काय आहेत RTO चे नियम?

महत्त्वाच्या बातम्या

Ramdas Athawale: सर्व मराठ्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र मिळणे अशक्य; मराठा समाजाला खुशाल आरक्षण द्या, पण...; केंद्रीय मंत्री रामदास आठवले स्पष्टचं बोलले
सर्व मराठ्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र मिळणे अशक्य; मराठा समाजाला खुशाल आरक्षण द्या, पण...; केंद्रीय मंत्री रामदास आठवले स्पष्टचं बोलले
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
Ravindra Chavan : सोशल मीडियावर आपण कमी पडतोय, भाजप कार्यकर्त्यांचे रविंद्र चव्हाणांनी टोचले कान
सोशल मीडियावर आपण कमी पडतोय, भाजप कार्यकर्त्यांचे रविंद्र चव्हाणांनी टोचले कान
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Embed widget