एक्स्प्लोर
नागपूरमध्ये बाथरूममधील पाण्याच्या टाकीत पडून तीन वर्षीय चिमुरडीचा मृत्यू
दोन तासानंतरही वंशिका न दिसल्याने वडील आणि आजीने तिचा शोध घेतला असता ती छतावरील पाण्याच्या टाकीत पडली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
नागपूर : घरी खेळताना बाथरूममधील पाण्याच्या टाकीत तोल जाऊन पडल्याने तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नागपुरात घडली आहे. वंशिका मुकेश वर्मा असे मृत चिमुकल्या मुलीचे नाव आहे. वंशिका तिचे वडील, आजी आणि पाच वर्षाच्या एका भावासोबत कळमना पोलीस स्टेशन हद्दीतील डिप्टी सिग्नल परिसरात राहत होती.
वंशिकाचे वडील मजुरीचे काम करतात तर आजी एका कंपनीत काम करते. वंशिकाची आई कुटुंबासोबत राहत नाही. शनिवारी संध्याकाळी खेळता-खेळता ती एकटीच घराच्या छतावर गेली. छतावर असलेल्या बाथरूममध्ये जाऊन पाण्याच्या टाकीत डोकावत असताना अचानक तोल जाऊन ती टाकीत डोक्याच्या भारावर पडली.
दोन तासानंतरही वंशिका न दिसल्याने वडील आणि आजीने तिचा शोध घेतला असता ती छतावरील पाण्याच्या टाकीत पडली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर वंशिकाला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
बातम्या
राजकारण
भारत
Advertisement