(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur News: मी तिकडे गेलो नाही म्हणूनच इथे आहे; शरद पवार यांच्या गटामध्ये असलेल्या अनिल देशमुख यांंचं सूचक वक्तव्य
Nagpur News : तुम्हालाही अजित पवार यांच्याकडून त्यांच्या गटात येण्यासाठीची ऑफर होती का या प्रश्नावर उत्तर देताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.
Anil Deshmukh : तुम्हालाही अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडून त्यांच्या गटात येण्यासाठीची ऑफर होती का या प्रश्नावर उत्तर देताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. "मी तिकडे गेलो नाही म्हणून इथे आहे, असं अनिल देशमुख म्हणाले. त्यामुळे भविष्यातही अनिल देशमुख हे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या गटात राहतील का? असा प्रश्न त्यांच्या वक्तव्यानंतर निर्माण झाला आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेसचा वरिष्ठ नेता असल्यामुळे अजित पवार यांच्याकडून मलाही ऑफर आली होती. पण मी तिकडे गेलो नाही असंही ते म्हणाले.
'....पण अजित पवारांनी त्याआधीच आपला निर्णय घेतला'
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) आठ आमदारांसह 2 जुलै रोजी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र त्यापूर्वीच शरद पवार यांनी अजित पवार यांच्या संघटनेमधील काम करण्याच्या इच्छेसंदर्भात निर्णय घेण्यासाठी 6 जुलै रोजी पक्षाची बैठक बोलावली होती. परंतु त्याआधीच अजित पवारांनी आपला निर्णय घेऊन टाकला असंही अनिल देशमुख म्हणाले.
अजित पवारांच्या बंडानंतर देशमुख काय म्हणाले होते?
दरम्यान अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्यानंतर अनिल देशमुख यांनी आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचं जाहीर केलं होतं. अजितदादांनी वेगळी भूमिका घेतली असती तरी आम्ही शरद पवार साहेबांसोबत कायम असणार आहोत, असं देशमुख म्हणाले होते. मी 14 महिने जेलमध्ये होतो तेव्हा मला आणि माझ्या कुटुंबाला आधार शरद पवार यांनी दिला. जर त्यांनी आधार दिला नसता तर मी आणि माझं कुटुंब देखील राहिलं नसतं, असंही त्यांनी 5 जुलै रोजीच्या पत्रकार परिषदेत म्हटलं होतं.
अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटली, राजकीय नाट्याचा दुसरा भाग
जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड करत भाजपची हातमिळवणी करुन सत्ता स्थापन केली आणि शिवसेनेत उभी फूट पडली. त्यानंतर जुलै 2023 याच घटनेची पुनरावृत्ती झाली. यावेळी बंड करणारे होते अजित पवार. 40 आमदारांसह अजित पवार यांचा एक मोटा गट सत्तेत सहभागी झाला. विरोधी पक्षनेते असलेल्या अजित पवार यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर शिंदे फडणवीस सरकारसोबत सत्तेत सहभाही झाले. त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर उर्वरित आठ आमंदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
राजकीय नाट्याचा दुसरा भाग आला आहे.
हेही वाचा