एक्स्प्लोर

Nagpur : वादग्रस्त बिशप पी.सी. सिंह यांच्या सहकाऱ्यांवरही कारवाईची मागणी

नागपूर, भंडारा, चंद्रपूर आणि अमरावतीत मिशनच्या एकूण 24 शाळा आहेत. या शाळांकडून रचना सिंह महिन्यासा 5 लाख रुपये वसूल करत होत्या. ही सर्व रक्कम पी. सी. सिंह यांना देत होत्या, असा आरोप आहे.

नागपूर: वादग्रस्त बिशप पी.सी.सिंह यांच्यासाठी नागपुरातील चर्च ऑफ नॉर्थ इंडिया (Church of north india) अंतर्गत येणाऱ्या शाळेच्या प्राचार्यांनी कोटयावधीची वसुली केली. त्यांना आश्रय देण्यासाठी नागपुरात बोलावले. त्यानंतरच बिशप यांना नागपूर विमानतळावर (Nagpur Airport) ईओडब्लूने (EOW) अटक केली. त्यांच्या कोटयावधी वसुलीच्या कामात सहकार्य करणाऱ्या त्यांच्या पत्नी नोरा सिंह, प्राचार्य रचना सिंह, संजय सिंह, सुरेश जेकब तसेच सीएनआयचे जनरल सेक्रेटरी डेनिस लाल यांच्याविरूध्द कठोर कारवाई करावी अशी मागणी सोमवारी नितीन लॉरेन्स यांनी पत्रकार  परिषदेत करून खळबळ उडवून दिली. प्राचार्य रचना सिंह यांनी त्यांच्यावर केलेले सर्व आारोप खोडून काढले आहेत. 

कोट्यावधीच्या घोटाळ्याचा आरोप

बिशप पी.सी. सिंह यांचे अवैध कारनामे पंधरा दिवसांपूर्वी प्रकाशझोतात आल्यानंतर देशभर एकच खळबळ उडाली होती. बिशप सध्या जबलपूरच्या तुरूंगात (Jabalpur Jail) आहेत. लॉरेन्स म्हणाले, ईओडब्लूच्या टीमला पी. सी. सिंह यांच्या घरातून मोठ्या प्रमाणात विदेशी चलन (Foreign ‎Currency), कोट्यवधी रुपये तसेच अवैध संपत्तीची माहिती मिळाली आहे. पी. सी. सिंह यांनी मुंबईच्या विल्सन कॉलेजमधून अवैधरीत्या 70 लाख रुपये घेऊन युको बँकेच्या चेकच्या माध्यमातून वकिलाला दिले. सदर ठाण्यात त्यांच्याविरुद्ध 18 लाखाच्या चोरीचा गुन्हा दाखल आहे. एवढेच नव्हे तर एनडीटीए डायोसिस नावाच्या रजिस्टर्ड ट्रस्टची पचमढी येथील 1 लाख वर्ग फुटाचा भूखंड बिशप यांनी संचालक मंडळाला विश्वासात न घेता संजय आणि रचना सिंह यांच्या मदतीने सातपुडा रिसोर्टला नाममात्र शुल्कात भाडेतत्त्वावर दिला, असाही आरोप करण्यात आला. पत्रपरिषदेला अजय जॉन, प्रा. विजय बारसे, जयदीप रॉबिन्सन, ॲड. मार्क बर्मन उपस्थित होते. 

बिशपला 24  शाळांमधून महिन्याला 5 लाख

नागपूर, भंडारा, चंद्रपूर आणि अमरावतीत मिशनच्या एकूण 24 शाळा आहेत. या शाळांकडून रचना सिंह प्रति महिना 5 लाख रुपये वसूल करत होत्या. ही सर्व रक्कम पी. सी. सिंह यांना देत होत्या, असा आरोप आहे. 2005 ते 2019  या काळात रचना सिंह यांनी 15 कोटींचा घोटाळा केला असून महाराष्ट्राच्या ऑडिटर जनरल यांनी हा घोटाळा उघड करूनही त्यांच्यावर कारवाई झालेली नाही, याकडे लक्ष वेधण्यात आले. रचना सिंगचे पती संजय सिंह यांना पी. सी. सिंह यांनी मुंबईतील ट्रस्टच्या व्यवस्थापकीय संचालकपदावर नियुक्त केले. नियुक्तीनंतर त्यांनी ट्रस्टची संपत्ती विकून कोट्यवधी रुपये जमा केले आहेत. त्यामुळे पोलीस, इओडब्लू, ईडीने रचना सिंह, संजय सिंह, सुरेश जेकब, डेनिस लाल यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणीही यावेळी करण्यात आली. 

