एक्स्प्लोर

Nagpur Ganesh Visarjan : 'या' लिंकवर मिळेल नागपुरातील 204 ठिकाणच्या 390 कृत्रिम विसर्जन टँकची माहिती

मनपातर्फे जारी करण्यात आलेल्या या  https://www.nmcnagpur.gov.in//visarjan-location लिंकवर जाऊन नागरिक आपल्या घराजवळच्या विसर्जन स्थळाची माहिती मिळवू शकतात.

नागपूर : गणेशोत्सवादरम्यान (Ganeshotsav) पर्यावरणपूरक गणेश विसर्जन व्हावे, याकरिता नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरात झोननिहाय गणेश मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी गणेशमूर्तीचे विसर्जन आपल्या परिसरातील कृत्रिम तलावातच करावे, असे आवाहन मनपातर्फे (NMC) करण्यात येत आहे. विसर्जनासाठी शहरातील दहाही झोन अंतर्गत 204 विविध ठिकाणी 390 कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. गणेश विसर्जन स्थळांची संपूर्ण माहिती नागरिकांना घरबसल्या मिळावी याकरिता नागपूर महानगरपालिकेद्वारे वेब लिंक जारी करण्यात आली आहे. 

मनपातर्फे जारी करण्यात आलेल्या या  https://www.nmcnagpur.gov.in//visarjan-location लिंकवर जाऊन नागरिक आपल्या घराजवळच्या विसर्जन स्थळाची माहिती मिळवू शकतात. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार लिंक कार्यान्वित करण्यात आली आहे. गणेशोत्सवानिमित्त नागरिकांना कुठल्याही पद्धतीची अडचण येऊ नये याकरिता महानगरपालिकेची (Nagpur Municipal Corporation) यंत्रणा सज्ज झाली आहे. शहरात दहाही झोनमध्ये विविध 204 भागात कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे. तसेच 4 फूटाखालील सर्व श्रींच्या मूर्तीचे विसर्जन कृत्रिम टॅंकमध्ये व्हावे म्हणून चौकाचौकात व मैदानात कृत्रिम तलाव लावण्यात आले आहेत.

या ठिकाणी लोखंडी टॅंक निर्मिती

शहरातील फुटाळा, सोनेगाव, सक्करदरा आणि गांधीसागर या प्रमुख तलावासोबतच अन्य तलावावर लोखंडी टँकची व्यवस्था करण्यात करण्यात आली आहे. कृत्रिम तलावाच्या ठिकाणी विसर्जनासोबतच निर्माल्य संकलनासाठी कलश ठेवण्यात आले आहेत. मनपाचे कर्मचारी व स्वयंसेवक निर्माल्य संकलन करणार आहेत. कृत्रिम तलावाच्या ठिकाणी मजबूत लोखंडी बॅरिकेटिंग करण्यात येत आहे. याशिवाय विसर्जन परिसरात हायमास्ट लाइट लावण्यात आले आहेत. जागोजागी निर्माल्य कलशाची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. 

चार फुटांवरील मूर्तींचे कोराडीत विसर्जन

गणेश विसर्जन संदर्भात नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी नुकतीच बैठक घेउन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. ज्यात 4 फूटाखालील श्रींच्या मूर्तीचे विसर्जन कृत्रिम टॅंकमध्ये करण्यात यावे. तसेच 4 फुटावरील मूर्तीचे विसर्जन कोराडी येथील कृत्रिम तलावात आणि अन्य ठिकाणी होईल. कोराडीमध्ये सर्व प्रकारची व्यवस्था जसे क्रेन, बॅरिकेटिंग, रोषणाईची उत्तम सुविधा करण्यात यावी. तसेच स्वच्छता सुद्धा ठेवावी. गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची दखल घ्यावी, असे निर्देश आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत.

या संस्थांचा पुढाकर

पर्यावरणपूरक गणेश विसर्जन आणि निर्माल्य संकलनासाठी मनपाला मदत करण्यासाठी विविध स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक वेगवेगळ्या विसर्जनस्थळी उपस्थित आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही ग्रीन व्हिजिल फाऊंडेशन फुटाळा तलाव येथील एअरफोर्स बाजूने उपस्थित राहणार आहेत. तसेच सक्करदरा तलावातील किंग कोब्रा ऑर्गनायझेशन, रामनगरमधील इको-फ्रेंडली फाऊंडेशन, सोनेगाव येथील सीएसएफडी, एम्प्रेस मिल येथील तेजस्विनी महिला मंडळ, सोनेगाव तलावातील ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशन आणि गांधीसागर तलाव परिसरात निसर्ग विज्ञान आदी संस्था उपस्थित राहणार आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Nagpur ZP News : प्रशासकीय दिरंगाईचा विद्यार्थ्यांना फटका, अनेक शाळांमध्ये माध्यान्ह भोजन बंद !

Malnutrition : कुपोषित बालकांच्या संख्येत वाढ, ऑगस्ट अखेरपर्यंत 1117 मुलांची नोंद

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Avinash Jadhav Speech: एक संधी आणि ठाण्याचा काय पालट केल्याशिवाय राहणार नाही, अविनाश जाधवांचं भाषणRashmi Shukla Special Report : विरोधकांचा आरोप, निवडणूक आयोगाची कारवाई; रश्मी शुक्ला यांची बदलीKolhapur Vidhan Sabha Madhurima Raje  : मधुरिमाराजेंची माघार, Satej Patil संतापले Special ReportZero hour Full : जरांगेंची माघार ते रश्मी शुक्ला पदमुक्त, सविस्तर विश्लेषण झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
Embed widget