(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur ZP News : प्रशासकीय दिरंगाईचा विद्यार्थ्यांना फटका, अनेक शाळांमध्ये माध्यान्ह भोजन बंद !
कंत्राटदाराकडून दरवेळी वेगळे कारण पुढे केले जत आहे. या प्रकारानंतर प्रशासनाकडून पुरवठादारांना कारणे दाखवा नोटीस (Show cause notice to suppliers) बजावण्यात आली आहे.
नागपूर: धान्यासह अन्य साहित्याचा पुरवठा थांबल्याने शालेय पोषण आहार योजनेंचा बोजवारा उडाला आहे. प्रशासकीय दिरंगाईचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. अनेक शाळांतील विद्यार्थ्यांना आठवडाभरापासून माध्यान्ह भोजनापासून वंचित राहावे लागत आहे. शाळेतील दुपारचे जेवण मिळणे बंद झाल्याने विद्यार्थ्यांसह पालकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत इयत्ता 1 ली ते 8 वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन (Midday Meal Scheme) दिले जाते. त्यासाठी मे महिन्यात धान्यासह अन्य साहित्याचा पुरवठा करण्यात आला होता. आता शाळा सुरू होऊन तीन महिने उलटून गेले तरी अनेक शाळांना (Schools Started) आवश्यक धान्य व साहित्याच उपलब्ध करून देण्यात आले नाही. अनेक शाळांमधील धान्य संपले (Due to stoppage of supply of food grains) आहे. यासंदर्भात माहिती देऊनही पुरवठा केला गेला नाही. त्याचा परिणाम मध्यान्न भोजन योजनेवर झाला आहे. विचारणा केल्यास धान्याच्या उपलब्धतेनंतरच माध्यान्ह भोजन सुरू केले जाईल, असे उत्तर शिक्षकांकडून मिळत आहे.
दर महिन्यात पाठविली जाते यादी
या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना दररोज माध्यान्ह भोजन देणे बंधनकारक आहे. यामुळे अन्नधान्याचा पुरवठा वेळेवर होणे गरजेचे आहे. शाळांकडून प्रत्येक महिन्यातच धान्याची यादी (List of grains every month) पाठविली जाते. पुरवठादार मात्र साहित्य वेळेत उपलब्ध करून देत नाहीत. याप्रकारासाठी जिल्हा परिषद प्रशासनाची उदासीनता (Zilla Parishad administration) कारणीभूत असल्याचे बोलले जाते. राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष म्हणाले की, माध्यान्ह भोजन योजना गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शाळेत आकर्षित करण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. परंतु, दुर्लक्षित कारभारामुळे जिल्ह्यातील (Due to neglected administration in the district) अनेक शाळांमध्ये विद्यार्थी माध्यान्ह भोजनाच्या प्रतीक्षेत आहेत.
पुरवठादरांना नोटीस
नॅशनल को-ऑपरेटिव्ह कंज्युमर फेडरेशनतर्फे धान्याची उपलब्धता करून दिली जाते. परंतु, गेल्या काही दिसांपासून अनेक शाळांना होणारा पुरवठाच खोळंबला आहे. कंत्राटदाराकडून दरवेळी वेगळे कारण पुढे केले जत आहे. या प्रकारानंतर प्रशासनाकडून पुरवठादारांना कारणे दाखवा नोटीस (Show cause notice to suppliers) बजावण्यात आली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या