ते कोण? संस्थेशी संबंधीत नाहीत!

याबाबत प्राचार्य रचना सिंह यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी त्यांच्यावर केलेले सर्व आरोप फेटाळून लावले. आरोप करणारे लॉरेंन्स व इतरांचा चर्च ऑफ नॉर्थ इंडियाशी काहीही संबंध नाहीत. ते कोण? संस्थेशी काय संबंध असे म्हणत, आम्हाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया प्राचार्य रचना सिंह यांनी व्यक्त केली.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Supreme Court : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता, सुप्रीम कोर्टातील सुनावणी लांबणीवर

Napgur ZP Schools : नागपुरातील साडेचारशे मराठी शाळांवर संकट, 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा होणार समायोजित

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maha Shivratri : कित्येक वर्ष जुनं मंदिर, अन् पूजेचा तामझाम, पाकिस्तानातील खास महाशिवरात्र! पाहा Exclusive फोटो
कित्येक वर्ष जुनं मंदिर, अन् पूजेचा तामझाम, पाकिस्तानातील खास महाशिवरात्र! पाहा Exclusive फोटो
फक्त 11 रुपयांत मिळणार विमानाचे तिकीट! 'या' ऑफरमुळे देशात खळबळ
फक्त 11 रुपयांत मिळणार विमानाचे तिकीट! 'या' ऑफरमुळे देशात खळबळ
उन्हाचा कहर, महाराष्ट्र तापला, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद; गोव्यातही वाढलं टेंपरेचर
उन्हाचा कहर, महाराष्ट्र तापला, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद; गोव्यातही वाढलं टेंपरेचर
चाहे जाओ मुंबई, दिल्ली, आगरा... सोलापुरात भाच्याच्या लग्नात मामाने नाचवल्या नृत्यांगणा; पोलिसांचा फौजफाटा आला
चाहे जाओ मुंबई, दिल्ली, आगरा... सोलापुरात भाच्याच्या लग्नात मामाने नाचवल्या नृत्यांगणा; पोलिसांचा फौजफाटा आला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 26 February 2025Special Report Ujjwal Nikam | निकमांकडे वकीलपत्र, तरीही आरोपांचं सत्र;नियुक्तीवर देशमुख कुटुंब समाधानीSpecial Report | Uddhav Thackeray | ठाकरेंकडून शिंदेंना शिंगावर, फडणवीसांना डोक्यावर?Zero Hour | Swarget Bus Depo News | 'शिवशाही'त बलात्कार एसटीचं 'वस्रहरण',झीरो अवर शोमध्ये सखोल चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maha Shivratri : कित्येक वर्ष जुनं मंदिर, अन् पूजेचा तामझाम, पाकिस्तानातील खास महाशिवरात्र! पाहा Exclusive फोटो
कित्येक वर्ष जुनं मंदिर, अन् पूजेचा तामझाम, पाकिस्तानातील खास महाशिवरात्र! पाहा Exclusive फोटो
फक्त 11 रुपयांत मिळणार विमानाचे तिकीट! 'या' ऑफरमुळे देशात खळबळ
फक्त 11 रुपयांत मिळणार विमानाचे तिकीट! 'या' ऑफरमुळे देशात खळबळ
उन्हाचा कहर, महाराष्ट्र तापला, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद; गोव्यातही वाढलं टेंपरेचर
उन्हाचा कहर, महाराष्ट्र तापला, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद; गोव्यातही वाढलं टेंपरेचर
चाहे जाओ मुंबई, दिल्ली, आगरा... सोलापुरात भाच्याच्या लग्नात मामाने नाचवल्या नृत्यांगणा; पोलिसांचा फौजफाटा आला
चाहे जाओ मुंबई, दिल्ली, आगरा... सोलापुरात भाच्याच्या लग्नात मामाने नाचवल्या नृत्यांगणा; पोलिसांचा फौजफाटा आला
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
Chandrapur News : महाशिवरात्रीनिमित्य देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला; वैनगंगा नदीत बुडून 3 सख्या बहि‍णींचा दुर्दैवी अंत
महाशिवरात्रीनिमित्य देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला; वैनगंगा नदीत बुडून 3 सख्या बहि‍णींचा दुर्दैवी अंत
पुण्यातील धक्कादायक घटनेनंतर अजित पवारांचा लाडक्या बहि‍णींना शब्द; CM फडणवीसांनीही घेतली दखल
पुण्यातील धक्कादायक घटनेनंतर अजित पवारांचा लाडक्या बहि‍णींना शब्द; CM फडणवीसांनीही घेतली दखल
Prashant Kishor : बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
Embed widget