एक्स्प्लोर

Winter Session 2023 : अधिवेशनाचा तिसरा दिवस ठरणार वादळी? अनेक मोठे मोर्चे विधिमंडळावर धडकणार 

Winter Session 2023 : विधिमंडळ अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी अनेक मोठे मोर्चे विधिमंडळावर धडकणार आहेत. त्यामुळे उद्याचा दिवस मोर्चे आणि आंदोलनाचा दिवस ठरणार आहे.

नागपूर : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा (Winter Session) तिसरा दिवस हा आंदोलनाचा ठरणार आहे. कारण अनेक मोठे मोर्चे हे विधिमंडळावर धडकणार असल्याची माहिती समोर येत आहे. हिवाळी अधिवेशन सुरु होण्याआधीच राज्यात अनेक मुद्द्यांनी डोकं वर काढायला सुरुवात केली होती. त्याच मुद्द्यांवर हिवाळी अधिवेशनात घमासान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. दरम्यान त्यातील काही मोर्चे हे उद्या विधीमंडळावर धडकणार आहेत. 

शेतकऱ्यांसाठी काँग्रेसचा मोर्चा 

उद्या सर्वात प्रमुख मोर्चा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा असणार आहे.  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात दीक्षाभूमी वरून निघणारा मोर्चा विधिमंडळापर्यंत जाऊन सभेत रूपांतरित होईल. यावर्षीच्या खरीप हंगामाकरिता सरसकट दुष्काळ जाहीर करावा, एकरी 50 हजार रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, विनाअट पीक विमा मंजूर करावा, शेतीसाठीचा लोडशेडिंग पूर्णपणे बंद करावा या मागण्यांसाठी हा मोर्चा असणार आहे. दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास हा मोर्चा दीक्षाभूमीवरून विधिमंडळाच्या दिशेने मार्गस्थ होईल. या मोर्चात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्ष नेते विजय बडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेस पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते सहभागी होतील 

धनगर समाजाचा मोर्चा

धनगरांच्या आरक्षणासाठी सकल धनगर समाज समन्वय समितीच्या वतीने उद्या धनगर समाजाचा मोर्चा काढला जाणार आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीमधून आरक्षण देण्यात यावे तसेच धनगर मेंढपाळांच्या इतर प्रलंबित मागण्यांसाठी हा मोर्चा काढला जाणार आहे. यशवंत स्टेडियमवरुन निघणारा हा मोर्चा टेकडी रोडवर संपुष्टात येणार आहे.

वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भवाद्यांचा मोर्चा

वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भवाद्यांचा मोर्चा विधीमंडळावर धडकणार आहे. त्यासाठी विदर्भवाद्यांचा मोर्चा हा विधीमंडळावर धडकेल. यशवंत स्टेडियमवरुन निघणारा मोर्चा हा झिरो माइल जवळ येऊन थांबणार आहे. 

शिक्षकांचा मोर्चा : महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने  जुनी पेन्शन लागू करावी, शिक्षकांवर अशैक्षणिक कामे लादू नये या मागणीसाठी मोर्चा काढला जाणार आहे.

आदिवासींचा मोर्चा :  जनसेवा गोंडवाना पार्टीच्या वतीने विधिमंडळावर मोर्चा काढला जाणार आहे. इंदोरा मैदानातून निघणारा हा मोर्चा प्रामुख्याने आदिवासीच्या नावाखाली अनेक बोगस आदिवासींनी जात प्रमाणपत्र मिळवून नोकऱ्या बळकावल्याच्या मुद्द्यावर हा मोर्चा काढला जाईल. 

भारत राष्ट्र समिती हिंगणघाट तालुक्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावं या मागणीसाठी भारत राष्ट्र समितीच्या वतीने उद्या विधिमंडळावर मोर्चा काढला जाणार आहे.

हेही वाचा :

Winter Session 2023 : अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसावर होणार चर्चा , 'या' मुद्द्यांवर विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत 



अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : जाना था अर्जुनी मोरगाव, पहुंच गये आरमोरी, पायलटच्या चुकीचा फटकाZero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?Devendra Fadnavis : ना पवार - ना ठाकरे...फडणवीसांच्या रडारवर जयंतराव; स्फोटक भाषणAjit Pawar Full Speech Igatpuri : वक्फ बोर्डावरु उद्धव ठाकरेंना टोला,अजित पवार गरजले-बरसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
Embed widget