एक्स्प्लोर

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो

Riteish Deshmukh, Bigg Boss Marathi : 'बिग बॅास'मध्ये कल्ला करायला येतोय महाराष्ट्राचा लाडका सुपर स्टार रितेश देशमुख, बिग बॉस मराठीचा नवा प्रोमो रिलिज झालाय. 

Bigg Boss Marathi season 5 :  'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi Season 5) पाचव्या सिझनचा नवा प्रोमो कलर्स मराठीकडून रिलिज करण्यात आलाय. या सिझनमध्ये होस्ट म्हणून महेश मांजरेकर यांच्या जागी अभिनेता रितेश देशमुख दिसणार आहे. यावेळी बिगबॉस मराठीमध्ये नवे बदल पाहायला मिळणार असल्याचं या प्रोमोतून दिसत आहे. या प्रोमोमध्ये रितेशचा रूबाब अन् त्याची 'लय भारी' स्टाईल पाहायला मिळत आहे. तसेच त्याचा कमाल स्वॅगही अनुभवायला मिळत आहे. रितेशची 'बॉसी'गिरी पाहण्याची चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे.

'बिग बॉस' म्हणजे महाराष्ट्रातच नाही तर जगभरात बोलबाला असलेला मनोरंजनाचा बादशाह… छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम !!! 'कलर्स मराठी' आणि JioCinema च्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनची घोषणा करण्यात आली… आणि गेली दोन वर्षे रसिक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते, त्या 'बिग बॅास' मराठीची प्रतीक्षा आता संपली आहे. नव्या पर्वाचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या पर्वाची घोषणा होताच सोशल मीडियावर लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रियांचा वर्षाव सुरू झाला. कारण या सीझनचा होस्ट आहे,  हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारा … महाराष्ट्राचा लाडका सुपर स्टार रितेश देशमुख!! रितेशने आजवर आपल्या अभिनयाने चित्रपट रसिकांना 'वेड' लावलं आहे. पण आता  टेलिव्हिजनचा पडदा व्यापून टाकायला , 'बिग बॉस’ मराठीचा हा नवा सिझन गाजवायला , वाजवायला तो सज्ज झाला आहे. रितेशच्या येण्याने 'बिग बॉस'च्या घरात जबरदस्त कल्ला होणार आहे. एकंदरीतच आपल्या मराठमोळ्या रितेश भाऊमुळे 'बिग बॉस' आणखी ग्रँड होणार आहे, हे नक्की!

View this post on Instagram
 
A post shared by @colorsmarathi

रितेश भाऊची 'लयभारी' स्टाईल!

'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमध्ये तरूणांचा हार्ट थ्रॅाब रितेश देशमुख होस्ट असल्याने यावेळी खूप धमाल पहायला मिळणार आहे. रितेश असल्याने यावेळचा सीझन अधिक तरूण असणार आहे. 'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो नुकताच आऊट झाला आहे. या प्रोमोमध्ये रितेशचा रूबाब अन् त्याची 'लय भारी' स्टाईल पाहायला मिळत आहे. तसेच त्याचा कमाल स्वॅगही अनुभवायला मिळत आहे. रितेशची 'बॉसी'गिरी पाहण्याची चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे.'बिग बॉस'मध्ये आतापर्यंत एका वेगळ्या पद्धतीचे खेळ, नियम आणि टास्क होते. पण आता रितेशच्या येण्याने नावीन्य येणार असल्याचं प्रोमोवरुन स्पष्ट दिसत आहे. त्यामुळेच तर रितेश भाऊ म्हणतोय,"आता मी आलोय... कल्ला तर होणारच...!!”

'बिग बॅास' हा शो प्रसिद्ध आहे तो, त्यातील अतर्क्य , अशक्य , अफलातून गोष्टींसाठी.. अतरंगी कलावंतांच्या सतरंगी करामतींसाठी!! या अशक्य गोष्टींनीच 'बिग बॅास'ला लोकप्रियतेच्या शिखरावर नेले. पण हा जितका मनोरंजक खेळ आहे , तितकाच तो एक जबरदस्त माईंड गेम आहे. असा हा रसिकांचा लाडका भव्यतम कार्यक्रम "बिग बॉस मराठी” चा नवा सीझन प्रेक्षकांना लवकरच कलर्स मराठी आणि Jiocinema वर पाहता येईल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget