ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
आजचा अर्थसंकल्प म्हणजे थापांचा महापूर आणि आश्वासनांची अतिवृष्टी, उद्धव ठाकरेंची टीका. तर भूलथापांचा नाही मायबापांचा अर्थसंकल्प फडणवीसांचं प्रत्युत्तर...
अर्थसंकल्प म्हणजे लोकसभा पराभवाचं डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न, जयंत पाटलांची टीका.. तर राज्यात नवा इतिहास तयार करणारा अर्थसंकल्प, फडणवीसांचं प्रत्युत्तर..
अजित पवारांच्या बजेटमध्ये घोषणांची खैरात, मुंबई,ठाणे,नवी मुंबई महापालिका क्षेत्रात डिझेल २ रुपयांनी तर पेट्रोल ६५ पैशांनी स्वस्त होणार...
मुलींना व्यावसायिक शिक्षण मोफत, ८ लाखांच्या आत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या मुलींना लाभ, मेडिकल,इंजिनियरिंग,कृषी अभ्यासक्रम मोफत शिकता येणार..
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेची घोषणा,२१ ते ६० वयोगटातल्या पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार, येत्या १ तारखेपासून अंमलबजावणी..
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा, प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत, ५२ लाख कुटुंबांना मिळणार लाभ...
पंढरपूर वारीचा वर्ल्ड हेरिटेजसाठी युनेस्कोला प्रस्ताव, मुख्य पालख्यांतील दिंडींना प्रति दिंडी २० हजार रूपये जाहीर, वारकऱ्यांना पालखी मार्गावर मोफत तपासणी, उपचार
निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन अर्थसंकल्प सादर, एकनाथ खडसेंच्या टीकेमुळे भुवया उंचावल्या, तर खडसे नक्की कोणत्या पक्षात, मिटकरींचा सवाल
अजित पवार भाजपसोबत आल्याचा निर्णय जनतेला पटला नाही, भाजप आमदार सुरेश धस यांचं विधान, तर राष्ट्रावादीच्या अमोल मिटकरींचाही पलटवार
महाराष्ट्रात ड्रग्ज घेणारे, विकणारे कुणालाही सोडणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा...संपूर्ण राज्यात बुलडोझर, जेसीबी लावून ड्रग्जचं रॅकेट उद्ध्वस्त करणार मुख्यमंत्र्यांची ग्वाही...
संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान, आजचा मुक्काम देहूतल्या इनामदार वाड्यात
((भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची...))
विधानपरिषदेसाठी भाजपचे ५ पैकी २ उमेदवार जवळपास निश्चित, महादेव जानकर आणि पंकजा मुंडे विधानपरिषदेवर जाण्याची शक्यता...