नागपुरात तरुणाच्या आत्महत्येवरुन राजकारण; अॅट्रोसिटीसह हत्येचा गुन्हा दाखल करण्याची वंचितची मागणी
नागपूर जिल्ह्यातील थडीपवनी येथील गावातील तरुणाच्या आत्महत्ये प्रकरणी अॅट्रोसिटीसह हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. या तरुणाने 27 मे रोजी गॅस एजेन्सीच्या संचालकासोबत झालेल्या वादानंतर कीटकनाशक द्रव्य पिऊन आत्महत्या केली होती.
नागपूर : जिल्ह्यातील थडीपवनी गावात अरविंद बनसोड या तरुणाच्या आत्महत्या प्रकरणात आता राजकारण सुरू झालं आहे. वंचित बहुजन आघाडीने या प्रकरणात अॅट्रोसिटीचा आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. अरविंद बनसोड या तरुणाने 27 मे ला थडीपवनी गावात एका गॅस एजेन्सीच्या संचालकासोबत झालेल्या वादानंतर कीटकनाशक द्रव्य पिऊन आत्महत्या केली होती.
नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील थडीपवनी गावात अरविंद बनसोड या तरुणाच्या आत्महत्या प्रकरणात वंचित बहुजन आघाडीने अॅट्रोसिटी आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. अरविंद बनसोड या 32 वर्षीय तरुणाने 27 मे रोजी थडीपवनी गावात एका गॅस एजेन्सीच्या संचालकासोबत झालेल्या वादानंतर कीटकनाशक द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. 28 मे रोजी त्याचा नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. आता त्याच प्रकरणात अॅट्रोसिटी आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.
गृहमंत्र्यांचं नागपूर बनतंय 'क्राईम कॅपिटल', आठ दिवसात पाच हत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 27 मे रोजी अरविंद बनसोड याने थडीपवनी गावातील मयूर उमरकर यांच्या गॅस एजेन्सीचे काही फोटो मोबाईलमध्ये काढले होते. याच मुद्द्यावरून त्यांचे मयूर उमरकर यांच्यासोबत वाद झाले होते. याच वादात रागाच्या भरात अरविंद याने गॅस एजेन्सीच्या समोरच विष प्राशन केले होते. संबंधित गॅस एजेन्सीचे संचालक मयूर उमरकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पंचायत समिती सदस्य असल्याने पोलिसांनी सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई केल्याचा आरोप मृत अरविंद बनसोड यांच्या कुटुंबियांनी केला होता.वंचित बहुजन आघाडीची प्रकरणात उडी लोकांचा दबाव वाढल्यानंतर पोलिसांनी अरविंद बनसोड याच्या आत्महत्येच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते आणि गॅस एजेन्सी संचालक मयूर उमरकर यांच्यासह इतर दोघांविरोधात आयपीसी कलम 306 अन्वये आत्महत्येस प्रवृत्त करणे असा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, आता वंचित बहुजन आघाडीने या प्रकरणात उडी घेत अरविंद बनसोड यांच्या मृत्यू प्रकरणात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करत आत्महत्येस प्रवृत्त केले या ऐवजी हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी आज नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेत या प्रकरणात अॅट्रोसिटी आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
Beed Hospital Fight | छेड काढल्याच्या प्रकारावरून बीडमधील रुग्णालयात हाणामारी, नातेवाईकांकडून कर्मचाऱ्याला चोप